आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराज्येष्ठ नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता ते ३० लाखांपर्यंत रक्कम एकरकमी जमा करू शकतील. पूर्वी ही मर्यादा १५ लाख रुपये होती. त्याचा परिणाम आता ३० लाख रुपयांवर ८% वार्षिक व्याजानुसार दरमहा २० हजार रुपये मिळतील. आधी १५ लाखांवर कमाल १० हजार रुपयेच मिळत होते. एवढेच नव्हे तर पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत (एमआयएस) पैसे जमा करण्याची मर्यादाही ४.५ लाख रुपयांवरून ९ लाख रुपये करण्यात आली आहे. तसेच संयुक्त खात्यात १५ लाख रु. पर्यंत जमा केले जाऊ शकतात. पूर्वी ही मर्यादा रु.९ लाख होती. ही सुविधा फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. यात गुंतवणूक केल्यास आयकर कलम ८० सी अंतर्गत कर सूटही मिळते. इतरांसाठी ~४.५ लाख मर्यादेत कोणताही बदल नाही. ६० वर्षांवरील कुणीही ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ घेऊ शकतो.
ईपीएफ आणि एनपीएससारख्या बचत योजनेत दावा करणे सोपे
जर ईपीएफ, एनपीएस व किसान विकास पत्र यासारख्या सरकारी बचत योजनांमध्ये नॉमिनी नाही व कायदेशीर वारस प्रमाणपत्रही दिलेले नाही. तसेच सहा महिन्यांपासून त्या रकमेवर कोणीही दावा केलेला नाही. अशा वेळी, दावा केल्यास कायदेशीर वारसांना सरकारने विहित केलेल्या रकमेपर्यंतचा दावा दिला जाईल. आतापर्यंत काम कागदोपत्रीच अडकत होते.
पॅनशिवाय ईपीएफ रक्कम काढल्यास २०% टीडीएस लागेल
पॅनशिवाय ईपीएफ काढणाऱ्यांना आता पूर्वीच्या ३०% ऐवजी करपात्र रकमेवर २०% दराने टीडीएस भरावा लागेल. म्हणजेच यात दिलासा देण्यात आला आहे.
लीव्ह एन्कॅशमेंटवर...
सेवानिवृत्तीवर ३ लाखांऐवजी आता २५ लाखांपर्यंत सूट
{यापूर्वी अशासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या वेळी मिळालेल्या रजेवरील रोख रक्कम ३ लाख रुपयांपर्यंतची मिळत होती ती आता २५ लाखांपर्यंत झाली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना आधीच यावर पूर्ण सूट आहे. लहान ते मोठ्या उत्पन्न गटातील लोकांनाही याचा फायदा होणार आहे.
रु.3 लाख २००२ मध्ये मर्यादा निश्चित केली होती. २० वर्षांपासून त्यात वाढीची मागणी होती, ती पूर्ण झाली आहे.
सुपर अधिभारावर...
५ कोटींपेक्षा जास्त उत्पन्नावर १२% कमी अधिभार लागेल
{अतिश्रीमंतांनाही अर्थसंकल्पात दिलासा मिळाला आहे. आता कमाल कर दर ४२.७% वरून ३९% केला आहे. ५० लाख रु. पर्यंतच्या उत्पन्नावर सुपर अधिभार लागणार नाही. ५० लाख ते एक कोटी, १-२ कोटी उत्पन्नावर १०%. उत्पन्नावर १५%व रु. २ कोटी रु. पेक्षा जास्त असलेल्यांसाठी २५% अधिभार लागू होईल. आतापर्यंत ५ कोटींहून अधिक वार्षिक उत्पन्नावर ३७ टक्के अधिभार भरावा लागत होता.
नवीन कर प्रणाली डिफॉल्टमध्ये दिसेल. तुमच्याकडे जुन्या कर प्रणालीची निवड करण्याचा पर्याय असेल.
आयकर रिटर्न वर...
नवीन पिढीसाठी सुलभ फॉर्म लवकरच येईल...
{आता पुढील पिढीचा आयकर रिटर्न फॉर्म जारी केला जाणार आहे. रिटर्नच्या तक्रारींचा लवकर निपटारा होईल.
{सध्या टॅक्स पोर्टलवर दररोज ७२ लाख रिटर्न भरले जात आहेत. २०१३-१४ मध्ये ९३ दिवस लागत असताना यासंबंधीच्या तक्रारी अवघ्या १६ दिवसांत सोडवल्या जातात.
इन्कम टॅक्स रिटर्नशी संबंधित सुमारे ४५ टक्के प्रकरणांमध्ये, समस्या केवळ ४३ तासांत सोडवली जाते.
दिव्य मराठी एक्स्पर्ट
सीए राजेश जैन
सीए सलील जैन
सीए अभय शर्मा
सीए सुरेश वाधवानी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.