Home >> Business >> Gadget

Gadget News

 • पॅरिस- जगातील सर्वात मोठी मोबाईल उत्पादन करणारी कंपनी नोकिया आता टॅबलेटच्या बाजारात उतरत असून तेथेही नशीब अजमावून पाहणार आहे. कंपनी विंडोजवर आधारीत एक किफायतशीर टॅबलेट कंप्युटर सादर करणार असून तो एप्पलच्या आयपॅडला टक्कर देईल.हा टॅबलेट येत्या उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल-मे पर्यंत बाजारात दाखल होईल व तो मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टमवर आधारित असेल. यात एप्पलच्या आयपॅडमध्ये जी सेवा-सुविधा असतील त्या सर्व उपलब्ध असतील. तसेच तो एप्पलला टक्कर देण्यासाठी मार्केटमध्ये उतरत असल्याने...
  November 17, 03:34 PM
 • टेलिकॉम क्षेत्रातील अग्रणी कंपनी एयरटेलचा नफा घटत चालला असल्याचा परिणाम आता ग्राहकांवरही पडणार आहे. मागील काही महिन्यापासून एयरटेल कंपनीचा नफा कमालीचा घटला असून कंपनीने आंतरराष्ट्रीय कॉल दरात सुमारे १० टक्के वाढ जाहीर केली आहे. मात्र कंपनीने लोकल व नॅशनल कॉलदरात कोणतेही वाढ केली नाही. मात्र टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मोबाईल सेवा कंपन्यांकडून लवकरच लोकल व नॅशनल कॉल दरातही वाढ केली जाण्याची शक्यता आहे.याआधी भारती एयरटेल ग्रुपचे प्रमुख सुनील भारती मित्तल...
  November 16, 05:18 PM
 • मोबाईल हॅंडसेट बनविणारी जगातील सर्वात मोठी व दिग्गज कंपनी नोकियाने आतापर्यंतचा सगळ्यात स्मार्ट व आकर्षक मोबाईल सादर केला आहे. या मोबाईलचे नाव 'ह्यूमन टच' (मानवी स्पर्श) असे ठेवण्यात आले असून, कंपनीने हा मोबाईल फोन प्रातिनिधिक (कॉंन्सेप्ट फोन) म्हणून बाजारात सादर केला आहे. हा फोन लवचिक असून तो आपण सहज पिळू शकतो. याबाबत कंपनीने म्हटले आहे की, या मोबाईल फोनमध्ये नॅनो टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे.कंपनीचे असेही म्हणणे आहे की, नाव हॅंडसेट दिसण्यास अत्यंत स्मार्ट व आकर्षक आहे. तसेच यात...
  November 12, 12:40 PM
 • जगात सर्वत्र बोलबाला असलेले सर्च इंजिन गूगल कंपनी आता आपल्या गूगल मॅप्स सर्विसला अजून जबरदस्त बनवणार आहे. कंपनीने याबाबत माहिती देताना म्हटले आहे की, मोफत दिल्या जाणाऱया गिगल मॅप्स सेवेत येत्या काही दिवसात रस्ते, इमारती यांच्याबरोबरच तुमच्या दुकानातील, ह़ॉटेलातील, जिममधील फोटोही दिसू शकतील.गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कंपन्याच्या वतीने याबाबत अधिकृत सर्विस पाहणी करण्यात आली आहे. या नव्या सेवेबाबत गुगलचा प्रवक्ता डियेना यिक यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दिवसापासून एखाद्या...
  November 11, 04:51 PM
 • फिनलॅंडची मोबाईल कंपनी नोकिया एकीकडे सगळ्यात स्वस्त तर दुसरीकडे अत्याधुनिक हॅडसेट लॉंच करत आहे. नोकियाचा सगळ्यात स्वस्त मोबाईल फोन १२०९ हा आहे. त्याची किमत एवढी कमी आहे की त्याला कोणीही खरेदी करु शकते. हा मोबाईल खूपच हलका आहे आणि त्याचे वजन केवळ ८० ग्रॅम इतके आहे. त्याची लांबी चार इंच आहे तर, बॅटरी सात तास चालते. यात कॅमेरा नाही मात्र, तीन गेम्स जरुर आहेत. याची किमत ८५० रुपये आहे. मात्र एका वेबसाईटवर याची किमत ८३२ रुपये सांगितली जात आहे. यात सुमारे २०० नंबर सेव्ह केले जाऊ शकतात.
  November 10, 01:44 PM
 • नवी दिल्ली- इलेक्ट्रानिक्स कंपनी मिताशीने सर्व वर्गातील लोकांसाठी एकाच वेळी पाच स्वस्त मोबाईल उपल्बध करुन दिले आहेत. मात्र या कंपनीने आतापर्यंतचा सगळ्यात स्वस्त टचस्क्रीन मोबाईल लॉंच करुन बाजारातील स्पर्धा अधिक तीव्र केली आहे.मिताशी यांनी एकदम पाच मोबाईल बाजारात आणले आहेत. यात एमआयटी-०१, एमआयटी-०२, एमआयटी-०३, एमआयटी-०४ आणि एमआयटी-०५ या प्रकारची ही मॉ़डेल आहेत. यात वेगवेगळ्या सुविधा, वैशिष्टये सांगता येतील. एमआयटी १ आणि २ टचस्क्रीन फोन आहेत. तसेच यात विविध सुविधा आहेत. त्याचा स्क्रीन ४.६...
  November 9, 04:51 PM
 • गुगल लवकरच अँड्राइड बेस्ड म्युझिक अँप लाँच करणार आहे. हा गुगलच्या म्युझिक स्टोअर लाँच करण्याच्या तयारीचा भाग असल्याचे मानले जात आहे.गुगल लवकरच आपले ऑनलाइन म्युझिक स्टोअर सुरू करू शकते. तथापि, कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, संगीत क्षेत्रातील सूत्रांनी अशी खात्रीलायक माहिती दिली आहे. यू-ट्यूबने नुकत्याच सुरू केलेल्या र्मक सेवेमुळे गुगलच्या हालचालींना वेग मिळाला आहे.काय आहे र्मक सेवा? : या सेवेद्वारे रसिक संगीत डिजिटली डाऊनलोड करू शकतील. सोबतच ते एखाद्या संगीत...
  November 6, 03:54 PM
 • अँपलचे दिवंगत मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह जॉब्स यांनी आवाजाद्वारे नियंत्रित होणारा टीव्ही संच सादर करण्याचे स्वप्न बाळगले होते. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी अँपलच्या चमूने कंबर कसली आहे.टीव्हीच्या विविध फंक्शन्सवर नियंत्रण ठेवण्यासाठी रिमोट कंट्रोलची गरज आता यापुढे भासणार नाही. अल्पावधीतच येणारा अँपलचा टीव्ही संच आयफोनच्या सिरी पर्सनल असिस्टंटच्या मदतीने वेगवेगळ्या फंक्शन्सवर नियंत्रण ठेवेल. बॅकअपसाठी टीव्हीमध्ये टच कंट्रोल दिले जाईल. या डिझाइनची ब्ल्यूप्रिंट...
  November 6, 03:29 PM
 • नवी दिल्ली - गेल्या काही महिन्यांपासून भारतीयांचा विविध डाटा सेवा तसेच फीचर्सची सोय असणाया मोबाइल हँडसेट खरेदीकडे कल वाढतो आहे. त्यामुले जगातील एक चांगली हँडसेट बाजारपेठ असणाया भारतात 2012 पासून हँडसेट महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 2011 मध्ये देशात मोबाइल हँडसेटचे सरासरी विक्री मूल्य 2280 रुपये राहील, असा अंदाज आहे. 2012 मध्ये यात वाढ होऊन मूल्य 2,400 रुपये, तर 2013 मध्ये 2,525 रुपये होईल, असा अंदाज आहे. इंडियन सेल्युलर असोसिएशनचे अध्यक्ष पंकज मोहिंद्रू यांच्या मते, आगामी काळात देशात डाटा...
  November 6, 06:05 AM
 • नवी दिल्ली । दिवाळी संपताच कंझ्युमर ड्युरेबल कंपन्यांनी आपल्या उत्पादनांच्या किमती वाढवण्यास सुरुवात केली आहे. गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती करणा-या हायर अप्लायन्सेस इंडिया प्रा. लिमिटेड कंपनीने आपल्या उत्पादनाच्या किमती वाढवण्याची तयारी सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी एलजी इंडिया कंपनीने गृहोपयोगी वस्तूंच्या किमतीत 5 टक्के वाढ केली आहे. हायर अप्लायन्सेस कंपनीचे मार्केटिंग प्रमुख शांता रॉय संजीव यांनी सांगितले की, गृहोपयोगी वस्तूंच्या किमती वाढवण्याची कंपनीची योजना असून...
  November 5, 01:38 AM
 • मोबाइल हँडसेट बनवणार्या कंपन्यांकडून एकाहून एक सरस असे स्मार्टफोन तयार होत असतात. असे हँडसेट्स नवे विक्रमही स्थापित करतात. कोणाकडे सर्वात जास्त पातळ असा हँडसेट बनवण्याचा विक्रम आहे, तर कोणाच्या नावावर हलक्या वजनाचे रेकॉर्ड. मात्र, सर्वाधिक विक्री होणारा मोबाइल हँडसेट म्हणून कोणाच्या नावावर विक्रम नोंदला गेला हे तुम्हाला माहिती आहे काय? नाही ना.. तर चला, आम्हीच सांगतो हा हँडसेट आहे नोकिया 1100. नुकताच अँपलचा नवा आयफोन 4 एस जेव्हा सादर झाला तेव्हा त्याचे तीन दिवसांत 40 लाख फोन बुक झाले होते....
  November 4, 03:34 PM
 • होय, सॅमसंगच्या या नव्या फोनमध्ये असे काही फीचर्स आहे जे इतर कोणत्याही मोबाईलमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार नाही. या सुपरफोनची मोबाईलधारक बरेच दिवसापासून वाट पाहत होते. अखेर सॅमसंगने गॅलक्सी नोट हा सुपरफोन भारतीय बाजारपेठेत आणला असून तो काल लाँच केला. हा फोन म्हणजे टॅबलेट आणि मोबाईल फोन या दोघांच्यावरची कडी असल्याचे मानले जात आहे. कारण साधारण मोबाईलपेक्षा याची स्क्रीन मोठी आहे. नावानुसार यात पेन इनपुट टेक्नोलॉजीचा वापर केला आहे. या तंत्रज्ञानामुळे हातामुळेही तुम्ही लिहू शकता.याचा...
  November 3, 02:08 PM
 • ओले या सौंदर्यप्रसाधने बनवणा-या कंपनीची ब्रँड अम्बॅसेडर अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने मुंबईत या कंपनीच्या नव्या उत्पादनांचे सादरीकरण केले. हिवाळ्याचा हंगाम लक्षात घेऊन ओलेने त्वचेसाठी विशेष माइश्चरायझिंग क्रीम बाजारात आणल्या आहेत. श्रेणीनुसार याच्या किमती 300 रुपये ते 1500 रुपयांदरम्यान आहेत.
  November 3, 05:14 AM
 • मुंबई - बाजारात सध्या टॅब्लेट वॉर सुरू असतानाच आता मुकेश अंबानी यांनीदेखील अवघ्या 6 हजार रुपयांत स्वस्त टॅब्लेट देण्याचा विचार केला आहे. या किफायतशीर किमतीतील टॅब्लेटचे स्वप्न साकार करण्यासाठी मुकेश अंबानी हे आपले धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्याकडे सहकार्याचा हात पुढे करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सच्या टॉवर्स आणि फायबर आॅप्टिक केबलचा वापर वेगवान डेटा सेवा देण्यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड प्रयत्नशील आहे. 2005 मध्ये फाटाफूट...
  November 3, 04:59 AM
 • नवी दिल्ली - येथे सॅमसंगने गॅलक्सी नोट हा टॅब्लेट आणि मोबाइल हँडसेट सादर केला . त्या वेळी कंपनीचे इंडिया हेड रणजित यादव (डावीकडे), अभिनेत्री गुल पनाग आणि कंपनीचे संचालक असीम वारसी. या गॅलक्सी नोटची किंमत 34,990 रुपये असून, हा हँडसेट टॅब्लेट म्हणूनही वापरता येणार आहे.
  November 3, 04:52 AM
 • नवी दिल्ली - संदेशवहनात नवी क्रांती घडवणा-या मोबाइलचा उपयोग आता फक्त हाय हॅलोपुरताच उरलेला नाही. दैनंदिन गरजेची वस्तू म्हणून आयुष्यात स्थान मिळविलेला मोबाइल आता मल्टी टास्किंग डिव्हाइस म्हणजेच विविध कामे करणारे एकच उपकरण बनले आहे. 120 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या भारतात तब्बल 89.2 कोटी जणांजवळ मोबाइल खुळखुळतोय. असोचॅम या अग्र्रगण्य वित्तीय संस्थेच्या अहवालात मोबाइलचा उपयोग वाढत असल्याचे म्हटले आहे. एकीकडे अत्याधुनिक फीचर्स असलेल्या मोबाइलच्या किमती कमी होत आहेत, तर दुसरीकडे...
  October 31, 11:27 PM
 • मुंबई । लॅपटॉप बाजारात सध्या सर्वात स्लीम लॅपटॉप आणण्याची स्पर्धा सुरू असून यात अमेरिकन कंपनी डेलने बाजी मारली आहे. जगातला आतापर्यंतचा सर्वात पातळ (स्लीम) लॅपटॉप बाजारात आणल्याचा दावा केला आहे. कंपनीतर्फे या लॅपटॉपचे नुकतेच लाँचिंग करण्यात आले. कंपनीने तयार केलेले लॅपटॉप हे अनुक्रमे 14 व 15 इंचाचे आहेत. लॅपटॉप स्लीम करण्यासाठी विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. डेल एक्सपीएस 14 जेड हा लॅपटॉप स्लीम वेगवान चालतो. त्याला अॅल्युमिनियम व मॅग्नेशियमचे आवरण देण्यात आले आहे. अमेरिकेत या...
  October 27, 03:49 AM
 • कॉम्प्युटर सॉफ्टवेअर बनवणारी अमेरिकेतील मोठी कंपनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनने भारतात प्रथमच विंडोज 7.51 नावाचा स्मार्टफोन सादर केला आहे. या हँडसेटला विंडो मँगो सुद्धा म्हटले जाते. भारतात हा फोन सादर करताना कंपनीचे अध्यक्ष भास्कर प्रामाणिक यांनी सांगितले, भारतीय ग्राहकांच्या निश्चितच पसंतीस उतरेल. एक्सबॉक्स, फेसबुक, ट्विटर आणि अन्य सोशल नेटवर्किं ग साइटसुद्धा उपलब्ध आहेत. स्टार्ट स्क्रीनसाठी परंपरागत अॅप्लिकेशनच्या ऐवजी लाइव्ह टाइल्स आहेत. याच्या लिंकड् इनबॉक्समध्ये अनेक इ-मेल...
  October 21, 05:19 AM
 • नवी दिल्ली - संगणक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अत्यंत वेगवान बदल घडून येत आहेत. जग आता डेस्कटॉप पर्सनल कॉम्प्युटर आणि लॅपटॉपच्या तंत्रज्ञानापेक्षाही पुढारले आहे. दररोज लाँच होणारे नवनवीन स्मार्टफोन आणि टॅबलेट पीसी बाजारात धुमाकूळ घालत असून त्यांच्यापुढे कॉम्प्युटर्सची जुनी पिढी फिकी पडत आहे. अर्थात कॉम्प्युटर्सचे युग संपणार नसले तरी स्मार्टफोन आणि टॅबलेट पीसीसारख्या नव्या पिढीमुळे ते मागे पडत आहेत हे निश्चित. गार्टनर या संशोधन संस्थेने नुकत्याच प्रकाशित केलेल्या अहवालात...
  October 10, 11:08 PM
 • न्यूयॉर्क, लंडन, नवी दिल्ली- स्टीव्ह जॉब्स यांच्या निधनानंतर त्यांच्या साम्राज्याबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात आहेत. अँपलचे नवे सीईओ जॉब्स यांच्यासारखे सक्षम नेतृत्व देऊ शकेल का? असाही प्रश्न विचारला जात आहे. पण अमेरिकन उद्योगपती हेन्री फोर्ड, अमेरिकन सिने निर्माते वॉल्ट डिज्ने यांची उदाहरणे पाहिली असता, अँपल अखेरपर्यंत अजिंक्य राहणार, अशी आशा करता येणे शक्य आहे. 1966 मध्ये वॉल्ट डिज्ने यांच्या निधनानंतर त्यांचा लहान भाऊ रॉन डिज्ने यांनी त्यांच्या कंपनीचा कारभार पाहिला आणि रॉन...
  October 10, 05:50 AM
 
जाहिरात

RECOMMENDED