Home >> Business >> Gadget

Gadget News

 • कॅनडाची कंपनी रिसर्च इन मोशनचा हा फोन प्रोफेशनल्सची सर्व गरज भागवणारा आहे. ब्लॅकबेरी 9900 मॉडेल काळाच्या कसोटीवर खरे उतरले आहे. या फोनचे की पॅड सर्वांचे आकर्षण बनले आहे. यातून बॅकग्राउंड लाइट येते. त्यामुळे टायपिंगला मदत होते. तसेच स्पेस चांगली असल्याने टायपिंग सहजरीत्या करता येते. अक्षरामध्ये अंतर राहत असल्याने चुकीच्या जागी बोटे जाण्याची धास्ती राहत नाही. दिसण्यास हा फोन पूर्वीच्या बोल्डसारखाच असला तरी यात अत्याधुनिक सेवा-सुविधा आहेत. याचे डिझाइनही आकर्षक आहे. याच्या चारही बाजू...
  January 13, 12:39 AM
 • कॉम्प्युटरच्या क्षेत्रात रोज नवे प्रयोग होत असतातच. लॅपटॉप, पामटॉप... त्यानंतर आता टॅबटॉप कॉम्प्युटर जगताच्या उंबरठ्यावर उभा आहे. टॅबटॉप विशेषकरून महिला वर्गाला समोर ठेवून बनवण्यात आला आहे. याची स्क्रीन साधारणत: 7 इंच आणि वजन 275 ग्रॅम इतके आहे. हा वजनाने हलका आणि आकाराने लहान असल्याने महिलांच्या पर्समध्ये सहजपणे बसू शकतो. यामध्ये 1.2 गीगाहर्ट्झचा प्रोसेसर, यूएसबी होस्ट, यूएसबी 2.0, एसडी कार्ड आणि 8 तासांचे बॅटरी बॅकअप अशा सुविधा देण्यात आल्या आहेत. इतक्या सर्व सुविधा उपलब्ध असल्याने याची...
  January 13, 12:35 AM
 • अॅपल कंपनीचा नवा आयफोन आवाजावर चालणारा आहे. विश्वास नाही ना बसत? पण हे खरे आहे. आयफोन एस फोर व्हाइस रिकग्नेशन तंत्रावर आधारित आहे. अशा प्रकारची सुविधा कोणत्याच मोबाइलमध्ये उपलब्ध नव्हती, पण हा मोबाइल आवाजावर चालेल. आतापर्यंत आयफोन फोर एसमध्ये टाकलेल्या अॅप्लिकेशन्सद्वारे एसएमएस बोलून टाइप केले जात होते, पण आता मोबाइलच आपल्या आवाजाच्या इशायावर नाचेल. अॅपेलच्या नव्या अॅप्लिकेशन सिरीजमध्ये या सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. व्हाइस रिकग्नेशन तंत्रावर आधारित असल्याने आयफोन फोर एसमध्ये...
  January 13, 12:30 AM
 • जपानी कंपनी फुजित्सूने एक वाटरप्रुफ टॅबलेट कॉम्प्युटर तयार केला आहे. लास वेगास येथे सुरु असलेल्या 'कन्झ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शो २०१२' मध्ये हा टॅबलेट कॉम्प्युटर सादर करण्यात आला. या टॅबलेटचे नाव ऐरोज असून याचे वैशिष्ट्य म्हणजे ५ फूट खोल पाण्यात हा टॅबलेट अर्ध्या तासापर्यंत टाकून दिला तरी तो खराब होणार नाही. हा टॅबलेट अॅड्राॅईडच्या हनीकॉम्ब ऑपरेटिंग सिस्टीमवर चालतो. याचे वजन ६०० ग्रॅम असून यात २ कॅमेरे आहेत. पुढील भागात ५.१ मेगापिक्सल आणि मागील भागात १.३ मेगापिक्सल कॅमेरे असून याने...
  January 12, 04:12 PM
 • या मोबाईलची अनेक दिवसापासून सगळेजण आगदी आतुरतेने वाट पाहत होते. तसेच बरीच प्रतिक्षा केल्यानंतर नोकियाने अखेर हा शानदार मोबाईल बाजारात दाखल केला आहे. नोकियाने आशा २०० आणि आशा ३०० हे मोबाईल बाजारात सादर केले आहेत. देश-विदेशातील कंपन्यांचा मागील काही दिवसापासून सामना करीत असलेल्या नोकियाने आशा-२०० व आशा -३०० यांना आपल्या पोर्टफोलियोमध्ये सामील केले आहे.आशा-२०० व आशा-३०० आणि एक्स टू मोबाईलधारकांना आकर्षित करण्यासाठी बनविले गेले आहेत. नोकियाने आशाची किमत भारतात ४३४९ रुपये तर, एक्स-२-०२ची...
  January 11, 02:08 PM
 • हा लॅपटॉप इतका स्लिम आहे की आपला त्यावर विश्वासच बसणार नाही. हा लॅपटॉप केवळ स्लिमच नाही तर सगळ्यात हलकासुद्धा आहे. एसर कंपनीच्या या लॅपटॉपला एसपायर एस ५ असे नाव देण्यात आले आहे. याचे वजन केवळ १.३५ किलो एवढे कमी आहे. याची एलसीडी स्क्रीन १३.३ इंच (३४ सेंटीमीटर) आहे. एसरचा हा अल्ट्राबुक लॅपटॉप हा सामान्य लॅपटॉप नाही तर तो अनेक वैशिष्ट्यांनी व सुविधायुक्त आहे. जो तुम्हाला वापरल्यानंतरच कळेल.या लॅपटॉपची बॅटरीही जबरदस्त आहे. यात पावर सेविंग फीचर्ससुद्धा आहे. इंटरनेट वापरणारयांना हा लॅपटॉप...
  January 10, 05:30 PM
 • या वर्षी दाखल होणारा फेसबुकचा फीचर फोन लोकांना सोशल नेटवर्किंगचा आनंद देण्याचे काम करेल. यामुळे वेबमध्ये सोशल नेटवर्किंग रियल टाइममध्ये समोर येईल. तसेच लोकप्रिय गेम्सची तिसरी आवृत्ती पाहायला मिळेल. मोठ्या स्क्रीनसह येणार आयफोन-5गेल्या काही वर्षांमध्ये मोबाइल तंत्रज्ञानात अनेक बदल पाहायला मिळाले, परंतु आता हेच तंत्रज्ञान कायम होत चालले आहे. आता सध्याचे तंत्रज्ञानच विकसित केले जात आहे. याच श्रेणीतील आयफोन-5 मध्येही काही किरकोळ बदल करण्यात आले आहेत. उदाहरणार्थ या फोनची स्क्रीन आता 5...
  January 10, 08:49 AM
 • कोरियन कंपनी सॅमसंगने स्मार्टफोनच्या बाबतीत नोकियाला भारतात जबर मात दिली आहे. कंपनीने गेल्या तीन महिन्यांत भारतात सर्वाधिक फोनची विक्री केली आहे. भारतात नोकिया स्मार्टफोनच्या बाजारपेठेत नंबर एकवर आहे, पण या महिन्यातील आकडेवारीनुसार सॅमसंगचा मार्केट शेअर 38 टक्के झाला. किमतीच्या दृष्टीने याचा हिस्सा 35.2 टक्के इतका राहिला. सॅमसंगचा सर्वात स्वस्त फोन साडेसहा हजार इतका होता. असे सांगितले जाते की, जागतिक स्मार्टफोन बाजारात सॅमसंगने गेल्या वर्षी दोन कोटी 80 लाख फोन विकले होते. नोकियाला आता...
  January 6, 12:26 AM
 • जगात आतापर्यंत अशाप्रकारचा टीव्ही तयार झालेला नाही. एलजी कंपनी पहिल्यांदा अशा प्रकारचा टीव्ही बनवत आहे. पुढच्या आठवड्यात होणा-या इलेक्ट्रॉनिक शोमध्ये कंपनी जगातील सर्वात मोठा ओएलइडी एचडीटीव्ही सादर करणार आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे याला बॉर्डर नसणार आहे, टीव्ही पाहताना तुम्हाला असे वाटेल की, एखाद्या खिडकीतून दृश्य पाहत आहोत. हायडेफिनेशन टीव्ही असल्याने याची पिक्चर क्वॉलिटी साधारण टीव्हीपेक्षा दर्जेदार असेल. एलजी कंपनीच्या मते, ते उत्कृष्ट टीव्हीच सादर करणार आहेत, असे नसून त्याची...
  January 6, 12:25 AM
 • उत्तम दर्जा असलेला टॅब्लेट कॉम्प्युटर बाजारात अर्ध्या किमतीत मिळत असेल, तर घ्यायला नकार कशाला देताय? पण ही सवलत आठवडाभरासाठीच उपलब्ध आहे. ब्लॅकबेरी बनवणा-या रिसर्च इन मोशनचा प्लेबुक टॅब्लेट कॉम्प्युटर बाजारात हातोहात विक्री होत आहे. अर्ध्या किमतीमुळे कंपनीने ही योजना आणखी एका आठवड्यासाठी वाढवली आहे. ब्लॅकबेरीने प्लेबुक 16 जीबी मॉडेलची किंमत अर्ध्याहून अधिक घटवली होती. बाजारात ब्लॅकबेरीचा प्लेबुक 13 हजार 390 रुपयांत मिळतो. टॅब्लेट कॉम्प्युटरच्या बाजारपेठेत जबरदस्त स्पर्धा चालल्या...
  January 6, 12:24 AM
 • प्रसिद्ध मोबाइल कंपनी नोकियाने नवा धमाकेदार फोन बाजारात सादर केला आहे. या फोनचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हा म्युझिक फोन आहे. तसेच यात ड्युअल सिमची सोय आहे. नोकिया एक्स 2-02 मॉडेलच्या फोनमध्ये एफएम रेडिओ, एमपीथ्री, आणि 32 जीबीपर्यंत वाढवली जाणारी मेमरी कार्ड क्षमता आहे. या फोनचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा आकाराने पातळ आहे. याचे वजन फक्त 93 ग्रॅम आहे. तसेच नोकियाकडून अनलिमिटेड सुमधुर गाणी आणि संगीताची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचे स्क्रीन 2.2 इंचाचे आहे. या फोनमधील गाणी आपल्या म्युझिक सिस्टिम...
  January 6, 12:22 AM
 • नवी दिल्ली - देशात चीनी बनवाटीचे मोबाईल फोन, दुरचित्रवाणी संच, म्युझिक सिस्टीम, संगणक इत्यादी वस्तू मोठ्या प्रमाणात विक्री होतात. मात्र भारत सरकारने आता या वस्तूंवर बारीक नजर ठेवण्याचा निश्चय केला आहे. सरकार कठोरपणे गुणवत्ता नियंत्रण करणार असून निकृष्ट इलेक्ट्रॉनिक वस्तू बाजारात येणार नाही याची पूर्ण खबरदारी घेणार आहे. सरकार १६ इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा त्यात समावेश करण्याची शक्यता आहे. त्यात मोबाईल, संगणक, दुरचित्रवाणी संच यासह इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे गुणवत्ता नियंत्रण केले जाणार...
  January 5, 03:25 PM
 • नवी दिल्ली - जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट कॉंप्युटर 'आकाश'चे अपग्रेडेड व्हर्जनही ( यूबीस्लेट ७ प्लस ) जानेवारी - फेब्रुवारीसाठी बुक झाले आहेत. आता मार्चसाठी बुकिंग सुरु आहे. यूबीस्लेट ७ प्लस हा आकाशपेक्षा ४०० रुपयांनी महाग आहे. यामध्ये अनेक अपग्रेडेड फीचर्स आहेत. एंड्राॅयड २.३ प्रोसेसर, २५६ एमबी रॅम आणि २ जीबी इंटरनल मेमरी आहे, ७ इंच डिस्प्ले असलेल्या या टॅबलेटमध्ये रेझीस्टिव्ह टचस्क्रीन आहे. हा टॅबलेट जीपीआरएस आणि वायफायवर डाटा सपोर्ट करेल.या टॅबलेटचे वैशिष्ट्य म्हणजे यात जीएसएम सिम घालून...
  January 5, 08:54 AM
 • नवी दिल्ली - जगातील सर्वात स्वस्त टॅबलेट आकाशने बुकिंगचे आजवरचे सारे रेकॉर्ड मागे टाकले. केवळ २ आठवड्यात १४ लाख टॅबलेट बुक झाले आहेत.आकाश टॅबलेटची किंमत केवळ २५०० रुपये आहे. त्यामुळे मागणी प्रचंड प्रमाणात वाढली. वाढत्या मागणीमुळे तीन नवीन कारखाने सुरु करण्यात येत आहेत. आकाशची निर्मिती करणारी ब्रिटनची कंपनी डेटाविंडचा सध्या भारतात हैदराबाद येथे एकच कारखाना आहे. वाढत्या मागणीमुळे नोएडा, कोचिन आणि हैदराबाद येथे नव्याने कारखाने उघडण्यात येत आहेत.आकाश कॉम्प्युटर खरेदीसाठी प्रचंड...
  January 3, 04:34 PM
 • पर्सनल कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि टॅबलेट या तीन्हीला सपोर्ट करणारी ऑपरेटिंग सिस्टम विंडोजने पहिल्यांदाच लॉंच केली आहे. याच्या वेगाबद्दल बोलाल तर फक्त ८ सेकंदात तुमचा लॅपटॉप सुरु होईल. यामध्ये पहिल्यांदाच मेट्रो इंटरफेसचा वापर केला आहे. आजवर याचा वापर केवळ विंडोज फोनमधेच केला जायचा. यामुळे अप्लीकेशन्सही वेगाने रन होतील. लॉग इन करण्यासाठी पासवर्ड टाईप करण्याऐवजी स्क्रीनवर इमेजला टच करून लॉग इन करता येईल. चांगली गोष्ट म्हणजे ज्या कॉन्फिग्युरेशनवर विंडोज-७ चालू आहे, त्यावरच विंडोज-८ सुद्धा...
  January 1, 03:03 PM
 • नवीन एंड्रॉइड-४ आता स्मार्ट फोन आणि टॅबलेटसाठी कॉमन असेल. याआधीचे व्हर्जन हनीकॉम्बचा उपयोग केवळ टॅबलेटसाठी होत असे. एंड्रॉइड-४ मध्ये विजेट्सचा आकार कमी किंवा जास्त करणे सहज शक्य होणार आहे. आपल्या आवडीचे अप्लीकेशन्स शोधणेही सुलभ होणार आहे.आयफोनप्रमाणे फोल्डरमध्ये अप्लीकेशन्स सेव करणे शक्य होईल. यामध्ये चेहरा ओळखून फोन लॉक करण्याची व्यवस्था असेल. याशिवाय इनकमिंग कॉलच्या वेळी फोन अनलॉक न करता मेसेज पाठविता येईल. ओपन माईकच्या मदतीने बोलून कंटेंट लिहिता येऊ शकेल. ऑफलाइन सर्च करून ३० दिवस...
  January 1, 02:22 PM
 • नवी दिल्ली- सन २०११ हे वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांनी आणलेल्या टॅबलेट पीसीने गाजविले. त्याआधीचे म्हणजे २०१० हे वर्ष भारतात ड्यूल सीमने गाजविले होते. २०११ मध्ये गॅझेटमधील नव्या उपकरणात सर्वाधिक विकले जाणारे उपकरण हे टॅबलेट पीसी ठरले आहे. एप्पलसह सॅमसंग आणि ब्लॅकबेरी (रिम)ने हे वर्ष तुफान गाजविले. गेल्या काही वर्षात कोट्यावधी मोबाईल फोन विकले गेले. पण टेलिकॉम सेक्टरमध्ये टॅबलेटने दुसरया क्रमांकाची बाजारपेठ तयार केली. यात पीसीत आयपॅड, प्लेबुक आणि गॅलक्सी टॅब तसेच भारतातील जगात सर्वात...
  January 1, 12:00 PM
 • गॅझेट व टेलिकॉम क्षेत्रात २०११ मध्ये बाजारात काही जबरदस्त उत्पादन पाहण्यास मिळाली. यावर्षी सॅमसंग गॅलक्सी एस२, गॅलक्सी नेक्सस, आयपॅड२, आयफोन ४ एस, गुगल एंड्रायड आइस्क्रीम सॅंडविच अशी अनेक उत्पादने युजर्सच्या हाती आली. गॅझेटसाठी २०११ उत्तम गेले पण २०१२ त्याला काही कमी जाणार नाही हेही तितकेच खरे.गॅझेटप्रेमी पाहताहेत यांची वाटआयफोन-५ - जेव्हा ऑक्टोबरमध्ये एप्पलने आयफोन एस-४ हा फोन सादर केला तेव्हा त्यांनी पुढील वर्षी आयफोन-५ सादर करण्याचे म्हटले होते. त्यानुसार २०१२ मध्ये फोन बाजारात...
  December 31, 05:46 PM
 • ब्लॅकबेरीने सात उत्कृष्ट मॉडेल्स भारतात उपलब्ध केले आहेत. यामधील ब्लॅकबेरी टॉर्च 9860 फोनला 3.7 इंच मल्टिटच स्क्रीन लावण्यात आला आहे. तसेच 1.2 गीगाहर्ट्झचे प्रोसेसर लावण्यात आले आहे. ब्लॅकबेरी 9900 मध्ये 768 एमबीचा रॅम असून पाच एमपीचा कॅमेराही आहे. ब्लॅकबेरी कर्व 9360 मध्ये एक हजार मेगाहटर्झची बॅटरी लावण्यात आली आहे. त्यामुळे बराच वेळ बॅटरी चार्ज न करता बोलता येऊ शकते. ब्लॅकबेरीने भारतीय बाजारपेठेत आपली पकड मजबूत करण्यासाठी संपूर्ण ताकद वापरली आहे. यामुळेच कंपनी विविध प्रकारचे फोन माफक किमतीत...
  December 30, 12:16 AM
 • कॅमेरा असलेल्या हॅण्डसेटला सर्वाधिक पसंती असते. त्यामुळे सर्व कंपन्या एकाहून एक सरस असे कॅमेरा फोन असलेले हॅण्डसेट बाजारात आणत आहेत. या शृंखलेत नोकिया एन 8 ने सर्वात पुढचे पाऊल उचलले आहे. त्याचा पाठीमागील कॅमेरा 12 मेगापिक्सलचा आहे. त्यामुळे याचे मोठे कौतुकही झाले. पण आणखी एक मोबाइल असा येतो आहे की, याचा कॅमेरा खूप शक्तिशाली आहे. त्यामुळे कोणत्याही मोबाइलला जबरदस्त स्पर्धा करू शकेल. सोनी इरिक्सन कंपनीचा हा स्मार्टफोन आहे. याचा कॅमेरा विस्मयचकित करून सोडणारा आहे. या कंपनीचा आणखी एक मॉडेल...
  December 30, 12:15 AM
 
जाहिरात

RECOMMENDED