Home >> Business >> Gadget

Gadget News

 • प्रसिद्ध सोनी कंपनीने नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. कंपनीने सर्वांचे अंदाज चुकवत केवळ 48 तासांत सव्वातीन लाख प्लेस्टेशन विटा पोर्टेबल गेमिंग सिस्टिमची विक्री केली. रिसर्च फर्म इंटरब्रेननुसार कंपनीने विक्री करण्याची घोषणा करताच, ग्राहकांची मोठी गर्दी उसळली. लोकांनी मोठ्या संख्येने व्हिडिओ गेम मशीनची खरेदी के ली. सोनीने यापूर्वीही प्लेस्टेशन सादर केले होते.त्याला इतके यश मिळाले नव्हते, पण या गेमिंग मशीनने नवा उच्चांक गाठला आहे. सोनी कंपनी उत्तर अमेरिका आणि युरोपात...
  December 30, 12:14 AM
 • गॅजेटच्या दुनियेत रोज नवे विस्मयचकित करणारे प्रयोग होत असतात. मीडिया मॅट नावाचा हा लॅपटॉप पोळीप्रमाणे गुंडाळून याला कोठेही घेऊन जाऊ शकता. त्यामुळे इतर लॅपटॉपच्या तुलनेत हा नेण्यासाठी अत्यंत सहजसोपा आहे. हा फ्लॅट स्क्रीन असलेला पोर्टेबल लॅपटॉप असून, गरज भासल्यास याला फोल्ड करता येतो. कंपनीने या लॅपटॉपची फारशी माहिती उपलब्ध करून दिलेली नाही, पण फेब्रुवारीच्या मध्यात हा लॅपटॉप भारतात प्रचलित होऊ शकतो. चित्रविचित्र डिझाइनमुळे लोकांमध्ये या लॅपटॉपबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.
  December 29, 11:32 PM
 • नवी दिल्ली - ब्लॅकबेरी मोबाइल फोनची निर्मिती करणा-या रिसर्च इन मोशन (रिम) कंपनीने आपल्या प्लेबुक या टॅब्लेट कॉम्प्युटरच्या दरात तब्बल 50 टक्क्यांपेक्षा अधिक घसघशीत कपात केली आहे. भारतात 16 जीबीचा प्लेबुक फक्त 13, 490 रुपयांत मिळणार आहे. सणासुदीचा हंगाम आणि टॅब्लेट पीसीच्या वाढत्या मागणीला कॅश करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. रिमने गेल्या जून महिन्यांत आपला प्लेबुक टॅब्लेट बाजारात उतरवला होता. 16 जीबीचा प्लेबुकची किंमत 27, 990 रुपयांवरून 50 टक्क्यांनी कमी करून तो 16,490 रुपयांत उपलब्ध करून देण्यात...
  December 28, 11:27 PM
 • फिनलॅंडची कंपनी नोकियाने बाजारात आतापर्यंत अनेक मोबाईल सादर केले आहेत. कंपनी आता आणखी एक अनोखा फोन सादर करण्याच्या तयारीत आहे. नोकियाकडून असा फोन सादर केला जाणार आहे की, तुम्ही हवे तेव्हा कधीही आणि कोठेही त्यात टीव्ही पाहू शकता. हा फोन 801 T असून हा टीव्ही टेक्नॉलॉजीने परिपूर्ण आहेच पण त्याला एक ऐंटिना असणार आहे. त्यामुळे तुम्हाला टीव्ही पाहण्यास मदत होणार आहे. या फोनची स्क्रीन ४ इंच एवढ्या आकाराची ठेवली आहे. या फोनची बॉडी स्टेनलेस स्टीलची आहे. त्यात बिल्ट टेलीस्कॉपिक टीव्ही ऐंटिना ठेवला...
  December 28, 05:25 PM
 • ब्लॅकबेरीने नेहमीप्रमाणेच आघाडी घेत भारतात सात मॉडेल्स बाजारात आणली आहेत. यात ब्लॅकबेरी टॉर्च ९८६० फोनमध्ये ३.७ इंचचा मल्टी टच स्क्रीन आहे. यात १.२ गीगा हर्टजचा प्रोसेसर लावण्यात आला आहे. ब्लॅकबेरी बोल्ड ९९००मध्ये ७६८ एमबीचा रॅम लावण्यात आला आहे. याचबरोबर पाच एमपीचा कॅमेरा लावण्यात आला आहे. ब्लॅकबेरी कर्व ९३६०त एक हजार एमएएचची बॅटरी लावण्यात आली आहे. जी खूप वेळ चालू शकते.
  December 26, 12:55 PM
 • नवी दिल्ली- मोबाईल हँडसेट बनविणारी कंपनी लावाने स्थानिक बाजारात आपला नवा हँडसेट ए- 16 सादर केला आहे. तसेच हा मोबाईल कंपनीने केवळ 4500 रुपयात ग्राहकांना देऊ केला आहे. या फोनला पाच फुट उंचीवरुन फेकून दिला किंवा 95 किलोपेक्षा अधिक वजनाच्या माणसाने या मोबाईल तुडवले तरी याला काहीही होत नाही. यावेळी बोलताना लावा इंटरनॅशलचे संस्थापक तथा संचालक एस.एन. रॉय म्हणाले, चालू आर्थिक वर्षात कंपनीने एक हजार कोटी रुपयांचे उत्पन्न मिळविण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. कंपनी लवकरच एंड्रॉईडच्या आधारित स्मार्टफोन तसेच...
  December 23, 02:56 PM
 • नवी दिल्ली - जबरदस्त स्पर्धेच्या आजच्या युगात टॉप उत्पादनांवरही अवघड परिस्थिती आली आहे. ब्लॅकबेरी हा स्मार्टफोनही याच परिस्थितीतून जात आहे. ब्लॅकबेरीच्या स्मार्टनेसला आता ग्रहण लागले आहे. अव्वल कंपनी अॅपलचा आयफोन आणि गुगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टिमच्या उदयामुळे ब्लॅकबेरीच्या विक्रीत घट नोंदवण्यात आली आहे. ताज्या आकडेवारीत याबाबत पुष्टी करण्यात आली आहे. अमेरिकेच्या स्मार्टफोन बाजारात गुगल आणि अॅपलचा एकत्रित वाटा 71 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या तेथील बाजारात ब्लॅकबेरीची...
  December 22, 01:45 AM
 • टोकियो- सोनी कंपनीचा पहिलावहिला टॅबलेट पीसी लवकरच येऊ घातला आहे. जानेवारीच्या मध्यावर थ्री-जी टॅबलेट घेऊन येण्याचा संकल्प कंपनीने केला असून त्याचे भारतात लाँचिंग होणार आहे. सोनी कंपनीचा भारतातील हा पहिलाच टॅबलेट पीसी आहे. शुक्रवारी आम्ही वाय-फाय सुविधेसह तो लाँच केला आहे. थ्री-जीसह वाय-फाय सुविधा असलेला टॅबलेट आम्ही पुढील महिन्यात भारतातील ग्राहकांच्या हाती देऊ. चालू आर्थिक वर्षात आमच्या एकूण टॅबलेट विक्रीपैकी 80 टक्के वाटा हा यात समाविष्ट असेल, अशी अपेक्षा सोनीचे व्यवस्थापकीय संचालक...
  December 17, 12:52 AM
 • नवी दिल्लीः सरकारी कंपनी महानगर टेलीफोन निगम लि.ने (एमटीएनएल) स्वस्त आणि मस्त ट्रिपल सिम मोबाइल बाजारात आणला आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तो परिपूर्ण आहे. यासोबत कंपनीने ग्राहकांसाठी खास 'सेकेंड कॉल रेट' ऑफरही दिली आहे. 'ट्रिपल सिम'चा मोबाईलची किंमत तीन हजार रुपये आहे. एमटीएनएलच्या कर्मचार्यांना हा मोबाईल केवळ 2250 रुपयांत मिळणार आहे. मोबाईलमध्ये दोन सिम जीएसएम आणि एक सिम सीडीएमए अशी तीन सिम चालतात. 2 मेगापिक्सल कॅमेरा आणि टॉर्च असून मोबाईलची बॅटरी देखील पॉवरफूल आहे. 2.2 इंच स्क्रीन असणार्या...
  December 16, 01:56 PM
 • जगातील सर्वात स्वस्त टॅबलेटची प्रतीक्षा आता संपली आहे. 'आकाश' नावाचा हा टॅबलेट केवळ २५०० रुपयांत उपलब्ध होणार आहे. हा टॅबलेट डेटाविंड या कंपनीने तयार केला आहे. आतापर्यंत सुमारे ३० हजार टॅबलेटची ऑनलाईन विक्री झाली आहे. या टॅबलेटची डिलेव्हरी सात दिवसांच्या आत होते. ऑन लाईन खरेदी करतानाच पेमेंट करावे लागते. या टॅबलेटसाठी त्वरित ऑर्डर द्यायची असेल तर www.aakashtablet.com या संकेतस्थळावर लॉग इन करा. आकाश टॅबलेटमध्ये अनेक फीचर्स आहेत. या ७ इंच टचस्क्रीन असलेल्या टॅबलेटमध्ये एंड्रॉयड 2.2 (फ्रायो) ओएस सपोर्ट...
  December 16, 10:12 AM
 • इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील प्रसिद्ध सॅमसंग कंपनीने सर्वप्रथम ड्वेल स्क्रीन मोबाइल फोन बाजारात आणणार आहे. यात दोन स्क्रीन देण्यात आल्याने हा वैशिष्ट्यपूर्ण मानला जात आहे. डब्ल्यू 999 नावाच्या या फोनमध्ये 3.5 इंचाचे दोन स्क्रीन लावण्यात आले आहेत. हा फोन 2.3 एंड्राइड जिंजर ब्रँडवर काम करतो. यात सीडीएम आणि जीएसएम अशा दोन्ही नेटवर्कला सपोर्ट करण्याची सुविधा आहे. यात 5 एमपी कॅमेरा लावण्यात आला आहे. त्यामुळे 1080 पिक्सल व्हिडिओ तयार करता येतो. यात 16 जीबी मेमरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर एसडी कार्ड...
  December 16, 07:08 AM
 • जगप्रसिद्ध नोकिया कंपनीने ल्यूमिया 800 मॉडेलच्या मोबाइल विक्रीसाठी अनोखी योजना राबवली आहे. कंपनीने या फोनची नोंदणी सुरू केली आहे. नोकियाच्या देशभरातल्या विस्तृत स्टोअर्समध्ये हा स्मार्टफोन डिस्प्लेसाठी ठेवण्यात आला आहे. जो ग्राहक भारी फोन घेऊ इच्छितो त्याला एक ते दोन हजार रुपये अँडव्हान्स द्यावे लागतील. दहा दिवसांनंतर त्यांना हा शानदार फोन मिळेल. कंपनीने भारतातील याची किंमत अद्याप ठरवलेली नाही; पण असे सांगितले जाते की, याची किंमत 30 ते 33 हजारांपर्यंत असेल. ल्यूमियाचे स्वस्त मॉडेल 710...
  December 16, 07:05 AM
 • अँमेझॉन कंपनीच्या किंडल फायर टॅबलेट कॉम्प्युटरला उतरती कळा लागली आहे. कंपनीने मोठा गाजावाजा करून हा कॉम्प्युटर बाजारात आणला होता; पण ग्राहक तो कंपनीला परत करत आहेत. याची किंमत फक्त 10 हजार रुपये इतकी होती. ग्राहकांचे म्हणणे असे की, याच्या आवाजाला बाहेरून नियंत्रण करण्याची सुविधा नाही. तसेच याला गतीही नाही. बंद करण्याचे बटन क धीही बंद होऊ शकतो. याचा टच स्क्रीन कधीही अंधुक होऊ शकतो. ग्राहकांच्या या तक्रारी कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. अशा प्रकारचा निकृष्ट दर्जाचा कॉम्प्युटर...
  December 16, 07:04 AM
 • फक्त स्लीम असणे हेच याचे वैशिष्ट्य नसून वॉटरप्रूफ आणि डस्टप्रूफ मोबाइल अशी याची ख्याती आहे. पॅनासोनिक कंपनीने याची घोषणा केली आहे. मार्च 2012 मध्ये तो बाजारात येईल, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीने याची वैशिष्ट्ये जाहीर केली आहेत. या मोबाइलमध्ये 4.3 इंचाचा क्यूएसडी डिस्प्ले लावण्यात येणार आहे. जपानमध्ये वॉटरप्रूफ विक्री होणे सर्वसाधारण गोष्ट आहे. युरोपात 15 लाख मोबाइल विक्रीचे उद्दिष्ट आहे, तर 2015 पर्यंत टार्गेट दीड कोटी मोबाइल विक्री करण्याचे ठरवले आहे. हे मोबाइल कंपनीच्या मलेशियातील...
  December 16, 07:01 AM
 • लंडन- गुंडाळी करता येणार्या स्मार्टफोन आणि थ्रीडी टीव्हीनंतर तंत्रज्ञान आणखी एका नव्या जगात प्रवेश करत आहे. लवकरच फ्लॅट स्क्रीन टीव्ही चक्क तुमच्या खिशात सामावू शकेल. क्यूडी टीव्ही असे या तंत्रज्ञानाचे नाव आहे.ब्रिटिश वैज्ञानिकांनी काही दिवसांपूर्वी क्वांटम डॉट या तंत्रज्ञानाची निर्मिती केली होती. याच तंत्रज्ञानाचा उपयोग अल्ट्रा थिन टीव्हीच्या निर्मितीत करण्यात येत आहे. सॅमसंग आणि नोकियाने आधीच गुंडाळी करता येणार्या स्क्रीनचे मोबाइल फोन बाजारात उतरवण्याची घोषणा केलेली आहे....
  December 14, 06:09 AM
 • फोनधारकांसाठी खुशखबर! आता तुम्ही पैसे खर्च न करता आपला मोबाइल रिचार्ज करू शकता. म्हणजे फ्रीचार्ज डॉट कॉम ही एक कंपनी आपणास तितक्याच रकमेचे फ्री कूपन देईल, जितक्या रकमेने तुम्ही मोबाइल चार्ज कराल. या कूपनचा वापर मॅकडोनाल्ड आणि बॅरिस्टा कॉफी मध्ये करू शकता.साधारणपणे तीन महिन्यांपूर्वी फ्रीचार्ज डॉट इनने भारतात ही सेवा सुरू केली आहे. इतक्या कमी वेळात अँपल, मल्टिप्लेक्स आणि ग्रोसरी सेक्टरशी संबंधित 15 मोठय़ा कंपन्यांनी या सोशल नेटवर्कशी जोडण्याचे ठरवले आहे. या विशेष योजनेंतर्गत तुमचा...
  December 9, 05:12 PM
 • मोबाइल आता जीवनाचा अविभाज्य घटक बनत चालला आहे. संपूर्ण जगाला त्याचे वेड लागले आहे; पण प्रत्येक गोष्टीला एक सीमा असते. त्यामुळे नुकसानही होऊ शकते. लंडनहून बातमी आली आहे की, स्मार्टफोनचा अंदाधुंद वापर करणारे विविध आजारांचे शिकार होत आहेत. यात सर्वाधिक तक्रारी मान आखडणे आणि अंगठे दुखण्याबाबतच्या आहेत. ब्रिटनच्या डॉक्टरांनी इशारा दिला आहे की, याच्या स्क्रीनकडे टक लावून पाहणे आणि छोट्या बटनांना बोटांनी चालवणे प्रकृतीच्या दृष्टीने हानिकारक आहे. यामुळे प्रकृतीच्या तक्रारी उभ्या राहतात....
  December 9, 05:07 PM
 • जर तुमचे फेसबुक अकाऊंट असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. सध्या हजारो फेसबुक अकाउंटवर अश्लील चित्र आणि इतर माहिती टाकण्यात येत आहे. इतकेच नाही तर अनेकांना त्यांच्या नावावर मित्रांना पैसे मागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. असे सांगितले जाते की, अज्ञात वेबसाइटवरून फे सबुकवर हल्ला झालेला आहे. लाखो युर्जसचे अकाउंट हॅक करण्यात आले आहेत. त्यांच्या अकाउंटवर पोर्न सामग्री आणि चित्रे टाकण्यात आलेली आहेत. हॅकर्सनी फेसबुक युर्जसना एक खास यूआरएलवर क्लिक करण्याची सूचना केली, त्यामुळे अशी...
  December 9, 05:05 PM
 • जगातील प्रसिद्ध फिलिप्स कंपनीने गो गिअर वेब एमपी 4 प्लेअर बाजारात आणला आहे. फिलिप्सची उत्पादने सर्वसामान्यांना परवडतील अशी असतात. ही कंपनी त्यासाठी प्रसिद्ध आहे. या मीडिया प्लेअर मध्ये 1.8 इंचाचा स्क्रीन आहे. याचे रेजोल्युशेन 160 बाय 128 इतके आहे. यात सात बटन आहेत. ज्यात पॉज आणि प्लेची बटने मोठी आहेत. त्यामुळे सहजपणे गाणी सुरू करता येतात किंवा मध्येच थांबवता येतात. हा प्लेअर अनेक प्रकारच्या फॉरमॅटला सपोर्ट करतो. ज्यात एमपी 3, डब्ल्यूएव्ही आणि एपीईचा समावेश आहे.
  December 9, 04:42 PM
 • नवी दिल्ली- एचसीएल इन्फोने एक सगळ्यात स्वस्त व हलका लॅपटॉप सादर केला आहे. हा जगातील सगळ्यात स्वस्त व हलका लॅपटॉप असल्याचे सांगण्यात येत आहे.या लॅपटॉपचे नाव आहे मीलीप. तो एक्स आणि वाय सेरीजमध्ये उपलब्ध आहे. त्याची सुरुवातीची किंमत १३, ९९० रुपये आहे. एक्स सेरीजमध्ये फ्लॅश तथा डिस्क आधारित पर्याय आहेत आणि ते लिनक्सच्या ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित आहे. याचे सगळ्यात महाग मॉडेल १६, ९९० रुपयाला आहे. याच्यात वाय-फाय सिस्टम आहे.कंपनीने एक महागडा लॅपटॉपही सादर केला आहे. ज्याची किमत २९, ९९० ते ३९, ९९०...
  December 9, 04:33 PM
 
जाहिरात

RECOMMENDED