Home >> Business >> Gadget

Gadget News

 • घरबसल्या कारचे नियंत्रण करता येते, असे कोणी म्हटले तर आश्चर्य वाटते ना! परंतु कारच काय, ज्यांचा ट्रान्सपोर्टचा, ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे, अशांनासुद्धा आता टॅकमॅक ब्रँडनेम असलेले व जीपीआरएस यंत्रणा वापरून बनवलेल्या किट इंजिनात बसवले की घरी किंवा ऑफिसमध्ये बसून त्यावर नियंत्रण ठेवता येणे शक्य होणार आहे. तुमची कार किंवा कोणतेही वाहन ड्रायव्हरकडे असेल किंवा अगदी चोरीही गेले तर घरबसल्या तुम्ही तुमची कार कोठे आहे हे जाणून घेऊन गरज पडल्यास ती जागेवरच लॉक करण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे....
  August 5, 06:15 PM
 • कॅनडातील मोबाईल निर्मिती करणारी कंपनी रिसर्च इन मोशन अर्थात रिमने जबरदस्त धमाका केला आहे. कंपनीकडून एकाच वेळी पाच मोबाईल फोन बाजारात आणले आहे. असे पहिल्यांदाच झाले.या पाच मोबाईल फोनपैकी 3 जीएसएम आहेत आणि दोन सीडीएमए. जीएसएम हँडसेटमध्ये बोल्ड 9900, टॉर्च 9850 आणि टॉर्च 9810 चा समावेश आहे. या तीन्ही हँडसेटमध्ये भरपूर सुविधा आहेत. या हँडसेटच्या माध्यमातून कंपनी अॅपलच्या आयफोन आणि नोकियाच्या एन सीरिजशी टक्कर देणार आहे.या हँडसेटपैकी बोल्ड फोनची जाडी केवळ 10.5 मिमि आहे. यात टच स्क्रीन आणि क्वर्टी या...
  August 5, 02:54 PM
 • देशातील सरकारी दूरसंचार कंपनी बीएसएनएल ने खासकरून विद्यार्थ्यांसाठी अनोखी योजना आणली आहे. या योजनेला 'स्टुडंट स्पेशल प्लॅन' असे नाव दिण्यात आले आहे.या योजनेअंतर्गत 40 रुपयाच्या स्पेशल व्हाऊचरवर 600 एसएमएस आणि 50 एमबीपर्यंत मोफत इंटरनेट वापरता येणार आहे. इतकेच नाही तर याच किमतीत विद्यार्थ्यांना बीएसएनएल टू बीएसएनएल 30 रुपयापर्यंतचे कॉल्स आणि अन्य नेटवर्कवर 10 रुपयापर्यंत कॉल्स करण्याचीही सुविधा दिली जाईल. विशेष नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे 600 मोफत एसएमएसचा वापर देशभर कोठेही करता येईल....
  August 3, 06:33 PM
 • नवी दिल्ली- जास्त कालावधीपर्यंत चालणारी बॅटरी आणि परवडणा-या किंमतीत अत्याधुनिक वैशिष्टयांनी युक्त असा थ्रीजी मोबाईल कार्बन कंपनीने मंगळवारी सादर केला. अँण्ड्राईड अॅप्लिकेशनसवर आधारित असलेला कार्बनचा हा पहिला थ्रीजी स्मार्टफोन आहे. त्याची किंमतही ६९९९/- पासून ते दहा हजारपर्यंत आहे.कार्बनने अँण्ड्राईड सॉफ्टवेअरवर आधारित २.२ स्मार्टफोन ए -१ सादर केला आहे. या फोनमध्ये गुगल अॅप्स, गुगल मॅप, जी-मेल हे सॉफ्टवेअर आहेत. या फोनमध्ये ३.२ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे त्याचा थ्रीजीमध्ये चांगल्या...
  July 27, 04:43 PM
 • नवी दिल्ली-भारतीय बाजारपेठेत स्वस्त मोबाईल हँडसेट नंतर आता टॅबलेट कॉम्प्युटर स्वस्तात देण्याच्या तयारीत कंपन्या आहेत. भारतात मोबाईल हँडसेट उत्पादन करणा-या जी-फाईव्ह ही कंपनी येत्या दोन महिन्यात बाजारपेठेत टॅबलेट कॉप्यूटर सादर करणार आहे.कंपनीने यापूर्वी जून २०११ पर्यंत दहा हजार रूपयांपेक्षा कमी किंमतीत अंण्ड्रॉईड आणि विंडोज सॉफ्टवेअर असलेले टॅबलेट कॉम्प्युटर बाजारात आणणार असल्याचे घोषित केले होते.कमी किंमतीमुळे हे उत्पादन ग्राहकांना पसंत पडेल अशी कंपनीला आशा आहे.
  July 24, 04:49 PM
 • नवी दिल्ली- जगातील सर्वात मोठी मोबाईल कंपनी नोकियाच्य़ा मोबाईल फोनने अख्या भारतीय लोकांना वेड लावले आहे. मात्र नोकियाच्या मोबाईल फोनसारखा दिसणारा चीनी मोबाईल एन-८ ने सध्या भारतीय बाजारात धूम ठोकली आहे. तो दिसायला नोकिया कंपनीच्या मोबाईल सारखाच दिसायला आहे. तसाच तो दणकट आहे. विशेष म्हणजे तो नोकिया कंपनीच्या मोबाईलपेक्षा चार पटीने स्वस्त आहे. त्याचमुळे एन-८ मोबाईल सध्या जोरात विकला जात आहे. यात टीव्ही, एफएम रेडिओ, ब्ल्यू टुथ, टचस्क्रीन सुविधा आहेत. नोकियाच्या एन-८ ची भारतीय बाजारपेठेत...
  July 21, 12:34 PM
 • मोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनी सोनी एरिक्सनने नुकतेच वेगळाच स्मार्टफोन बाजारात आणला आहे. या नव्या हँडसेटचे नाव 'एक्सपीरिया एक्टिव' असे ठेवण्यात आले आहे.सोनीने हा दावा केला आहे की, हा हँडसेट वॉटरप्रुफ असल्याने पाण्यात पडला तरी त्याला काही होणार नाही. हँडसेट एँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीमवर आधारित असल्याने जगातील हा पहिलाच वॉटरप्रुफ हँडसेट आहे. हँडसेट भिजलेल्या हातांनीही टच स्क्रिनद्वारे ऑपरेट करता येऊ शकतो. अशा प्रकारे ऑपरेट करता येणारा हा पहिलाच हँडसेट आहे. एक मीटर खोल पाण्यात ३०...
  July 19, 12:31 PM
 • नवी दिल्ली. भारत संचार निगम लिमिटेडने साई इन्फोसिस्टिमसह बीएसएनएल ग्राहकांसाठी इंटरनेटवरून दूरध्वनी आणि दृकश्राव्य सेवा देण्यास प्रारंभ केला आहे. सध्या वापरात असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग सेवेच्या तुलनेत बीएसएनएलची ही दृकश्राव्य सेवा अत्यंत वाजवी आहे. विदेशातही वाजवी खर्चात संपर्क साधण्यासाठी आघाडीच्या आंतरराष्ट्रीय सेवा पुरवठादारांसोबत विशेष व्यवस्था केली जात असल्याची माहिती बीएसएनएलचे सीएमडी आर. के. उपाध्याय यांनी दिली आहे. व्हीव्हीओआयपी सेवा...
  July 19, 01:42 AM
 • नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांनी शुक्रवारी मध्यरात्रीपासून जेट इंधनाच्या भावात प्रति किलोलिटरमागे ७८ रुपयांची वाढ जाहीर केली आहे. देशातील सर्वात व्यस्त विमानतळ असणा-या मुंबईत उद्यापासून ५६,९६४.०१ रुपये प्रति किलोलिटर ऐवजी आता ५७,०३१.६६ रुपये प्रतिकिलोलिटर मोजावे लागतील. या इंधनदरवाढीचा प्रवासी विमान भाड्यावर काय परिणाम होईल याबद्दल एअरलाइन्स कंपन्यांकडून प्रतिक्रिया मिळू शकली नाही. एअरलाइनच्या संचालन खर्चात इंधनाचा ४० टक्के वाटा असतो व स्थानिक विक्री करानुसार प्रत्येक...
  July 16, 03:06 AM
 • ऍपल मोबाईलच्या मार्केटमध्ये आपले नाव कायम टॉपमध्ये कसे राहील याची काळजी घेत असते. त्यासाठीच त्यांनी असा एक आयफोन मोबाईल आणू घातला आहे तो म्हणजे आयपोन ५. हा एक थ्रीडी मोबाईल असेल. यात ड्युल कॅमेरा आहे जे आजपर्यंत ऍपलची कमजोरी राहिली आहे. मात्र आयफोन ५ बाबत जाणकारांनी असे मत व्यक्त केले आहे की, हा फोन खरे तर आयफोन ४ सारखाच दिसायला आहे. पण त्यात अनेक वेगळी वैशिष्टे आहे. याची स्क्रीन खूपच मोठी असून स्क्रीनवर काचेच्या ऐवजी काहीतरीच आहे. या कॅमेऱयाच्या पाठीमागे दो कॅमेरे असून एक ड्युल...
  July 15, 04:02 PM
 • टोरंटो - कॅनडामधील मोबाईल क्षेत्रातील संशोधन कंपनी रिसर्च इन मोशन (रिम) ब्लॅकबेरी बाजारात नवीन हँडसेट आणून धमाका करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, ब्लॅकबेरी एकाच वेळी बाजारात सात प्रकारचे हँडसेट आणण्याच्या कंपनीच्या वार्षिक बैठकीत विचार करण्यात येणार आहे. कंपनीच्या शेअर खाली येत असल्याने कंपनी असा विचार करीत आहे. कंपनीत शेअर असलेल्या दोन गुंतवणुकदारांनी येणाऱ्या काही महिन्यात सात नवीन हँडसेट आणि एक ऑपरेटिंग सिस्टीम बाजारात आणणार आहे. यामुळे कंपनीच्या...
  July 13, 02:16 PM
 • मोबाईल सर्व्हिस देणा-या एअरसेल या कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी स्वस्त दरात सुविधा उपलब्ध करण्यासाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना आता केवळ 30 पैसे प्रति मिनीट या दराने लोकल आणि एसटीडी कॉल करता येणार आहे.या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 34 रुपयांचे स्पेशल रिचार्ज व्हावचर घेणे आवश्यक आहे. या व्हावचरला 30 दिवसांची व्हॅलिडिटी असणार आहे. एसएमएसच्या दरात कोणताही बदल झालेला नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनीने ही ऑफर तूर्तास मुंबईपुरतीच मर्यादित ठेवलेली आहे. याआधी मुंबई...
  July 11, 06:36 PM
 • नवी दिल्ली- होय, मोबाईल बनविणारी नोकिया कंपनी आजही भारतात आपलं वर्चस्व कायम ठेवून आहे. या क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांची मोठी स्पर्धा असतानाही नोकियाने आपली आघाडी कायम ठेवत नंबर एक स्थानावर आहे.फिनलैंड या कंपनीने भारतीय बाजारपेठेत धुमाकूळ घातला आहे. कंपनीने केलेल्या एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, जुलै २०११ पर्यंत भारतीय बाजारपेठेत नोकिया कंपनीच्या मोबाईलाच ग्राहकांनी सर्वाधिक मागणी केली आहे. देशांत सध्या १०० मोबाईलमागे नोकिया कंपनीचे ४८ मोबाईल आहेत. याचे सर्वेक्षण मोबाईल...
  July 10, 04:20 PM
 • नवी दिल्ली - तंत्रज्ञानात अव्वल असणारी अमेरिकेतील सर्वोच्च कंपनी ऍपल पुढील महिन्यात बाजारात धमाका करणार आहे. ऍपल एक नवा आयफोन बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. ऍपलने या नव्या आयफोनमधील विविध पार्ट तैवानमधील कंपनीकडे फोन असेंबल करण्यासाठी दिले आहेत.तैवानमधील होन हाई इन ही कंपनी आयफोन असेंबल करीत आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या माहितीनुसार, हा आयफोन हलका आणि आकारानेही लहान असणार आहे. यामध्ये ८ मेगापिक्सल कॅमेरा आणि आयफोन टचस्क्रिन असणार आहे. तसेच जर्मनीत बनविण्यात आलेल्या चीप यामध्ये...
  July 7, 12:27 PM
 • नवी दिल्ली - आपल्याला जे पाहिजे ते करता येणारा कॉम्प्यूटर मिळाला तर आयुष्य किती सहजपणे जगता येईल. पण, आता असे जगणे सहजपणे शक्य होणार आहे. वॉशिंग्टनमधील एका कंपनीने अशी चीप बनविल्याचा दावा केला आहे.ही चीप सर्व प्रकारच्या लॅपटॉपमध्ये वापरता येऊ शकते. या चीपमध्ये सीपीयू आणि जीपीयू दोन्ही एकत्र असणार आहे. कंपनीने या चीपला एक्सीलेरेटेड प्रोसेस्ड युनिट (एपीयू) असे नाव दिले आहे. त्यामुळे कॉम्प्यूटर सुपर फास्ट गतीने काम करू शकतो. या चीपमुळे लॅपटॉपची बॅटरीची ताकत वाढण्याची शक्यता आहे. या चीपमुळे...
  July 5, 09:36 PM
 • नवी दिल्ली - सॅमसंग गॅलेक्सी मोबाईलच्या विक्रीने नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या मोबाईलच्या खरेदीसाठी जगभरातील लोक तुटून पडले आहेत. जगभरात दीड सेकंदानंतर एक मोबाईल विकला जात आहे. गेल्या ५५ दिवसांत ३० लाख हँडसेट विकले गेले आहेत. खपांचा विक्रम करणारा हा मोबाईल सॅमसंग गॅलेक्सी एस२ हा आहे. या मोबाईलने विक्रीच सॅमसंगचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे.सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या पत्रकात म्हटले आहे की, या हँडसेटची युरोपात मोठी क्रेझ आहे. इंग्लंडमध्ये या हँडसेटला सर्वश्रेष्ठ मोबाईलचा...
  July 4, 05:58 PM
 • जयपूर - बहुराष्ट्रीय कंपनी स्पाइस मोबिलिटीने देशातील पहिले क्लस्टर कार्यालय जयपूर येथे उघडले आहे. या वेळी कंपनीने ट्रान्सफॉर्मर हा नवा हँडसेट बाजारात आणला. याची किमत ३७९९ रुपये आहे. कंपनीने गुजरात व राजस्थान राज्यांसाठी येथे क्लस्टर कार्यालय उघडले आहे. या कार्यालयात मोबाइलसंबंधीच्या सर्व तक्रारींचे निरसन केले जाणार आहे. कंपनीचे बिझनेसप्रमुख दिव्य गुप्ता यांनी सांगितले की, सध्या कंपनीचे १७ मॉडेल बाजारात उपलब्ध आहेत. लवकरच आणखी आठ नवे मॉडेल बाजारात दाखल होणार आहेत. वाढती विक्री...
  June 30, 03:40 AM
 • नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत झालेल्या घसरणीमुळे जागतिक स्तरावरील बहुतांश बाजारांत उत्साह दिसून आला. वाढती महागाई तसेच व्याजदरातील वाढीची चिंता काहीअंशी कमी झाल्याने भारतीय गुंतवणूकदारांनी जोरदार खरेदी केल्याने आठवड्याच्या शेवटच्या सत्रात सेन्सेक्सने ५१३ अंकांची उसळी घेतली. नऊ महिन्यांनंतर बाजारात असे उत्साही वातावरण दिसले. मात्र शुक्रवारी रात्री झालेल्या इंधन दरवाढीमुळे सोमवारच्या सत्रात बाजाराचा मूड कसा राहतो, यावर आगामी काळातील वाटचाल...
  June 26, 04:33 AM
 • नवी दिल्ली- मोबाइलद्वारे आयकर रिटर्न दाखल करता येण्यासाठी आज टॅक्सस्पॅन या आॅनलाइन आयकर रिटर्न कंपनीकडून विकसित सॉफ्टवेअरची मोबाइल आवृत्ती सुरू करण्यात आली आहे. कंपनीने सुरू केलेल्या नवीन मोबाइल संकेतस्थळामुळे ग्राहकांना मोबाइल वापरून सहज आयटी रिटर्न दाखल करता येईल, अशी माहिती कंपनीचे सीईओ अंकुर शर्मा यांनी दिली. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून ग्राहकांना ही सुविधा वापरता येणार आहे. ग्राहकाला यासाठी नोंदणी करण्याची गरज नसून, फक्त व्यक्तिगत तपशिलासह प्रपत्र भरून तिथेच प्रपत्र १६...
  June 25, 05:07 AM
 • बाजारात नोकियाचा हँडसेट एन ८ ला मिळालेल्या यशामुळे त्यांचा एन ९ कधी येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता ग्राहकांची प्रतीक्षा संपली असून, कंपनी लवकरच एन ९ हँडसेट बाजारात आणणार आहे. कंपनीने या स्मार्ट हँडसेटचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. हा हँडसेट तीन वेगवेगळ्या रंगांमध्ये ग्राहकांपर्यंत पोचणार आहे. मात्र, या हँडसेटची किंमत आणि लाँचिंग केव्हा होणार हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. या हँडसेटमध्ये १२ मेगापिक्सल कॅमेरा असणार आहे. तसेच माइक्रो सिमकार्डचा वापर करण्यात येणार आहे....
  June 21, 12:26 PM
 
जाहिरात

RECOMMENDED