जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Business Special

Business Special

 • नवी दिल्ली - सहा वर्षांच्या नीचांकी पातळीवर आलेल्या आर्थिक विकास दरात तेजी आणण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी रिअल इस्टेट व निर्यात क्षेत्रांसाठी ७० हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची शनिवारी घोषणा केली आहे. परवडणाऱ्या घर योजनेतील घरांसाठी प्रतीक्षा करणाऱ्यांसाठी यात सर्वात मोठी घोषणा आहे. ६० टक्क्यांपर्यंत पूर्ण होऊन नंतर रखडलेल्या परवडणाऱ्या (अॅफोर्डेबल) घर योजनेतील प्रकल्पांसाठी २० हजार कोटी रुपयांचा निधी राहील. यापैकी १० हजार कोटी सरकार देईल व तेवढीच रक्कम बाहेरील...
  September 15, 07:48 AM
 • देशात विक्रीच्या अनेक संधी, पुरवठा वाढल्यास मिळेल विकासाला गती - अमित गुप्ता, सहसंस्थापक व सीईओ, ट्रेंडिंग बेल्स... काेणत्याही देशाचा शेअर बाजार साधारणत: त्या देशाच्या अर्थव्यवस्थेचे द्याेतक असताे. शाॅर्ट टर्ममध्ये शेअर बाजारातील सेंटिमेंट आणि मागणीचा पुरवठादारांवर परिणाम हाेऊ शकताेे. परंतु लाँग टर्ममध्ये शेअर बाजार हा भक्कम अशा मूलभूत घटकांच्या आधारावर चालत असताे. एक स्थिर सरकार आर्थिक सुधारणा आणि व्यावसायिक घडामाेडींना चालना देण्यासाठी वेगाने निर्णय घेऊ शकते. असे निर्णय...
  September 14, 09:57 AM
 • लंडन : चांगले कर्मचारी लवकर नोकरी सोडून जाऊ नयेत यासाठी विदेशातील कंपन्या अनेक नवनवीन क्लृप्त्यांचा वापर करत आहेत. इंग्लंड आणि युरोपातील काही कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांनाच त्यांचा पगार ठरवण्यासाठी सांगताहेत. काही कंपन्या कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी त्यांना मोफत चित्रपट तिकीट, जिमचे पास यांसारख्या सुविधा देत आहेत. इंग्लंडमध्ये कारकीर्दीच्या प्रारंभीच्या दोन वर्षांत ८४% युवा नोकरी बदलत आहेत, संशोधनाचा निष्कर्ष... एका संशोधनानुसार, ८४ टक्के तरुण वर्ग आपल्या कारकीर्दीत पहिल्या...
  September 14, 08:01 AM
 • बीजिंग - अलिबाबा ग्रुपचे संस्थापक जॅक मा आपल्या ५५ व्या वाढदिवसाच्या दिवशी कंपनीतून निवृत्त झाले. त्यांनी आपल्या कंपनीची सूत्रे डॅनियल झांग यांच्याकडे साेपवली आहेत. आता ते शिक्षण आणि समाजसेवेवर अधिक लक्ष केंद्रित करतील, अशी अपेक्षा आहे. जॅक मा एकेकाळी शिक्षक हाेते. त्यामुळे त्यांना शिक्षणाची जास्त गाेडी आहे. एक सामान्य शिक्षकापासून ते अब्जावधी रुपयांचे साम्राज्य उभे करण्याचा प्रवास जॅक यांनी पूर्ण केला आहे. त्यांची मालमत्ता ४ हजार काेटी डाॅलर (अंदाजे २.८ लाख काेटी रु.) आहे. जॅक मा...
  September 11, 10:01 AM
 • मुंबई - मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या 100 दिवसांत शेअर बाजारातील गुंतवणुकदारांना 12.5 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. 30 मे रोजी मोदी सरकार 2चा कार्यकाळ सुरु झाला. या दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज ( बीएसई)वर लिस्टेड कंपन्यांचे कॅपिटलायझेशन 153 लाख 62 हजार 936 कोटी रुपये होता. आता तो 141 लाख 15 हजार 316 कोटी रुपये इतका राहिला आहे. विदेशी गुंतवणुकदारांची विक्री यातील एक मुख्य मानले जात आहे. परदेशी गुंतवणुकदारांनी 100 दिवसांत 31 हजार 700 कोटी रुपये काढून घेतले केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी...
  September 10, 06:42 PM
 • नवी दिल्ली : मंदीच्या वाटेवरून मार्गक्रमण करीत असलेल्या वाहन क्षेत्राची ऑगस्ट महिन्यातील विक्रीची आकडेवारी आणखी चिंताजनक आहे. सलग दहाव्या महिन्यात वाहनांची विक्री घटली आहे. ऑगस्टमध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये ३१.५७ % घट नाेंद झाली आहे. मागील महिन्यात स्थानिक बाजारात एकूण १,९६,५२४ वाहनांची विक्री झाली हाेती. एक वर्षआधी याच कालावधीत २,८७,१९८ प्रवासी वाहनांची विक्री झाली हाेती. साेसायटी ऑफ इंडियन ऑटाेमाेबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) संस्थेने साेमवारी ऑगस्ट महिन्याती वाहन...
  September 10, 10:09 AM
 • नवी दिल्ली : उद्याेग सुरू करण्यासाठी साधारणत: वेगवेगळ्या कल्पना आजमावल्या जातात, परंतु अमेरिकेतल्या मॅसाच्युसेट्समध्ये राहणाऱ्या गीतिका श्रीवास्तव यांना ही प्रेरणा मिळाली ती दु:खद घटनेतून. कुटुंबातील सदस्याला कर्कराेगाचे निदान झाल्यावर उपचारासाठी त्यांना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागले. दुसऱ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी गीतिका यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने नव्व्या केअर स्टार्टअप सुरू केले. टाटा मेमाेरियल सेंटर आणि नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या मदतीने क्लिनिकल डेटा अॅनालिसिस...
  September 10, 09:51 AM
 • नवी दिल्ली - भारतीय स्टेट बँकेने आपल्या ग्राहकांना मोठी भेट दिली आहे. बँकेने सर्व कालावधी कर्जाच्या व्याजदरात 0.10% ने कपात केली आहे. एक वर्षाचा मार्जिनल कॉस्ट फंड आधारित कर्ज दर (एमसीएलआर) आता 8.25% ऐवजी 8.15% होणार आहे. एसबीआयची कर्जे एमसीएलआरशी जोडलेली आहेत. एमसीएलआरमधील 0.10% कपातीमुळे 30 लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्जावरील व्याजदर 8.40% कमी करून 8.30% होणार आहे. 10 सप्टेंबरपासून हे नवीन व्याजदर लागू होणार आहेत. सोमवारी बँकेने ही माहिती दिली. एमसीएलआर काय आहे? एसबीआय 2016 पासून एमसीएलआरच्या आधारावर कर्ज देत...
  September 9, 01:33 PM
 • नवी दिल्ली - फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने शनिवारी मोठा निर्णय घेत आपल्या 541 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. यामध्ये ग्राहक, व्यापारी आणि डिलेव्हरी सपोर्ट टीमचा समावेश आहे. आपल्या प्लॅटफॉर्मवर आर्टिफिशियल इंटेलिजेंस तंत्रज्ञानाचा समावेश केल्यामुळे कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्याचे कंपनीने सांगितले. कंपनीच्या मते, या तंत्रज्ञानामुळे थेट ऑटोमेशनद्वारे ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण होत आहे. नोकरीवरून काढलेल्या कर्मचाऱ्यांना दिले 2 महिन्यांचे अतिरिक्त वेतन कंपनीने...
  September 8, 11:20 AM
 • नवी दिल्ली -भारतात खासगी क्षेत्रालाही जीवन विम्याची परवानगी मिळाल्यामुळे आणि एफडीआयची मर्यादा २६%वरून वाढवून ४९ टक्के केल्यामुळे या क्षेत्रात रोजगाराच्या भरपूर संधी निर्माण झाल्या आहेत. वर्ष २०२२ पर्यंत भारतात बँकिंग, वित्तपुरवठा सेवा आणि विमा क्षेत्रात सुमारे १६ लाख अतिरिक्त कुशल कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. विमा क्षेत्रात कारकीर्द घडवण्याच्या मुद्द्यावर दै. दिव्य मराठीने बजाज अलियांझ लाइफ इन्शुरन्स कंपनीचे चीफ एचआर ऑफिसर रुबेन सेल्वाडारई यांच्याशी बातचीत केली....
  September 8, 08:59 AM
 • शिकागो - अमेरिकेच्या शिकागोचा सेकंड सिटी कॉमेडी क्लब गेल्या ६० वर्षांपासून सर्वश्रेष्ठ विनोदासाठी प्रख्यात आहे. तेथे जोआन रिव्हर्स, जॉन कँडी आणि बिल मुरे यांसारख्या हॉलीवूडच्या प्रख्यात विनोदवीरांनी सादरीकरण केले आहे, पण काही दिवसांपासून ते जगातील मोठमोठ्या मॅनेजर्सना प्रशिक्षण देण्यासाठी चर्चेत आहेत. ट्विटर, गुगल, फेसबुक, नाइकी, निसान, मॅकडोनाल्ड्ससारख्या मोठमोठ्या कंपन्या आपले मॅनेजर्स, इंजिनिअर्स आणि एक्झिक्युटिव्हजना येथे विनोदाच्या प्रशिक्षणासाठी पाठवत आहेत. सेकंड सिटी...
  September 8, 07:24 AM
 • मुंबई -भारतीय अर्थव्यवस्थेची सर्वात मोठी ताकद म्हणजे बचतच आहे. विकास दर भलेही थोडा कमी झाला असला तरी देशात बचत वाढली आहे. रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाच्या ताज्या उपलब्ध आकड्यांनुसार २०१७-१८ मध्ये एकूण देशांतर्गत आर्थिक बचत जीएनडीआयच्या (ग्राॅस नॅशनल डिस्पोजल इन्कम) १०.८% राहिली. एक वर्षाआधी ती ९.२% होती. म्हणजे आपली निव्वळ बचतही वाढली आहे. ती २०१७-१८ मध्ये ६.५% होती, तर एक वर्षाआधी हा आकडा ६.२% होता. मात्र या काळात आपली आर्थिक वित्तीय जबाबदारीही (लायबिलिटी) वाढली आहे. ती २०१७-१८ मध्ये ४.३% झाली तर एक...
  September 8, 07:03 AM
 • मुंबई - आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर स्थानिक सराफा बाजारात साेने-चांदीच्या किमतीत तेजीचा कल आहे. स्थानिक बाजारात मंगळवारी चांदीची किंमत एका दिवसात २,०७० रुपयांनी वाढली. दिल्ली आणि मुंबईच्या सराफा बाजारात एक किलाे चांदीची किंमत ५०,१२५ रुपयांवर गेली. चांदी याअगाेदर सहा वर्षांपूर्वी या पातळीवर हाेती. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा भाव प्रती आैंस १९.४ डाॅलरवर गेला. ही गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक किंमत आहे. सराफा बाजार विश्लेषकांच्या मते, अमेरिका- चीन व्यापार युद्ध, ब्रेक्झिटची...
  September 5, 09:44 AM
 • नवी दिल्ली -वाहनांच्या विक्रीमध्ये आॅगस्टमध्ये दाेन दशकांतील सर्वात माेठी घसरण नाेंद झाल्यावर आता उत्पादन क्षेत्रात १५ महिन्यांची सर्वाधिक नरमाई नाेंद झाली आहे. विक्री वाढीव्यतिरिक्त उत्पादन वाढ आणि राेजगारात घट यामुळे उत्पादन क्षेत्राच्या कामगिरीवर विपरीत परिणाम झाला असल्याचे एका मासिक सर्वेक्षणात दिसून आले आहे. त्यानुसार विक्री, उत्पादन आणि राेजगारातील वाढ मंदावल्याने उत्पादन क्षेत्राचा वेग मंदावला आहे. आयएचएस मार्केट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर इंडेक्स...
  September 3, 09:02 AM
 • दै. दिव्य मराठीच्या संकल्पातून सफलताशृंखलेत टूर अँड ट्रॅव्हल इंडस्ट्रीत आपली विशिष्ट ओळख निर्माण करणाऱ्या नीम हॉलिडे प्रा. लि. चे व्यवस्थापकीय संचालक मनीष अग्रवाल यांनी मनमोकळी बातचीत केली. यात त्यांनी भारतीय पर्यटकांच्या आवडत्या ठिकाणांपासून टुरिस्ट मार्केटच्या आजच्या स्थितीबाबत प्रश्नांना उत्तरे दिली. याबरोबरच त्यांनी क्रूझ, साहसी आणि आरोग्य पर्यटनाच्या क्षेत्रातील भारताच्या संधींवरही प्रांजळपणे टिप्पणी केली. त्यांच्याशी झालेल्या बातचितीचे मुख्य अंश : प्रश्न : तुम्ही...
  September 3, 08:57 AM
 • पाश्चिमात्य देशांमध्ये भांडवलशालीचे समाधानकारक परिणाम दिसत नाहीत. या देशांमध्ये भरपूर नोकऱ्या आहेत, पण विकासदर धीमा, असमानता जास्त असून पर्यावरणाकडेही दुर्लक्ष केले जाते. या गोष्टींवर सरकार मार्ग काढेल, अशी नागरिकांना अपेक्षा असते, पण अनेक देशांत नेते निर्णय घेऊ शकत नाहीत किंवा सरकारच अस्थिर आहे. यातून मार्ग कसा काढायचा? अनेकांच्या मते, मोठ्या कंपन्यांनी आर्थिक व सामाजिक समस्या सोडवल्या पाहिजेत. काही दिवसांपूर्वी वॉलमार्ट, जेपी मॉर्गन चेजसह १८० पेक्षा जास्त कंपन्यांच्या सीईओंनी...
  August 31, 09:05 AM
 • पैसे वाढवण्याचा विचार असल्यास आपल्या उत्पन्नातून एक भाग नियमितरित्या गुंतवण्याचा सर्वात चांगला आर्थिक निर्णय तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही अप्रवासी भारतीय आहात तर तुम्हाला हा नियम लागू होतो. कारण, तुम्ही निवडलेल्या गुंतवणुकीचा लाभ पर्यायांच्या आधारे घेता येईल. फायद्यासाठी तुम्हाला बचतीची रक्कम विविध गुंतवणुकीच्या साधनांमध्ये लावण्याचा प्रयत्न करायला हवा. जर जोखिम पत्करणारे गुंतवणूकदार असाल तर तुमच्याकडे खुश होण्याचे एक कारण आहे. कारण, तुम्ही एनआरआयसाठी बनवलेल्या फिक्स्ड...
  August 29, 12:29 PM
 • ओक्लाहोमा सिटी - जॉन्सन अँड जॉन्सन या औषधी कंपनीवर अमेरिकेतील ओक्लाहोमा राज्यातील एका न्यायालयाने ओपिऑइड संकटात सापडल्याने ५७.२ कोटी डॉलर (सुमारे ४ हजार कोटी रुपये) दंड ठोठावला आहे. कंपनीने या निर्णयास वरिष्ठ न्यायालयात आव्हान देण्याची तयारी केली आहे. अमेरिकेत ओपिऑइड संकट प्रकरणात अनेक खटले सुरू आहेत. ओक्लाहोमा येथेही २ हजार खटले दाखल झाले आहेत. जॉन्सन अँड जॉन्सचा खटला सर्वप्रथम सुरू झाला. ओपिऑइडचा वापर वेदनाशामक औषधांत केला जातो. १९९९ ते २०१७ पर्यंत अमेरिकेत या औषधांच्या अतिसेवनाने ४...
  August 28, 02:15 PM
 • नवी दिल्ली -आेला, उबरसारख्या प्लॅटफाॅर्मवर टॅक्सीचालक, झाेमॅटाे, फूडपांडा, स्विगीसाठी खाद्यपदार्थ डिलिव्हरी करणारे लाेक, फायबरसारख्या प्लॅटफाॅर्मवर वेब डिझाइन करणारे व्वयावसायिक या सर्वांना आपल्या कामाच्या माेबदल्यात पैसे मिळतात. परंतु ते आेला, उबर, झाेमॅटाे, स्विगी किंवा फायबर यांचे कर्मचारी नसतात. जितके काम केले किंवा टास्क पूर्ण केले तर त्यानुसार त्यांना पैसे मिळतात. राेजगाराच्या या यंत्रणेला गिग इकाॅनाॅमी म्हणतात. सध्याची आकडेवारी बघता जगातील जवळपास २० टक्के मनुष्यबळ आजही...
  August 27, 09:43 AM
 • मुंबई -अलीकडेच सेकंड हँड साहित्य खरेदी-विक्री करणाऱ्या ओएलएक्स अॅपवर प्रथमच एमजी हेक्टर कार विक्रीस आली. विशेष म्हणजे नवी गाडी उपलब्ध नसल्याने तिच्या मूळ किमतीपेक्षा जास्त ३ लाख रुपये देऊन ती मागण्यात आली. हे तर एक उदाहरण आहे, सेकंड हँड्सबद्दलचे वेड देशात वाढत आहे. सध्या देशात सेकंड हँड मार्केट वार्षिक ५% या दराने वाढत आहे. भारतीय वाणिज्य आणि उद्योग मंडळाचे (असोचेम) उपाध्यक्ष निरंजन हिरानंदानी यांनी सांगितले की, सध्या देशात सेकंड हँड साहित्याचा संघटित बाजार १ लाख २३ हजार कोटी...
  August 26, 09:35 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात