आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबजेटमध्ये लिथियम बॅटरीच्या आयातीवर कस्टम ड्यूटी २१ वरून १३% करण्याचा निर्णय झाला. कस्टम ड्यूटी ८% घटल्याने इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीत कमी होतील. नीती आयोगाचे माजी सल्लागार (ट्रान्सपोर्ट) अनिल श्रीवास्तव सांगतात, ईव्हीची सर्वात महत्त्वाचा कंपोनंट बॅटरी आहे. ईव्हीच्या किमतीत २७ ते ३०% बॅटरीची किंमत असते. त्यामुळे ईव्ही कार सुमारे २.५ टक्के स्वस्त होतील. दुसरीकडे, थ्री-व्हीलरच्या किमतीत २%पर्यंत कमी येईल.
अनिल उदाहरण देऊन सांगतात, एखाद्या टूव्हीलरची किंमत १ लाख रुपये असेल तर ती ९८ हजारांत मिळेल. ऑटोमोबाइल तज्ज्ञ संजीव गर्ग सांगतात, देशात सर्वात जास्त दुचाकी ईव्हीची विक्री वाढली आहे, तर चीन आणि अमेरिकेसारख्या बाजारात ईव्ही कारची विक्री सर्वात जास्त आहे. आपल्या देशात ईव्ही कार बाजार २०३०पर्यंत ४% वाढून १०% पर्यंतही पोहोचणार नाही. तर सरकारचे लक्ष्य त्याला ३०% पर्यंत घेऊन जाण्याचे आहे. ऑटोमोबाइल तज्ज्ञ टुटू धवन सांगतात, एकाच कंपनीची पेट्रोल वाहने आणि ईव्हीच्या किमतीत दुप्पट फरक आहे. देशातील कारचा सर्वात मोठा ग्राहक हा मध्यम आणि उच्च मध्यमवर्गीय आहे. कार खरेदी करताना तो सर्वप्रथम किमतीकडे लक्ष देतो.
फेम फेज-1
कालावधी 2014 ते 2019
बजेट 895 कोटी
कामगिरी :
{2.8 लाख हायब्रिड आणि ईव्ही गाड्या, {10 शहरात 425 ई बस चालल्या. {520 ईव्ही चार्जिंग स्टेशन मान्य, {479 ईव्ही चार्जिंग स्टेशन स्थापन, सरकारी योजना- पीएलआय स्कीम, बॅटरी स्वॅपिंग पॉलिसी, इलेक्ट्रिक मोबिलिटी झोन, टॅक्स रिडक्शन.
फेम फेज-2
कालावधी 2019 ते2024
बजेट 10 हजार कोटी
कामगिरी :
{10 लाख दुचाकी, 5 लाख ऑटो, 55 हजार कार आणि 7090 बस
{7.1 लाख ईव्हीचा इन्सेंटिव्ह
{7210 ई-बसला मान्यता, डिसेंबर 2022 पर्यंत 2172 बस चालवली.
{68 शहरांत 2877, हायवे-एक्स्प्रेस वे वर 1576 चार्जिंग स्टेशनला मान्यता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.