आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविशिष्ट सरकारी एजन्सींच्या डिजिटल प्रणालीत ओळखीसाठी पॅन क्रमांकाचा वापर केला जाईल असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणादरम्यान सांगितले.
व्यापारातील सुगमता वाढवण्यासाठी हे पाऊल सहाय्यकारक ठरणार आहे. पॅन हा 10 अंकांचा अल्फान्युमेरिक क्रमांक असतो. प्राप्तीकर विभागाकडून तो जारी व्यक्ती किंवा संस्थांना जारी केला जातो.
MSME साठी विवाद से विश्वास योजना
एमएसएमईंसाठी खास विवाद से विश्वास योजना राबवली जाईल. यानुसार करार अंमलात आणण्यात अयशस्वी ठरलेल्या एमएसएमईंना 95 टक्के परफॉर्मन्स सिक्युरिटी परत केली जाईल.
विवाद से विश्वास योजनेअंतर्गत कर विवाद, व्याज, दंड आणि शुल्काच्या 100 टक्के विवादित कर आणि 25 टक्के विवादित दंड किंवा व्याज किंवा फी भरल्यास मूल्यांकन किंवा पुनर्मूल्यांकन आदेशाच्या संदर्भात सेटलमेंट करण्याची तरतूद असेल.
तिसऱ्या टप्पातील ई-न्यायालये सुरू करणार
तिसऱ्या टप्प्यातील ई-न्यायालयेही सुरू केली जातील असे सीतारामन यांनी सांगितले. निती आयोगाचे राज्य समर्थित निशन तीन वर्षांसाठी सुरू राहील असेही सीतारामन म्हणाल्या.
बजेटविषयी या बातम्याही वाचा
उद्योगांसाठीच्या मोठ्या घोषणा:नवीन उद्योजकांना 10 वर्षांसाठी कर सवलत, कोरोनाचा फटका बसलेल्या MSME ना दिलासा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना उद्योगांसाठी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यानुसार कोरोनाचा फटका बसलेल्या एमएसएमईंना दिलासा दिला जाणार आहे. वाचा उद्योगांसाठीच्या काही महत्वाच्या घोषणा...(वाचा पूर्ण बातमी)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.