जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Gadget

Gadget News

 • तैवानची कंपनी एचटीसीने मोबाइल वर्ल्ड काँग्रेसमध्ये आपले दोन जबरदस्त फोन सादर करून खळबळ माजवून दिली. एचटीसीचा चा आणि एचटीसी साल्सा असे हे दोन मोबाइल फोन होते. दिसण्याच्या बाबतीत दोन्ही एकाहूनएक सरस आहेत. याद्वारे एचटीसी सॅमसंग, मोटोरोला आणि सॅमसंग आणि मोबाइल निर्माता कंपन्यांना मागे टाकू शकतो. साल्साबाबत माहिती द्यायची झाल्यास हा एक टचस्क्रीन मोबाइल आहे. याचे वैशिष्ट्य असे की, याचे फेसबुक बटन दाबताच तुम्ही त्वरित फेसबुकच्या दुनियेत जाऊन पोहोचता. याच्या मागे 5 मेगापिक्सलचा कॅमेरा...
  May 12, 03:15 PM
 • नोकियाच्या या फोनबाबतीत काही माहिती बाहेर फुटली असून कंपनी मोबाइलमध्ये काही उत्कृष्ट सुविधा देणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार मोबाइलमध्ये स्वाइप जेस्चर असेल. त्यामध्ये तीन होमस्क्रीन असणार आहेत. नोकिया एस-40 च्या पहिल्या स्क्रीनवर अँप्लिकेशन्स असणार आहेत. दुसर्यावर शार्टकट्स, तर तिसर्यावर सतत वापरले जाणारे अँप्लिकेशन्स असतील. हे पाहून नोकिया एन-9 ची आठवण येते. यामध्ये अशाच प्रकारच्या सुविधा होत्या. मोबाइलच्या स्क्रीनवर डावी किंवा उजवीकडे स्वाइप करून बघितले असता स्क्रीन आपोआप...
  May 12, 12:20 PM
 • मुंबई - मुलं बाहेर आनंदात हुंदडत असली तरी आई - वडिलांना मात्र ती घरी कधी येतात याची सतत काळजी लागलेली असते. त्यातही आणखी उशीर झाला तर काळजाचा ठोका चुकतो. आपला मुलगा हरवला तर नाही ना, अशा एक ना अनेक शंकाकुशंकांचा फेरा मनात सुरू होतो. पण काळजी नका स्मार्टफोनवरील फॅमिली ट्रॅकर अॅपने ही चिंता कायमची मिटवली आहे. हे आगळेवेगळे अॅप भारतात उपलब्ध नसले तरी परदेशात सध्या आहे. पण ते आपल्याकडे यायला वेळ लागणार नाही हेही तितकेच खरे. गेल्या वर्षी अॅटलांटामध्ये 14 वर्षांचा मुलगा संध्याकाळी घरी परतलाच नाही....
  May 10, 12:13 AM
 • जगातील अग्रणी मोबाईल उत्पादक कंपनी सॅमसंगसहित नोकिया, एलजी आणि इतर कंपन्या लवकरच आपल्या हँडसेटच्या किंमती वाढवण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये होणा-या या संभावीत वाढी नंतर मोबाईल खरेदी करणे आणखी महाग होऊ शकते. साधारणपणे ही वाढ पाच टक्के ते 30 टक्के दरम्यान असू शकते.उल्लेखनीय म्हणजे सरकारने याचवर्षी सप्टेंबरमध्ये रेडिएशन नियम लागू करण्याची घोषणा दिली आहे. त्यामुळे मोबाईल कंपन्यांना या नव्या नियमांनुसार आपल्या हँडसेट तंत्रज्ञानात बदल करावा लागणार आहे. कंपन्यांनी असे न केल्यास हँडसेट...
  May 8, 03:03 PM
 • लंडन: दक्षिण कोरियाची कंपनी सॅमसंगने आपला नवा स्मार्टफोन गॅलक्सी एस-3 गुरुवारी रात्री लंडनमध्ये लाँच केला. भारतात हा फोन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. हा फोन आल्यानंतर अँपलच्या आयफोन, एचटीसीच्या वन-एक्स व इतर स्मार्टफोनला जबरदस्त टक्कर मिळणार आहे. सॅमसंग मोबाइलचे अध्यक्ष जे. के. शिन यांच्या मते या स्मार्टफोनच्या माध्यमातून आम्ही जगभरात धूम करू. हा फोन सर्व स्मार्टफोन व आयफोनचा किलर असल्याचा दावा करण्यात येत आहे. याअगोदर आम्ही गॅलक्सी एस-2 च्या साह्याने...
  May 6, 07:36 AM
 • नवी दिल्ली- मोबाईलच्या मार्केटमध्ये १४ वर्षाची नोकियाची मक्तेदारी संपुष्टात आणल्यानंतर सॅमसंगने गुरुवारी आपला स्मार्टफोन गॅलेक्सी एस-३ हा फोन लॉन्च केला. गॅलेक्सी एस-३ या फोनबाबत इंटरनेटवरुन बाजारात चर्चा गरम झाली आहे. भारतात हे मॉडेल जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होईल. याची किमत सुमारे ३८ हजार रुपये असेल. मात्र हा फोन ब्रिटनमध्ये २९ मेपासून तर त्यानंतर अमेरिकेत विक्रीस ठेवण्यात येणार आहे. गॅलेक्सी एस-३च्या खास फिचर्सवर एक नजर- - 1280x720 पिक्सल रिझॉल्यूशन असलेला हा फोन ४.८ इंच एचडी...
  May 4, 01:21 PM
 • मुंबई- स्वस्तात कॉल करण्याचा काळ आता संपत चालला आहे. कारण प्रीपेडच्या ग्राहकांना झटका दिल्यानंतर आता पोस्टपेड ग्राहकांनाही फोन कॉल्स महाग केले आहेत. याची सुरुवात व्होडाफोनने मुंबईतून केली आहे. त्यामुळे याच मर्गावरुन लवकरच दुस-या कंपन्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच व्होडाफोन दुस-या शहरातीलही सेवा महाग करण्याचे संकेत मिळत आहेत.व्होडाफोन ही देशातील सगळ्यात मोठी दुस-या क्रमाकांची कंपनी आहे. व्होडाफोनची मुंबई शहर ही मोठी बाजारपेठ आहे. तेथे कंपनीने प्रतिकॉल सुमारे २० टक्के...
  May 2, 10:23 AM
 • ब्रिटनच्या अभियंत्यांनी विमानासाठी एका अत्याधुनिक इंजिनाची चाचणी केली आहे. या इंजिनामुळे विमान जगातील कोणत्याही कोपर्यात फक्त चार तासांत पोहोचू शकेल, असा दावा अभियंत्यांनी केला आहे. प्रस्तावित स्कायक्लोन साधारण विमानासारखेच पारंपरिक रनवेवरून उड्डाण आणि लँडिंग करण्यात सक्षम ठरेल. विमानाची निर्मिती करणारी कंपनी आईएलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले की, आम्ही जुलैत होणार्या फॉर्नबॉरो इंटरनॅशनल एअरशोमध्ये विमान सादर करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. ब्रिटन जेट इंजिनाच्या...
  May 2, 02:40 AM
 • मोबाईल हॅण्डसेट निर्मितीच्या क्षेत्रात नोकियाची मक्तेदारी संपुष्टात आली आहे. नोकियाला पछाडून सॅमसंग जगातील नंबर एकची कंपनी बनली आहे. आतापर्यंत मोबाईल विक्रीमध्ये नोकिया अग्रस्थानी होती. चालु आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीमध्ये सॅमसंगने 9.35 कोटी हॅण्डसेटची विक्री केली आहे. तर नोकियाच्या विक्रीमध्ये 24 टक्के धट नोंदविण्यात आली आहे. हॅण्डसेटच्या बाजारपेठेत सँगसंगचा वाटा आता 25 टक्के झाला आहे. तर नोकियाचा वाटा घटून 22.5 टक्के झाला आहे. गेल्यावर्षी नोकियाचा वाटा 30 टक्के होता. तर सॅमसंगचा...
  April 28, 01:58 PM
 • डाटाविंडचे सीईओ सुनीतसिंग तुली यांनी नवी दिल्ली येथे आयोजित एका कार्यक्रमात कंपनीच्या युबीस्लेट श्रेणीतील नवीन टॅब्लेट सादर केले. युबीस्लेट 7 सी आणि 7 प्लस टॅबची किंमत 2,999 ते 3,999 रुपये आहे. 4 जीबी इनबिल्ट मेमरी, कोर्टेक्स ए 8-800 मेगाहर्ट्ज प्रोसेसर, 256 एमबी रॅम, 800 बाय 480 पिक्सेल टचस्क्रीन, तीन तास चालणारी बॅटरी यात असून, अँड्रॉइड 2.3 (झिंझर ब्रेड) वर हे टॅब्लेट चालू शकतात. वाय-फाय आणि जीपीआरएस या सुविधाही यात आहेत.'आकाश'ला 'ईरा'चे आव्हान, अवघ्या 4 हजार रुपयांमध्ये आधुनिक टॅबलेटसॅमसंगचा धमाका, आता सादर...
  April 27, 12:30 AM
 • मुंबई - केंद्र सरकारच्या आकाश-2 टॅब्लेटला होत असलेला विलंब अन्य टॅब्लेट कंपन्यांच्या चांगलाच पथ्यावर पडला असून सध्या बाजारात स्वस्तातल्या अँड्रॉइड टॅब्लेटची धूम सुरू झाली आहे. आता टेलमोको डेव्हलपमेंट लॅब्ज या कंपनीनेदेखील अॅटिट्यूड दक्षा हा नवा स्वस्तातला अँड्रॉइड टॅब्लेट आणला असून तो 15 मेपर्यंत बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. निजेश सी. आर., आदिथ बोस आणि कल्पा राधाकृष्णन या तरुण उद्योजकांनी प्रवर्तित केलेल्या टेलमोको डेव्हलपमेंट लॅब्स या कंपनीने अॅटिट्यूड टॅब्लेट्सचे प्रकार...
  April 25, 11:35 PM
 • नवी दिल्ली - बाजारात दररोज दाखल होणा-या नवनव्या अॅप्लिकेशन्स आणि इंटरनेट सुविधांमुळे स्मार्टफोनच्या खरेदीला चांगलाच हातभार लागत आहे. नवे अॅप्लिकेशन्स ग्राहकांना समार्टफोन खरेदीसाठी प्रोत्साहित करत असल्याचे एरिक्सन कंझ्युमर लॅबच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. इमर्जिंग कल्चर अॅप्स नावाच्या या अहवालासाठी भारत, रशिया आणि ब्राझीलमध्ये सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालानुसार, चांगल्या इंटरनेटच्या सुविधांमुळे स्मार्टफोन खरेदी केल्याचे 43 टक्के लोकांनी सांगितले. नव्या आणि अधिक...
  April 24, 01:21 AM
 • नवी दिल्ली - दूरसंचार नियामक प्राधिकरण ट्रायने सोमवारी टू जी-स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी बेस प्राइझ (किमान शुल्क) सल्ला जारी केला आहे. देशव्यापी टूजी स्पेक्ट्रमच्या लिलावासाठी ट्रायने 3,622.18 कोटी किमान शुल्क आकारण्यात यावे, अशी शिफारस केली आहे. 122 दूरसंचार परवाने रद्द केल्यानंतर न्यायालयाने त्या स्पेक्ट्रमचे नवे दर निश्चित करण्यासाठी ट्रायने शिफारस करावी, असा सल्ला दिला होता. 2008 मध्ये तत्कालीन दूरसंचार मंत्री ए. राजा यांच्या कार्यकाळात स्वान, युनिटेक व इतर कंपन्यांना स्पेक्ट्रमसाठी...
  April 24, 01:02 AM
 • जगभरातील संगणक सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, 2012 मध्ये हॅकर्सचे मुख्य लक्ष्य स्मार्टफोन्स असेल. 2010 च्या तुलनेत स्मार्टफोन्सवर सायबर हल्ल्याच्या घटना 2011 मध्ये खूपच वाढल्या आहेत. 2012 मध्ये त्या आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रशेल रॅटक्लिफ व्होमॅक या जगप्रसिद्ध डिजिटल सुरक्षा संस्थेच्या मते, शॉपिंग आणि मोबाइल बँकिंगसारख्या सुविधांमुळे हॅकर्सनी आता स्मार्टफोन्सकडे लक्ष वळवले आहे. स्मार्टफोन्समध्ये ठेवलेली वैयक्तिक माहिती, संपर्क आणि व्यावसायिक ई-मेल्सवरही हॅकर्सची नजर आहे....
  April 19, 01:16 PM
 • नवी दिल्ली- रिसर्च इन मोशन (रिम) ने नवा ब्लॅकबेरी स्मार्टफोन बाजारात आणला आहे. कंपनीने हे मॉडेल 'मोस्ट अफोर्डेबल' असल्याचे म्हटले आहे. कंपनीने दावा केला आहे की, ब्लॅकबेरी कर्व ९२२० या नव्या स्मार्टफोनची बॅटरी इतर दुस-या ब्लॅकबेरी कर्व स्मार्टफोनपेक्षा चांगली आहे.क्वर्टी कीपॅड असणा-या या स्मार्टफोन ब्लॅकबेरीची किंमत कंपनीने १० हजार ९९० रुपये एवढी ठेवली आहे. बॉलीवूड अभिनेत्री कॅटरीना कैफ हिने समारंभात या शानदार फोनचे लॉंचिंग केले. दोन मेगापिक्सल कॅमे-याच्या या फोनचे 320X240चे पिक्सल...
  April 19, 12:55 PM
 • अॅपल कंपनीचा 'आयपॅड मिनी' लवकरच बाजारात दाखल होणार असल्याची चर्चा आहे. त्याच्या नावाप्रमाणे हा टॅब्लेट सात इंच लांबीचा आहे. तसेच या आयपॅडची किंमत 250 डॉलर अर्थात 12500 रुपये आहे. त्यामुळे मिनी आयपॅडबाबत ग्राहकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. डिसेंबर 2012 पर्यंत हा टॅब्लेट बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या जगात विविध संकेतस्थळां या टॅब्लेटबाबत नवनवीन माहिती उपलब्ध करून देताहेत. अमेरिकेत तर 'आयपॅड मिनी'चे गूगलवरही ट्रेंडींग केले जात आहे.अॅपलचे दिवंगत संस्थापक स्टीव जॉब्स...
  April 18, 12:10 PM
 • सियोल - सॅमसंगचा अतिलोकप्रिय स्मार्टफोन गॅलक्सी एस सिरीजच्या तिस-या पिढीतील मॉडेल येत्या मे महिन्यात जगभरातील बाजारपेठांत डेरेदाखल होणार आहे. लाँचिंगसाठी सॅमसंगने लंडन शहराची निवड केली आहे. विशेष म्हणजे याच वर्षी लंडनमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा भरवली जात आहे. सॅमसंगच्या एस सिरीजने बाजारात पाऊल टाकताच जगभरातील मोबाइल मार्केटमध्ये विक्रीचे विक्रम प्रस्थापित केले होते. याच सिरीजच्या जोरावर सॅमसंग जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन निर्माता कंपनी बनली आहे. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात...
  April 18, 05:45 AM
 • नवी दिल्ली- ऍपल आयपॅडच्या चाहत्यांसाठी खुषखबर आहे. नवीन आयपॅड 27 एप्रिल रोजी भारतात उपलब्ध होणार असून, त्याची किंमत 30,500 रुपयांपासून पुढे राहणार आहे. नवा आयपॅड काळा व पांढरा, अशा दोन रंगात उपलब्ध होणार आहे. त्यात वाय-फाय आणि वाय-फाय अधिक 4जी तंत्रज्ञान असलेली दोन मॉडेल्स आहेत. यातही 16, 32 आणि 64 जीबी अशी दोन व्हेरीयन्ट्स उपलब्ध राहणार आहेत. वाय-फाय सुविधा असलेला 16 जीबी क्षमतेचा आयपॅड 30500 रुपयांचा आहे. तर 32 आणि 64 जीबी क्षमतेच्या आयपॅडची किंमत अनुक्रमे 36,500 आणि 42,500 अशी ठेवली आहे. वाय-फाय अधिक 4 जी मॉडेल असलेला...
  April 17, 04:01 PM
 • मुंबई- स्मार्टफोन्स, आयफोन्सने गजबजलेल्या मोबाइल बाजारपेठेला नवा ट्विस्ट देण्यासाठी नेदरलॅँडमधील बर्ग कंपनी एक अनोखी घड्याळ नव्हे मोबाइल भारतीय बाजारपेठेत घेऊन आली आहे. गंमत म्हणजे एकीकडे मनगटावरच्या या घड्याळाची टिक टिक आणि दुसया बाजूला मोबाइलची ट्रिंग ट्रिंग अशी डबल मजा मोबाइलप्रेमींना लवकरच घ्यायला मिळणार आहे.तसे म्हटले तर रिस्टवॉच मोबाइल काही नवीन गोष्ट नाही. एलजी कंपनीने अगोदरच रिस्टवॉच मोबाइल आणण्याची घोषणा केली असून सॅमसंगने अशा प्रकारच्या मोबाइलची प्रतिकृती सादर केली...
  April 15, 03:17 AM
 • ज्या व्यक्ती आपल्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर विंडोज एक्सपी वापरतात त्यांना मायक्रोसॉफ्टने इशारा दिला आहे. विंडोज एक्सपी वापरत असलेल्यांनी लवकरच विंडोज व्हिस्टा किंवा विंडोज 7 नी ऑपरेटींग सिस्टीम अपडेट करावे. कारण येत्या दोन वर्षांत विंडोज एक्सपी ऑपरेटींग सिस्टीम पूर्णपणे आऊटडेटेड होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. एका ब्लॉगवर कंपनीने ही माहिती दिली आहे. ठराविक वेळेनंतर कॉंम्प्युटरमध्ये समस्या आल्यास मायक्रोसॉफ्ट जबाबदार राहणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. कंपनीने...
  April 14, 04:53 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात