आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना अर्थसंकल्पीय भाषणात सॉरी...सॉरी म्हणाल्या. त्यांच्या 5व्या अर्थसंकल्पीय भाषणात हे प्रथमच घडले. सीतारामन स्क्रॅप पॉलिसीविषयी बोलत होत्या. यावेळी त्यांनी ओल्ड पोल्युटेड वाहनाला ओल्ड पॉलिटिकल वाहन म्हटले. हे ऐकून सगळे हसू लागले. चूक लक्षात आल्यावर त्याही हसत हसत सॉरी...सॉरी म्हणत ओल्ड पोल्युटेड वाहनांना हटवले जाईल असे म्हणाल्या.
सीतारामन यांच्या 1 तास 27 मिनिटांच्या भाषणात भारत जोडो, मोदी-मोदी अशा घोषणाही देण्यात आल्या. भांडवली गुंतवणूक आणि टॅक्स स्लॅबमधील बदल यावर घरात सभागृहात 14 ते 30 सेकंद टाळ्या वाजल्या.
लाल रंगाच्या साडीत दिसल्या, लाल फोल्डरमध्ये टॅब ठेवला
अर्थमंत्री लाल टॅबसह लाल संबलपुरी सिल्क साडीत दिसल्या. त्यांच्या या साडीचीही चर्चा होत आहे. याला टेम्पल साडी असेही म्हणतात. हा रंग विजयाचे प्रतीक आहे.
इंदिरांनी माफी मागितल्यावर सभागृहात शांतता, निर्मलांची तब्येत बिघडल्यावर राजनाथ म्हणाले, आता वाचू नका बसा
बजेट बोअरिंग असते. पण याचे मोमेन्टस आता सोशल मीडियावर ट्रेन्ड होऊ लागतात. आता हाच फोटो बघा...
मात्र असे नाही की अशा कहाण्या आताच चर्चेत येत आहेत. याआधीही अशा मोमेन्टसी चर्चा व्हायची. जसे, इंदिरा गांधींनी सिगारेटवरील कर कैकपट वाढवण्यापूर्वी सदनाला सॉरी म्हणणे. मनमोहन सिंह यांच्यासारख्या कठोर व्यक्तीमत्वाने शेरोशायरी म्हणणे. आणि निर्मला सीतारामन बजेट वाचता वाचता आजारी पडणे.
1947 पासून ते आतापर्यंत संसदेने 73 पूर्ण आणि 14 अंतरिम बजेट बघितले आहेत. इंदिरांनंतर निर्मला दुसऱ्या महिला आहेत, ज्यांच्याकडे अर्थ मंत्रालयाची जबाबदारी आहे आणि त्या चार वर्षांपासून देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत.
2020 मध्ये 2 तास 41 मिनिटांचे भाषण देत सर्वात दीर्घ बजेट स्पीचचा विक्रम त्यांनी नोंदवला होता. त्यांची तब्येतही तेव्हा बिघडली होती. तर आज असेच काही बजेट मोमेन्टस आणि दोन कहाण्या...
टॅब्लेटवरून भाषण वाचले, नंतर कागदही उचलला: तीन वर्षांपूर्वीपासून निर्मला पेपरलेस बजेट आणत आहेत. 2022 ची गोष्ट आहे. निर्मला टॅबलेटमध्ये बघून बजेट वाचत होत्या. सुमारे 1 तास 20 मिनिटांनंतर जीएसटीची आकडेवारी सांगण्यासाठी त्यांना कागद उचलावा लागला. त्यांचा संकल्प मोडला.
कोरोनाचे नियम बनले, पण अंतर पाळले नाहीः 2022 मध्ये कोरोना नियम तर बनले, मात्र सदनात सोशल डिस्टन्सिंग पाळली गेली नाही. डेस्कसमोर फायबर सीट लावण्यात आले. पंतप्रधानांसह सर्व खासदारांनी मास्क घातला होता.
बोलता बोलता आजारी पडल्या अर्थमंत्रीः सुमारे अडीच तास बोलल्यानंतर निर्मलांची तब्येत बिघडली. हरसिमरत कौर मदतीसाठी त्यांच्याजवळ पोहोचल्या. काही औषधेही दिली. यावेळी राजनाथ सिंह त्यांनी बजेट न वाचण्याचा सल्ला देत होते. पण निर्मलांनी पुन्हा वाचायला सुरुवात केली. मात्र शेवटची दोन पाने न वाचता बसल्या. ही घटना 2020 मधील बजेटदरम्यानची आहे.
खासदार आळसावलेले दिसले, काहींनी डुलकीही घेतलीः जस-जसे 2020 चे भाषण लांबत गेले, खासदारही आळसावलेले दिसायला लागले. काहींनी डुलकीही घेतली. मात्र कॅमेरा दिसताच पुन्हा झटकन उठलेही. कुणाला जवळ बसलेल्या सहकाऱ्याने हलवून उठवले.
सुटकेसच्या जागी वहीखाते (चोपडी) : इंदिरांनंतर निर्मला अर्थसंकल्प सादर करणाऱ्या दुसऱ्या महिला होत्या. 2019 मध्ये बजेटमध्ये एक परंपरा मोडित काढल्याने त्यांची चर्चा झाली. त्या मंत्रालयातून निघाल्या तेव्हा त्यांच्या हातात सुटकेसऐवजी वहीखाते म्हणजेच चोपडी होती. लाल रंगातील चोपडी घेऊन त्या निघाल्यावर टीव्हीवर ब्रेकिंग सुरू झाली. सोशल मीडियावर त्यांचे फोटो शेअर व्हायला लागले.
आता 2 रंजक किस्सेः इंदिरांची माफी, देसाईंच्या 2 जन्मदिनी 2 बजेट
1964 आणि 1968 मध्ये दोनवेळा असे झालेः हाही अनोखा योगायोग आहे. एखाद्या अर्थमंत्र्याला आपल्या वाढदिवसाला बजेट सादर करण्याची संधी मिळाली. 29 फेब्रुवारीला गुजरातच्या वलसाडमध्ये जन्मलेल्या मोरारजी देसाईंसोबत असेच झाले. 1964 आणि 1968 च्या 29 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री म्हणून त्यांनी बजेट स्पीच दिले. त्यांनी एकूण 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला. यापैकी 8 पूर्ण आणि 2 अंतरिम अर्थसंकल्प होते.
मोठा निर्णय घेण्यापूर्वी इंदिरांची माफीः 1970 मध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. मोरारजी देसाईंनी अचानक राजीनामा दिल्यानंतर त्यांनी अर्थमंत्रालय आपल्याकडे घेतले आणि 28 फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यासाठी पोहोचल्या. मात्र त्यांनी माफ करा म्हणताच सदनात शांतता पसरली. सगळे आश्चर्याने एकमेकांकडे बघायला लागले. इंदिरा हसल्या आणि म्हणाल्या, 'माफ करा, मी यावेळी सिगारेट पिणाऱ्यांच्या खिशावरील ओझे वाढवणार आहे.' तेव्हा सर्वांना समजले. इंदिरा गांधींनी सिगारेटवरील कर 3 टक्क्यांवरून 22 टक्के केला. सिगारेटवर एकाच वेळी 633 टक्के कर वाढला. सदनातील खासदार बाके वाजवायला लागले.
मनमोहन यांच्या शायराना बजेटमध्ये बिस्मिल आणि इक्बालः गंभीर आणि इंटेलेक्चुअल इमेज असलेल्या मनमोहन सिंग यांनी 1991 आणि 1992 च्या बजेटमध्ये कविता आणि अल्लामा इक्बाल यांच्या शायरीचा उल्लेख केला.
यूनान, मिस्र, रोम सब मिट गए जहां से,
अब तक मगर हैं बाकी, नामो निशां हमारा॥
कुछ बात है कि हस्ती, मिटती नहीं हमारी,
सदियों रहा है दुश्मन, दौर ए जहां हमारा॥
मनमोहन यांनी 1992 मधील आपल्या बजेट स्पीचचा शेवट कवितेने केला. बिस्मिल अजीमाबादींच्या कवितेचाही त्यांनी उल्लेख केला.
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
देखना है ज़ोर कितना बाज़ू-ए-क़ातिल में है
आता किस्से बजेटनंतरचे... जेव्हा नरसिंह राव यांनी चंद्रशेखर यांना म्हटले-अर्थमंत्री तुमचाच तर माणूस आहे
1991 मध्ये पीव्ही नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये मनमोहन सिंग अर्थमंत्री होते. त्यांच्या अर्थसंकल्पाने देशात उदारीकरणाला सुरुवात केल्याने ते चर्चेत राहिले. अर्थसंकल्पातील घोषणेनंतर चर्चा सुरू झाली. विरोधही झाला.
विनय सीतापतींनी नरसिंह राव यांचे आत्मचरित्र द मॅन हू रिमेड इंडियामध्ये या बजेटचा एक किस्सा लिहिला आहे. पुस्तकानुसार, 1991 च्या बजेटचे पहिले दस्तावेज मनमोहन सिंग यांनी नरसिंह राव यांना दाखवले तेव्हा त्यांचे उत्तर होते, 'मी तुम्हाला यासाठीच निवडले होते का?'
वास्तविक या बजेटचा मसुदा समाजवादी सुधारणांनी प्रेरित होता. मनमोहन सिंग यांना ही गोष्ट टोचली. 24 जुलै 1991 रोजी बजेट सादर करताना त्यांनी बजेट भाषणांच्या इतिहासातील सर्वात दीर्घ भाषण दिले. ते 18650 शब्दांचे होते. तथापि, जसे भाषण संपले सदना गोंधळ सुरू झाला. कम्युनिस्टांपासून ते भाजप आणि समाजवादींनी याला विरोझ केला.'
याच दरम्यान माजी पंतप्रधान चंद्रशेखर म्हणाले, असेच ईस्ट इंडिया कंपनीही भारतात आली होती आणि देश गुलाम बनला. यावर पंतप्रधान नरसिंह राव यांनी मध्येच त्यांना थांबवत म्हटले - 'चंद्रशेखर जी मी तर तुमच्याच माणसाला अर्थमंत्री बनवले आहे. मग तुम्ही टीका का करत आहात'
चंद्रशेखर यांनी नरसिंह राव यांना उत्तर दिले, 'नरसिंह राव जी, तुमची गोष्ट बरोबर आहे. पण जो चाकू आपण भाजी कापण्यासाठी आणला होता, त्याने तुम्ही ह्रदयाची शस्त्रक्रिया करत आहात.' यानंतर सर्व हसायला लागले.
आता शेवटी
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.