Fadnavis Announcements For Development Of Industry And Infrastructure | Maharashtra Budget 2023
मेट्रोला गती, विमानतळांचा विकास:महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयनवर नेणार; पायाभूत सुविधांच्या विकासासाठी फडणवीसांच्या मोठ्या घोषणा
21 दिवसांपूर्वी
कॉपी लिंक
यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प हा अमृतकाळातील पहिलाच अर्थसंकल्प असून तो ‘पंचामृत’ ध्येयावर आधारित असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकाराने आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.
या वेळी आजच्या अर्थसंकल्पातून राज्य सरकारने उद्योग क्षेत्र आणि पायाभूत सुविधासह भरीवल भांडवल गुंतवणुकीसाठी तरतूद केली आहे. यावेळी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 ट्रिलीयनवर नेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार बददल्यामुळे अनेक प्रकल्प राज्यातून बाहेर गेले. त्यांची उणीव भरून काढण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधी देण्यात आला आहे.
तृतीय अमृत भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सुविधा विकास -
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार करून सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी महामार्ग बांधणार.
महाराष्ट्र शक्तीपीठ महामार्ग (पवनार ते पात्रादेवी) नागपूर - गोवा शिघ्रसंचार द्रुतगती - महामार्ग 86 हजार 300 कोटी रुपये खर्च अपेक्षित
पुणे रिंगरोडचे भूसंपादन, मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंकचे बांधकाम, विरार ते अलिबाग बहुउद्देशिय वाहतूक मार्गिका, ही कामे करणार. रेवस ते सिंधुदूर्ग जिल्ह्यातील रेड्डी या सागरी महामार्गाचे काम सुरू.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडून एशियन डेव्हलपमेंट बँक, हायब्रीड अॅन्युईटी व इतर नियमित योजनांमधून सुमारे 18 हजार किलोमीटर लांबीची रस्ते सुधारणा आणि 4 हजार 500 किलोमीटर लांबीच्या जिल्हा व ग्रामीण मार्गांची कामे हाती घेणार
सर्व आदिवासी पाडे बारमाही रस्त्यांनी जोडण्यासाठी नवीन 'बिरसा मुंडा जोडरस्ते योजना, सर्व बंजारा तांड्यांसाठी 'संत सेवालाल महाराज जोडरस्ते योजना' तसेच सर्व धनगर वाड्या-वस्त्यांसाठी यशवंतराव होळकर जोडरस्ते योजना सुरू करणार ४ हजार कोटी रुपयांची तरतूद करणार
मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेत रस्ते योजनेत सुधारणा करून नवीन योजना सुरू करणार
ठाणे शहराचा वर्तुळाकार मेट्रो रेल्वे प्रकल्प, नाशिक मेट्रो निओ प्रकल्प, पुणे मेट्रोच्या पिंपरी-चिंचवड ते निगडी कॉरीडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्प केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर प्रकल्पांची कामे हाती घेणार
कल्याण-मुरबाड, नाशिक-पुणे या सेमीहायस्पीड, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव, नांदेड- बिदर, फलटण-पंढरपूर, खामगाव-जालना तसेच वरोरा-चिमूर-कांपा या नवीन रेल्वेमार्गांसाठी ५० टक्के राज्यहिस्सा देणार
शिर्डी विमानतळ येथे नवीन प्रवासी टर्मिनल, छत्रपती संभाजीनगर विमानतळाच्या भूसंपादनासाठी 734 कोटी रुपये निधी, नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विस्तार व पुरंदर येथील नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नियोजन करणार
नागपुरातील मिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रुपये, अमरावतीतील बेलोरा आणि अकोल्यातील शिवणी या विमानतळांच्या कामाचे नियोजन करणार
मुंबई मेट्रो मार्ग 10, 11 व 12 हे प्रकल्प लवकरच पूर्ण करणार
राज्यातील सीमावर्ती भागातील गावांमध्ये ग्रामविकासाच्या विविध योजना राबविणार
मुंबई सभोवताल जलवाहतुकीसाठी ठाणे व वसई खाडी एकमेकांना जोडणार, दक्षिण मुंबईहून कल्याण, डोंबिवली, ठाणे, वसई खाडी, नवी मुंबई अशी जलमार्गाने प्रवासी वाहतूक करण्याकरिता जेट्टी व संबंधित सुविधा उभारणार.
देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शिक्षण क्षेत्रासाठी घोषणांचा पाऊस
शिक्षण क्षेत्रासाठी 1 लाख कोटीहून अधिकची तरतूद करण्यात आल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. शिक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात आल्याची मोठी घोषणा यावेळी करण्यात आली. अंगणवाडी ते उच्चशिक्षण 1 लाख 866 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.