आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने-चांदी:ई-गोल्ड फिजिकल गोल्डमध्ये बदलल्यास कर लागणार नाही

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोने ₹५८,०६० रु./ग्रॅमच्या ऐतिहासिक उंचीवर, चांदी झाली ७२,३०० रु./किलो

अर्थसंकल्पात हेही महत्त्वाचे
{ फिजिकल गोल्ड ई-गोल्डमध्ये वा ई-गोल्ड फिजिकल गोल्डमध्ये बदलल्यास ट्रान्सफर मानले जाणार नाही. कॅपिटल गेन्स टॅक्स लागणार नाही. आतापर्यंत सोने खरेदीनंतर ३ वर्षांनी विकल्यास २०% कर व लाँग-टर्म कॅपिटल गेन्सवर ४% सेस लागे.
{सोने आणि इमिटेशन ज्वेलरीवर सीमा शुल्क २०% नी वाढून २५%, चांदीवर ७.५% वाढून १५% झाले. ड्यूटी वाढल्यानंतर भारतीय बाजारात किमती वाढल्या.

{जेम्स अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन काैन्सिलचेे माजी चेअरमन कोलिन शहा यांनी सांगितले की, ड्यूटी वाढल्याने स्थानिक पातळीवर दागिने महागणार.

लॅबमध्ये बनलेले हिरे स्वस्त, आयआयटीला रिसर्च ग्रँटही
{लॅबमध्ये बनलेले हिरे स्वस्त होणार. त्यासाठी लागणाऱ्या सीडवर सीमा शुल्क ५% नी घटून शून्य केले आहे. त्यामुळे घरगुती निर्मिती वाढेल. भारत नैसर्गिक हिऱ्यांच्या कटिंग-पॉलिशमध्ये लीडर आहे. जगाच्या टर्नओव्हरमध्ये भागीदारी तीन-चतुर्थांश आहे.
{आता लॅबमधील हिऱ्यांचे मार्केट वाढेल. एप्रिल-जुलै २०२२ मध्ये त्यांची निर्यात ७०% वाढून ते ५ हजार कोटी रुपयांचे झाले होते.
{लॅबमध्ये हिरे बनवण्याच्या संशोधनासाठी एका आयआयटीला ५ वर्षे ग्रँट मिळेल.

बातम्या आणखी आहेत...