आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थसंकल्पाकडे पाहिल्यास कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) वाढते महत्त्व व तंत्रज्ञानस्नेही हाेऊन वाटचाल करण्यासाठी भारताची तयारी दिसून येत आहे. नर्सिंग, मेडिकल उपकरण-शिक्षण, शिक्षक-प्रशिक्षण, आॅनलाइन लर्निंग, द स्किल इंडिया डिजिटल प्लॅटफाॅर्म व ५ जी लॅब्जच्या तरतुदींसह तीन सर्वाेच्च शैक्षणिक संस्थांना एआय विकसित करण्यासाठी सेंटर आॅफ एक्सलन्स करण्याची घाेषणा झाली आहे. भारत तंत्रज्ञानाच्या आधारे विकासासाठी तयार आहे, हेच यातून लक्षात येते. यातून उत्पादकता वाढेल आणि २०३० पर्यंत नाॅलेज इकाॅनाॅमीमध्ये चारपट वाढ हाेईल. यातून मेक एआय फाॅर इंडिया व मेक एआय वर्क फाॅर इंडिया या संकल्पना प्रत्यक्षात येतील. वास्तविक भारताने २०१९ पासूनच एआय तंत्रज्ञानाला बजेटमध्ये समाविष्ट करण्यास सुरुवात केली हाेती. सेंटर फाॅर एक्सलन्स एआय रिसर्चमध्ये पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिपद्वारे आराेग्य सेवांना विकसित केले जाईल. सध्या देशातील अनेक रुग्णालयांत एआय आधारित प्लॅटफाॅर्म तयार केला गेला आहे. यातून ह्रदयविकार पातळी सांगू लागले आहे. त्याच्या मदतीने डाॅक्टर हृदयविकारावर उपचार करू शकतात. एआयद्वारे मधुमेह, हायपरटेन्शन, स्ट्राेक, सीव्हीएबद्दलची माहिती आधीच मिळू शकते. एआय मेडिकल प्रॅक्टिसला पूर्णपणे बदलून टाकू शकते. एआयच्या मदतीने हृदयविकार, कर्कराेग, मधुमेहासारख्या आजारांवर उपचारासाठी प्रभावी साधने तयार केली जाऊ शकतात. इनाेव्हेशन आधारित इकाेसिस्टिम तयार केली जात आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळाचीदेखील गरज भासेल. हीच गरज स्कील इंडिया डिजिटल प्लॅटफाॅर्म पूर्ण करेल. एआय व राेबाेटिक्स तंत्रज्ञानातील जाणकांना भविष्यासाठी तयार केले जाईल. सध्याच्या शैक्षणिक संस्थांमध्ये मेडिकल उपकरणे आणि तंत्रज्ञानासाठी घाेषित मल्टिडिसिप्लनरी काेर्सद्वारे कुशल मनुष्यबळ तयार हाेईल. भविष्यासाठी याेजना तयार करताना बजेटमध्ये वर्तमानाचेही भान ठेवण्यात आले आहे. सिकल सेल अॅनिमियाला संपवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यामुळे ७ काेटी लाेकांना लाभ मिळेल. त्यापैकी बहुतांश अनुसूचित जमाती समुदायातील आहेत. १५७ नर्सिंग काॅलेजची घाेषणाही माेठे पाऊल आहे. त्यामुळे देशात परिचारिकांचा तुटवडा दूर हाेईल. जागतिक आराेग्य संघटनेच्या मापदंडानुसार प्रत्येकी १ हजार लाेकसंख्येमागे तीन परिचारिकांची गरज भासते. परंतु सध्या हे प्रमाण १.७ नर्स एवढे आहे. नव्या निर्णयामुळे महिलांना आराेग्य क्षेत्रात राेजगाराची संधी वाढेल. फार्मास्युटिकल्स क्षेत्रात संशाेधनाला प्राेत्साहन दिले आहे. अर्थसंकल्पात आयसीएमआर प्रयाेगशाळेला खासगी क्षेत्रासाठी खुले करण्यात आले आहे. एकूण मेडिकल क्षेत्राच्या बाबतीत वर्तमान बघून भविष्यासाठी तयारी करण्याचा प्रयत्न दिसून येताे.
डॉ. संगीता रेड्डी सदस्य, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.