आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत 2023-24 चा त्यांचा पाचवा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी रेल्वे अर्थसंकल्पासाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नवीन योजनांसाठी 75 हजार कोटींची घोषणा केली आहे. मात्र रेल्वेमध्ये सर्वसामान्य लोकांशी निगडीत कोणत्याही मुद्द्यावर कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
अर्थमंत्री सीतारामन यांनी 2023-24 या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पीय भाषणात रेल्वेसाठी जवळजवळ दुप्पट करण्याची घोषणा केली. त्यांनी रेल्वेसाठीची तरतूद वाढवून 2.40 लाख कोटी रुपये करण्याची घोषणा केली आहे
लोकसभेत अर्थसंकल्प सादर करताना, सीतारामन म्हणाल्या की, रेल्वेसाठीचा खर्च 2013-2014 मध्ये प्रदान केलेल्या रकमेच्या नऊ पट आहे.
पायाभूत सुविधा प्रकल्प कनेक्टव्हिटीवर भर देणार
पायाभूत सुविधा प्रकल्प ओळखले जाणाऱ्या कोळसा, खत आणि अन्नधान्य अशा 100 महत्त्वपूर्ण क्षेत्रासाठी शेवटच्या आणि पहिल्या मैलाच्या कनेक्टिव्हिटीसाठी वाहतूक आणि खाजगी स्त्रोतांकडून 15,000 कोटी रुपयांसह 75,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह प्राधान्याने हाती घेण्यात येतील.
1,000 हून अधिक डब्यांचे नूतनीकरण
प्रवाशांच्या वाढलेल्या अपेक्षांसह, रेल्वे राजधानी, शताब्दी, दुरांतो, हमसफर आणि तेजस सारख्या प्रीमियर ट्रेनच्या 1,000 हून अधिक डब्यांचे नूतनीकरण करण्याची योजना आहे. तर या डब्यांचे आतील भाग आधुनिक रूपात सुधारले जातील आणि प्रवाशांच्या सोयी वाढतील.
वंदे भारत एक्सप्रेस अधिक स्थानांवरून सुरू करणार
रेल्वे गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी जुने ट्रॅक बदलण्याबरोबरच वंदे भारत एक्सप्रेस अधिक स्थानांवरून सुरू करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाण्याची शक्यता आहे. तसेच पर्यटकांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने रेल्वे आणखी 100 विस्टाडोम कोच तयार करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे.
अर्थसंकल्पात, सरकारने 35 हायड्रोजन इंधनावर आधारित गाड्या, साइड एंट्रीसह 4,500 नवीन डिझाइन केलेले ऑटोमोबाईल वाहक कोच, 5,000 LHB कोच आणि 58,000 वॅगन तयार करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.
2022-23 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वेला 1.4 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती, त्यापैकी 1.37 लाख कोटी रुपये भांडवली खर्चासाठी आणि 3,267 लाख कोटी रुपये महसूल खर्चासाठी राखून ठेवले होते.
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात दिलासा नाही!
रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे प्रवासात दिलेली सवलत बंद केली होती. ते पुन्हा सुरू करण्याचा कोणताही विचार नसल्याचे रेल्वेमंत्र्यांनी काही काळापूर्वीच स्पष्ट केले आहे. तथापि, गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत रेल्वेच्या कमाईत लक्षणीय वाढ झाली आहे.
तर ही सूट बंद केल्याने सर्वसामान्य नागरिकही नाराज आहेत. अशा स्थितीत 2024 च्या निवडणुकीपूर्वी सरकार आपली जुनी भूमिका बदलून या सवलतीचा मुद्दा पुन्हा जाहीर करेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अशी कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.