आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योग:पर्यटनावर भर, 50 चॅलेंजिंग डेस्टिनेशन्सवर सुविधांत वाढ

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

या बजेटमध्ये लघुउद्योगांसाठी कराचा दिलासा आणि एमएसएमईसह स्टार्टअप सेक्टरला प्रोत्साहन देण्यासाठी घोषणा करण्यात आल्या. मात्र वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयासाठी अर्थसंकल्पात ६.६९%ची कमी आली. या बजेटमध्ये वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयासाठी १३४५५.२१ कोटींचे वाटप करण्यात आले. तर मागील बजेटमध्ये १४४२१.०० कोटीं वाटप केले होते. अर्थसंकल्पात उद्योग आणि अंतर्गत प्रोत्साहन विभागासाठी ८२००.६३ कोटींची तरतूद आहे. गेल्या अर्थसंकल्पात ही तरतूद ८३४८.०० कोटी रुपये होती. अर्थमंत्र्यांनी इज ऑफ डुइंग व्यवसायाला उत्कृष्ट करण्यासाठी घोषणा केली आहे. कौशल्य विकास, डिजिटल पुढाकारावर लक्ष देण्यात आले आहे. एमएसएमई, स्टार्टअप आणि छोट्या दुकानदारांसाठी तरतुदी आहेत. पर्यटन इंडस्ट्रीत तरुणांना नोकरी आणि उद्योग वाढवण्यासाठी प्रयत्न. राज्यांची सक्रिय सहभागिता, सरकारी कार्यक्रमांत समन्वय व मिशन मोडमध्ये काम केले जाईल.

एमएसएमई क्षेत्रासाठी कर्ज गॅरंटी स्कीम {१ एप्रिलपासून एमएसएमईसाठी कर्ज गॅरंटी योजना सुरू होईल. निधीत ९००० कोटी रुपये वाढवून ही योजना सुरू केली जाईल. { पर्यटन इंडस्ट्रीत तरुणांना नोकरी आणि उद्योगासाठी प्रयत्न {देशात मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या उत्पादनाला चालना देण्यासाठी काही भागांच्या आयातीवर कस्टम ड्यूटीमध्ये सवलत.

बातम्या आणखी आहेत...