Home >> Business >> Gadget

Gadget News

 • सध्या बिझनेस फोनची क्रेझ वाढतच चालली आहे. टेक्स्टिंग, मेसेंजर, फेसबुकिंग अत्यंत जलद व्हावे यासाठी बहुधा लोक टचस्क्रीनपेक्षा दहएफळ की-पॅड असलेले फोन घेणेच जास्त पसंत करतात. त्यामुळे बहुतकरून मोबाइल कंपन्यांनी या सोयी अधिक चांगल्या आणि सोयीस्कर पद्धतीने पुरवण्यावर भर दिला आहे. कॅमेरा क्वालिटी, 3G सर्व्हिस असे काही उत्तम फीचर्स टाकून, किंमत परवडेल अशी ठेवून मोबाइल बनवण्यावर या कंपन्या भर देत आहेत. नोकिया ही कंपनी यात यशस्वी ठरली आहे. नुकतेच इ श्रेणीमधील काही नवीन मॉडेल्स बाजारात आणले गेले....
  October 5, 08:06 AM
 • जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असलेली कंपनी गुगल वॉलेट सेवा सादर करणार आहे. या सेवेद्वारे मोबाइल फोनची सर्व बिले भरता येणार आहेत. गुगल वॉलेट एक अँप्लिकेशन असून लोकांना फोनद्वारे सर्व बिलांचे पेमेंट करण्याची सुविधा देणार आहे. वास्तविक मे महिन्यातच ही सेवा सुरू होणार होती. पण ती आता सुरू होत आहे. कंपनीच्या वतीने जाहीर करण्यात आले की, प्रारंभी फक्त नेक्सस 4 जी पर स्प्रिंटबरोबर हे अँप्लिकेशन उपलब्ध असणार आहे. गुगलच्या या सेवेच्या साह्याने सिटी, मास्टरकार्ड आणि गुगल प्रीपेड कार्डाद्वारेही...
  October 2, 06:06 PM
 • नवी दिल्ली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना आव्हान देण्यासाठी आता नोकिया कंपनीने स्वस्तात अधिक चांगला मोबाइल देण्याचा ध्यास घेतला आहे. त्यासाठी विशेष सॉफ्टवेअर विकसित करण्यात येत आहे. मेल्टिमी असे या लिनक्स पद्धतीवर आधारित प्रणालीचे सांकेतिक नाव आहे. मेरी मॅकडोवेल यांच्या नेतृत्वाखाली या प्रकल्पावर काम सुरू आहे; परंतु या सॉफ्टवेअरविषयीची अधिक माहिती देण्यास कंपनीने नकार दिला आहे. दुसरीकडे नोकियाने सॉफ्टवेअरच्या निर्मितीला केलेली सुरुवात ही तंत्रज्ञान...
  October 2, 03:14 AM
 • वॉशिंग्टन। 800 दशलक्ष युजर्ससाठी फेसबुकने आपल्या रचनेचा कायापालट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता युजर्सना आगामी वीस वर्षांसाठी आपले पेज बिनधास्त वापरता येणार आहे. फेसबुक ही युजर्सच्या आयुष्यातील दैनंदिनी आहे. भविष्यात त्यांना फेसबुकवरील पानावर आल्यानंतर आपल्या घरात आल्यासारखे वाटावे, असा त्यामागचा उद्देश आहे. फोटो, व्हिडिओ किंवा रोजच्या वैयक्तिक घडामोडींची माहिती त्यावर सहजपणे उपलब्ध होणार आहे, असे कंपनीचे प्रमुख झुकेरबर्ग यांनी म्हटले आहे. ही सुविधा पुढील दोन दशके लॉक...
  October 1, 01:40 AM
 • सध्याचा जमाना टॅबलेट पीसीचा आहे. अनेक बड्या विदेशी कंपन्यांचे नावीन्यपूर्ण टॅबलेट पीसी ग्राहकांना खुणावत आहेत. याच सगळ्या घडामोडींमध्ये मागील वर्षात भारतानेही स्वत:चा टॅबलेट पीसी आणि तोदेखील अवघ्या 35 डॉलरमध्ये उपलब्ध करून देण्याची घोषणा केली, त्या वेळी अनेक कंपन्यांच्या भुवया आश्चर्याने उंचावल्या. नाना प्रकारची फीचर्स असलेले हे महागाचे गॅजेट इतक्या स्वत: किमतीत उपलब्ध होणे म्हणजे केवळ अशक्य, असाच विचार अनेकांनी केला. पण खरोखरच इतक्या स्वस्तातल्या टॅबलेट पीसीची निर्मिती करून...
  September 30, 04:15 PM
 • अँपलच्या जगप्रसिद्ध टॅबलेट कॉम्प्युटर आयपॅडची नवी आवृत्ती आयपॅड-3 आता पुढच्या वर्षात येत आहे. जेपी मॉर्गनचे विश्लेषक मार्क मॉस्कोविट्स म्हणतात, अँपलच्या अंत:स्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपॅड-3 पुढच्या वर्षी म्हणजे 2012 मध्ये कोणत्याही वेळी बाजारात येऊ शकतो. मार्क म्हणतात : अँपलला कसलीही घाई नाही. टॅबलेट बाजारात त्यांचे प्रतिस्पर्धी खूप मागे आहेत. हे अंतर 2012 पर्यंत खूप वाढू शकते. अशा स्थितीत अँपलची तिसरी पिढी टॅबलेटमध्ये सर्व सुविधा टाकण्यात कोणतीही कसर सोडणार नाही.बाजारात आयपॅड-2...
  September 29, 06:49 PM
 • नवी दिल्ली. स्वस्तात संगणक उपलब्ध करून देण्याच्या बहुचर्चित योजनेचा 5 ऑक्टोबर रोजी शुभारंभ होणार आहे. या योजनेंतर्गत शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना केवळ 1615 रुपयांमध्ये संगणक दिला जाणार आहे. मानव संसाधन विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी ही माहिती दिली. त्यांनी संगणकाचे नाव सांगितले नसले तरी स्वस्त संगणकाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकार झाला आहे, असे सिब्बल म्हणाले. शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. 12 व्या पंचवार्षिक योजनेत राष्ट्रीय...
  September 29, 03:31 AM
 • आयफोनची निर्माता कंपनी अँपल आणि कोरियन कंपनी सॅमसंग यांच्यातील युद्ध हातघाईवर आले आहे. अँपलने सॅमसंगवर अनेक उत्पादनाच्या पेटंटचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर न्यायालयात खटले दाखल केले आहेत. सॅमसंगनेही प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियात अँपलवर खटला दाखल केला आहे.सॅमसंगचा आरोप आहे की, अँपल त्यांच्या वायरलेस पेटंटचे उल्लंघन करत आहे. त्यांचे आयफोन थ्रीजी, थ्रीजीएस, आयफोन 4 तसेच आयपॅड 2 वरही आरोप लावण्यात आले आहेत. अँपलने सॅमसंगवर अनेक ठिकाणी खटले दाखल केले आहेत....
  September 28, 04:18 PM
 • नवी दिल्ली. मोबाइल हँडसेटच्या विक्रीत एप्रिल ते जून या तिमाहीत नोकिया कंपनीने अव्वल स्थान पटकावले आहे. कोरियाची सॅमसंग कंपनी दुस-या तर ब्लॅकबेरी निर्मितीसाठी ओळख असणारी आरआयएम ही कंपनी तिस-या स्थानावर आहे. इंटरनॅशनल डाटा कार्पोरेशनने (आयडीसी) ही आकडेवारी जाहीर केली आहे. आयडीसीचे संशोधन संचालक दीपक कुमार यांनी सांगितले की, एप्रिल-जून तिमाहीत मोबाइल हँडसेटच्या आयातीतही 3 टक्के घट झाली आहे. नव्या तंत्रज्ञानावर व विविध फिचर्सचे हँडसेट बाजारात येत असल्याने विक्रेत्यांनी...
  September 28, 03:32 AM
 • होय, येत आहे जगातील सर्वात छोटा कॅमेरा तोही फक्त एक इंचचा. याला आपण नॅनो टेक्नोलॉजीची कमाल म्हणू शकता. भविष्यात नॅनो टेक्नोलॉजीचे अनेक छोटी-छोटी उपकरणे आपल्या वापरात येणार आहेत.एक इंचाचा कॅमेरा असतानाही तो चांगले फोटो घेतो. तसेच हाताळायलाही तो सोपा आहे. याचे वजन फक्त १५ ग्रॅम आहे. कंपनीचा असा दावा आहे की, या जगातील सर्वात लहान डिजिटल कॅमेरा आहे. हा कॅमेरा १६००x1200 जेपीईजीचा फोटो काढू शकतो. तसेच हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करु शकतो. याला केबल जोडून तुम्ही काढलेले सर्व फोटो कॉम्प्युटरवर पाहू शकता....
  September 26, 02:59 PM
 • एकेकाळी टेलिकॉम कंपन्यांमध्ये कॉलचे दर व एसएमएस व्हाउचर्सवरून स्पर्धा असायची. आता अँपल कंपनीने बाजारात नवीन टॅबलेट पीसी लाँच केल्यानंतर या स्पध्रेला नवे वळण लागले आहे. डाटा सर्व्हिसेस बाजारात आपले ग्राहक वाढवण्यासाठी सर्व टेलिकॉम कंपन्या टॅबलेट पीसी कमीत कमी दरात विकण्याची तयारी करत आहेत.एका प्रसिद्ध कंपनीच्या अधिकार्याने सांगितले की, सर्व टेलिकॉम कंपन्या आता डाटा/इंटरनेट सर्व्हिसेस क्षेत्रात आपले ग्राहक वाढवू इच्छित आहेत. कारण केवळ व्हॉइस कॉलच्या आधारे त्यांना महसूल (एआरपीयू)...
  September 25, 05:05 PM
 • फिनलॅंडची मोबाईल कंपनी नोकियाने जगभर आपले नाव कमाविले आहे विशेषत भारतात तर नोकिया हा ब्रॅड लोकप्रियच आहे. कारण ही कंपनी आधुनिक, चांगल्या गुणवत्तेचे, महाग आणि सामान्यासाठी स्वस्त असे सर्व प्रकारचे मोबाईल फोन बनविते व विकते. आता कंपनीने जगातील सर्वात स्वस्त मोबाईल आणला आहे.कंपनीने 'नोकिया १२८०' हे मॉडेल बाजारात आणले असून त्याची शोरुम किंमत ९९९ रुपये ठेवली आहे. मात्र जर तुम्ही बारगेनिंग केली तर त्यापेक्षा कमी किंमतीत मिळू शकतो. तसेच या मोबाईलची बॅटरी दमदार असून की-पॅडही मोठे आहे. तसेच...
  September 25, 03:06 PM
 • देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी एअरसेल आयफोन-4 फुकट वाटणार आहे. विश्वास बसणार नाही ना! पण ही घोषणा खरी आहे. पण.. यासाठी कंपनीशी सलग दोन वष्रे संलग्न राहावे लागेल अशी अट आहे. या प्लॅनमध्ये एअरसेल आपणास आयफोनच्या किमतीइतका टॉकटाइम देणार आहे. तो दोन वर्षांसाठी असेल. तसेच पोस्टपेड कनेक्शन घेण्याचे दोन प्लॅन आहेत. यात एक प्लॅन 50 टक्के मनीबॅक आहे. दुसरा 100 टक्के मनीबॅक प्रीमियम प्लॅन आहे. आपणास 50 टक्के व्हॅल्यू बॅक ऑफर मिळेल. आयफोन-4 (16 जीबीची) भारतात किंमत 34 हजार 500 इतकी आहे, तर 32 जीबीचा 40 हजार 900 रुपयांना...
  September 24, 02:54 PM
 • औरंगाबाद- काही दिवसांपूर्वी याहू कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी कॅरोल ए. बट्रज यांना संचालक मंडळाने काढून टाकले. त्यांना काढण्यामागे इंटरनेट जगतातील वाढत्या स्पर्धेत याहूची होणारी पीछेहाट हेच कारण होते. न्यूयॉर्क टाइम्समध्ये प्रकाशित एका वृत्तात म्हटले आहे की, कॅरोल फक्त याहूचा आॅनलाइन मीडियाच वाढवण्याचा प्रयत्न करत होती. पण सोशल नेटवर्किंग टूल्स, व्हिडिओ सर्व्हिस आणि मोबाइल अॅप्लिकेशन्सचा विकास करण्यात ती अपयशी ठरली. वास्तविक त्याचा वापर करण्यास लोक आज प्राधान्य देत आहेत....
  September 22, 11:39 PM
 • न्यूयॉर्क/ नवी दिल्ली- इंटरनेट क्षेत्रातील मातब्बर कंपनी गुगल या सर्वाधिक वापरल्या जाणाऱया संकेतस्थळाने आपली 'गुगल+' ही सोशल नेटवर्किंग सेवा मंगळवारपासून सर्वांसाठी खुली केली आहे. गुगलने 'गुगल+' ही सेवा तीन महिन्यापूर्वी एक्सपेरिमेंटल बेसवर इन्वायटीसाठी राखून ठेवली होती. या काळात कंपनीने या सेवेद्वारे सुमारे दहा कोटी ग्राहक जोडले आहेत. मात्र, आपली स्पर्धक कंपनी फेसबुकला मागे टाकण्यासाठी गुगलने पावले उचलली असून, मंगळवारपासून ही सेवा सर्वांसाठी खुली केली आहे. याचबरोबर गुगल+ सेवेत नवी...
  September 21, 04:42 PM
 • आयबीएम कंपनीने एका विशिष्ट प्रकारच्या ग्लूपासून सिलिकॉन चीपचा मोठा डोंगर उभार करण्याचा निर्णय घेतला आहे. या चीपच्या सहाय्याने संगणक आणि स्मार्टफोनचा वेग हजारपटीने वाढू शकेल.आयबीएम कंपनीने ग्लू तयार करणार्या एका कंपनीसोबत हातमिळवणी करून सिलिकॉन स्कायस्क्रॅपर चीप असणारे संगणक तयार करण्याचे ठरवले आहे. त्यामध्ये एकावर एक सिलिकॉन चीप ठेवत डोंगर उभा करण्यात येईल. त्याच्या साहाय्याने स्मार्ट फोन आणि संगणक आजच्या तुलनेत हजारपट जास्त वेगाने काम करू शकेल.ग्लू कंपनीचीच निवड का केली?- 3 एम...
  September 20, 04:46 PM
 • भारतात पहिल्यांदाच ल़ॉन्च झालेला मोफत स्मार्टफोन योजनेला देशातील ६ बड्या शहरात तुफान प्रतिसाद मिळत आहे. टेलिकॉम ऑपरेटर असलेली खासगी कंपनी एमटीएस यांच्यातर्फे सुरु झालेल्या योजनेला ग्राहकांनी हातो-हात खरेदी करत पसंती दिली आहे. या स्कीमनुसार १५०० रुपये दिल्यानंतर कंपनी आपल्याला एक स्मार्टफोन मोफत देत आहे.विशेष म्हणजे जे १५०० रुपये कंपनी घेत आहे त्याबदल्यात कंपनी कॉल टैरिफमध्ये अ़डजेस्ट करत आहेत. यामध्ये ग्राहकांना १५०० मिनिटे मोफत तसेच तेवढेच एसएमएस मोफत दिले जात आहेत. याचबरोबर...
  September 19, 01:26 PM
 • युरोपमध्ये सध्या जोरदार मंदी आहे. युरोपमधील बहुतेक देश कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. यात स्पेन देशाची अवस्था तर फार बेकार झाली आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी स्पेन सरकारने काही विमानतळाचे भाग विकायला काढले आहेत.विशेष म्हणजे, ज्या विमानतळाचा भाग विकायला काढला आहे. त्यात माद्रिद शहरातील सर्वोत्तम असलेले बाराजस विमानतळ याचा समावेश आहे. त्याचबरोबर बार्सिलोनामधील ईआय प्रैट विमानतळ याचाही समावेश आहे. याबाबत सांगितले जात आहे की, या विमानतळाची मालकी ४९ टक्के इतकी खासगी कंपनीला...
  September 18, 03:11 PM
 • आपण जर नवे इंटरनेट कनेक्शन घेत असाल तर बाजारात उपलब्ध असणार्या काही इंटरनेट प्लॅन्सची माहिती असणे गरजेचे आहे, तर जाणून घेऊया काही प्लॅन्सविषयी...एअरटेल- या कंपनीने आपले प्लॅन फास्ट, फास्टर आणि फास्टेस्टच्या र्शेणीत ठेवले आहेत. फास्ट प्लॅनमध्ये एक एमबीपीएस, फास्टर प्लॅनमध्ये 2 एमबीपीएसपर्यंत आणि फास्टेस्ट प्लॅनमध्ये याहून जास्त स्पीडवर डाऊनलोड करण्याची सुविधा आहे. नव्या कनेक्शनवर 500 रुपये इन्स्टॉलेशन शुल्क आहे. कंपनीने आपल्या अर्मयादित डाटा प्लॅनवर कठीण एफयूपी (फेयर युसेज पॉलिसी)...
  September 18, 02:33 PM
 • एका नवीन तंत्रज्ञानामुळे मोबाइल टॉवरच्या वायरलेस गतीला दुप्पट वाढवल्या जाऊ शकते. यामुळे एकाच फ्रिक्वेंसीवर बोलणे आणि ऐकणे शक्य होईल.आता ते दिवस दूर नाहीत, जेव्हा आपण फोन किंवा टॅबलेटसारख्या डिव्हाइसने एकाच फ्रिक्वेंसीवर बोलू किंवा ऐकू शकणार आहोत. सद्य:स्थितीत बोलणे आणि ऐकण्यासाठी दोन वेगवेगळ्या फ्रिक्वेंसीचा वापर केला जातो. राईस विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी या तंत्रज्ञानाला फूल डुप्लेक्स तंत्रज्ञान असे नाव दिले आहे. यावर काम करणारे मूळ भारतीय असलेले शास्त्रज्ञ आशुतोष साबरवाल...
  September 17, 02:59 PM
 
जाहिरात

RECOMMENDED