Home >> Business >> Industries

Industries News

 • मुंबई - टू-जी घोटाळाप्रकरणी अटक करण्यात आलेले स्वान टेलिकॉमचे प्रवर्तक शाहिद उस्मान बलवा यांचे वकील माजिद मेमन यांनी रतन टाटा यांच्यावर तामिळनाडूतील एका रुग्णालयाला 20 कोटी रुपयांची देणगी दिल्याचा आरोप केला होता. परंतु अशी कोणतीही देणगी राजा यांच्या रुग्णालयाला देण्यात आलेली नसल्याचे टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी टाटा स्टील लिमिटेडच्या 104 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले.टू-जी घोटाळाप्रकरणी सध्या तिहार तुरुंगात असलेले माजी दूरसंचारमंत्री ए. राजा यांच्या मतदारसंघात...
  August 3, 11:30 PM
 • मुंबई - ग्राहकांच्या प्रतिसादाअभावी रिकाम्या पडलेल्या सदनिकांकडे खरेदीदारांना आकृष्ट करण्याकरिता आता बिल्डर मंडळींनी नवनव्या क्लृप्त्या लढवण्यास सुरुवात केली आहे. महागडी कार भेट देणे, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेची तिकिटे आणि विमान प्रवास, मलेशिया-सिंगापूर दर्शन अशा प्रकारची आमिषे दाखवून ग्राहकांना गळाला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबईत घरांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे किमती कमी केल्याशिवाय घरे खरेदी करण्यासाठी ग्राहक धजावणार नाहीत. अशा सवलतींचा वर्षाव करून फारसा उपयोग...
  August 3, 11:27 PM
 • नवी दिल्ली - दूरसंचार सेवा प्रदाता कंपनी बीएसएनएल आणि इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठाने (इग्नू) देशातील शिक्षण व प्रशिक्षणाशी संबंधित विविध कार्यक्रमांत योगदान देण्यासाठी सहमती करारावर स्वाक्ष-या केल्या आहेत. या कराराअंतर्गत देशातील सर्वात मोठ्या शैक्षणिक जाळ्याच्या व्यवस्थापनासाठी बीएसएनएल तिचे तंत्रज्ञान जाळे आणि सेवा क्षमतांचा लाभ देणार आहे. इग्नूची प्रादेशिक केंद्रे व अभ्यास केंदे देशभरात पसरली आहेत. नॅशनल नॉलेज नेटवर्क (एनकेएन), नॅशनल मिशन इन एज्युकेशन थ्रू आयसीटी, नॅशनल...
  August 3, 11:25 PM
 • नवी दिल्ली । वित्तीय वर्ष 2011-12 च्या पहिल्या तिमाहीत गेल इंडिया लिमिटेडच्या उलाढालीत 25 टक्क्यांची वाढ नोंदविली असून ती मागील वर्षातील 7096 कोटी रुपयांवरून पहिल्या तिमाहीत 8867 कोटी रुपयांवर गेली आहे. त्याचप्रमाणे करपूर्व नफ्यात 9 टक्के वाढ होऊन तो 1332 कोटी रुपयांवरून 1443 कोटी रुपये नोंद झाला. गेलच्या निव्वळ नफ्यात 11 टक्के वाढ झाली असून मागील वर्षी 887 कोटी असणारा निव्वळ नफा या वर्षी 985 कोटींवर गेला आहे. गेलने तिमाही दरम्यानच एलपीजी सबसिडीच्या रुपात रु. ६८२ कोटी रुपये प्रदान केले आहे. नैसर्गिक वायू...
  August 3, 11:21 PM
 • नवी दिल्ली । ख्यातनाम अमेरिकन व्यापार कंपनी फोर्ब्सने भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लि. (बीएचईएल) जगातील सर्वोच्च 100 सृजनशील कंपन्यांमध्ये नवव्या स्थानावर असल्याचे जाहीर केले आहे. या यादीतील ही एकमेव भारतीय अभियांत्रिकी कंपनी असून समकक्ष बहुराष्टीय ऊर्जा साधन क्षेत्रातील कंपन्यांत तिचे स्थान सर्वात वर आहे. हा सन्मान मिळण्यापूर्वी कंपनीला राष्टपतींच्या हस्ते स्कोप मेरिटोरियस अवॉर्ड फॉर आर अॅण्ड डी, टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट अॅण्ड इनोव्हेशन प्रदान करण्यात आला आहे. कंपनीला हाय-टेक...
  August 3, 11:18 PM
 • मुंबई - शाखा विस्तार आणि व्यवसाय विकासाचा एक भाग म्हणून इंडियन ओव्हरसीज बँकेने ३ हजार ५२४ नवीन कर्मचा-यांची भरती प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी दिली. विशेष अधिकारी (५२५) आणि लिपिक कर्मचारी (१५००) यांच्या व्यतिरिक्त १५०० प्रोबेशनरी अधिकायांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे. यंदा ४०० नवीन शाखा सुरू करण्याची बँकेची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. ३० जूनअखेर संपलेल्या कालावधीत बँकेच्या एकूण शाखांची संख्या २ हजार २०६ वर...
  August 3, 11:17 PM
 • नवी दिल्ली - चित्रपट प्रदर्शन, खाद्यप्रक्रिया आणि रिटेलमधील कंपनी एसआरएस लि. २३ ऑगस्ट रोजी खुल्या होणा-या १० रुपये प्रति शेअर मूल्याच्या आयपीओच्या माध्यमातून ३.५ कोटी रुपयांचे भांडवल उभे करीत आहे. कंपनीने आयपीओच्या माध्यमातून २५.१३ टक्के वाटा विकून २२५ कोटी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
  August 3, 11:08 PM
 • नवी दिल्ली - उत्पादनावर कोणताही दुष्परिणाम होऊ न देता रिलायन्स इंडस्ट्रीजने दुरुस्तीच्या कारणामुळे आंध्र किनारपट्टीवरील केजी-डी ६ तेलपट्ट्यातील उत्पादन स्थगित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमए तेलक्षेत्रावरील एफपीएसओ कॉम्प्रेसरच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी रिलायन्सने ३१ जुलै रोजी उत्पादन बंद केले. एमए तेलक्षेत्रातील पाच विहिरींतून दररोज १५००० बॅरल्स तेल आणि ७.६ दशलक्ष मानक घनमीटर्स नैसर्गिक वायू उत्पादित केला जातो.
  August 3, 11:02 PM
 • मुंबई - पवन ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंडोविंड एनर्जी या कंपनीने १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करून कर्नाटक आणि तामिळनाडूनमध्ये २८ मेगावॅट ऊर्जा निर्मिती क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा विचार केला आहे. या प्रकल्पासह एकूण पवन ऊर्जा निर्मिती क्षमता २०१२ पर्यंत ७१.९२ मेगावॅटपर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष के. व्ही. बिर्ला यांनी दिली. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या १५ प्रकल्पांची ऊर्जा निर्मिती क्षमता ४३.९२ मेगावॅट आहे. या दोन्ही...
  August 3, 01:12 AM
 • मुंबई । सहकारी बँकिंग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या सारस्वत बँकेला आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. गेल्या एका दशकात जवळपास सहापटींनी वाढ नोंदवत २८ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करणा-या या बँकेची निवडणूक ६ आॅगस्टला होत आहे. या निवडणुकीतून बँकेच्या संचालक मंडळावर १६ सदस्य निवडून जातील. या बँकेने अलीकडेच रिझर्व्ह बँकेकडून देशपातळीवर व्यवहार करण्याचा परवाना मिळवला. सारस्वत बँकेचे १ लाख ६८ हजार सभासद देशातील २०० मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावून १६ संचालकांची निवड करतील. या निवडणूक...
  August 3, 01:09 AM
 • मुंबई - कागद, सिमेंट आणि विद्युत क्षेत्रात कार्यरत असलेल्या ओरिएंट पेपर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या सिमेंट व्यवसायाचे स्वतंत्र कंपनीत रूपांतर करण्याचे जाहीर केले आहे. सिमेंट व्यवसायासाठी स्थापन करण्यात आलेल्या ओरिएंट सिमेंट लिमिटेड या नव्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सिमेंट व्यवसाय स्वतंत्र करण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली. या नवीन कंपनीमध्ये ओरिएंट पेपर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विद्यमान भागधारकांना ओरिएंट सिमेंट कंपनीचा प्रत्येकी एक समभाग मिळणार आहे. या...
  August 3, 01:04 AM
 • नवी दिल्ली - जागतिक अस्थैर्यामुळे तसेच देशातील कर्ज महागल्याने अर्थव्यस्थेची गती थोडी मंदावली आहे. ही गती सुधारण्यासाठी उद्योजकांनी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी द्यावी, असे आवाहन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी उद्योजकांना केले. औद्योगिक उत्पादनातील घट, महागडे कर्ज आणि जागतिक अस्थैर्य या पार्श्वभूमीवर आगामी धोरण ठरविण्यासाठी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी देशातील प्रमुख उद्योजकांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. या बैठकीला उद्योगमंत्री आनंद शर्मा,...
  August 3, 01:01 AM
 • नवी दिल्ली - निव्वळ नफ्यात प्रचंड घटीचा फटका बसलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने अनुत्पादक संपत्ती (एनपीए) नियंत्रणात आणण्यासाठी १४ ट्रॅकिंग सेंटर्स स्थापन केल्याची माहिती आज संसदेसमोर सादर करण्यात आली. अनुत्पादक संपत्ती नियंत्रणात आणण्यासाठी बँकेच्या सर्व १४ सर्कल्समध्ये ट्रॅकिंग सेंटर्स स्थापन केल्याची माहिती स्टेट बँकेने दिली असल्याचे अर्थ राज्यमंत्री नमो नारायण मीणा यांनी राज्यसभेत सांगितले मागील वर्षाच्या १,८६६.६० कोटींवरून ३१ मार्च २०११ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत...
  August 3, 12:56 AM
 • हैदराबाद - इंडिया इन्फोलाइन लि.ची उपकंपनी इंडिया इन्फोलाइन इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस लिमिटेड ३७५ कोटींच्या ओव्हर सबस्क्रिप्शन पर्यायासह ४ ऑगस्ट रोजी अपरिवर्तनीय रोख्यांचा ७५० कोटींचा आयपीओ काढत आहे. या इश्यूअंतर्गत मोडता येणा-या अपरिवर्तनीय रोख्यांची किंमत एक हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तीन गुंतवणूक पर्याय व वार्षिक ११.९० टक्क्यांचा परतावा असणार आहे.
  August 3, 12:48 AM
 • नवी दिल्ली - येत्या ऑक्टोबरपर्यंत महागाई ९ टक्क्यांपर्यंत राहील, तसेच किमती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक आपले कडक धोरण सुरूच ठेवील, असे मत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने व्यक्त केले आहे. नोव्हेंबरमध्ये महागाई कमी होऊन ती मार्च २०१२ पर्यंत आरामात ६.५ टक्क्यांवर येईल, असे मत या समितीचे चेअरमन सी. रंगराजन यांनी व्यक्त केले. समितीच्या वतीने आर्थिक समीक्षा : २०११-१२ अहवाल जारी करण्यात आला, त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, जुलै-ऑक्टोबर या काळात मुख्य...
  August 2, 01:33 AM
 • मुंबई - निधीसाठी करावी लागलेली सर्वाधिक तरतूद आणि नफा क्षमतेवर आलेला ताण याचा मोठा फटका सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बसला आहे. परिणामी जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत या बँकेचा निव्वळ नफा मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. डिसेंबर २००९ नंतर पहिल्यांदाच इतकी जास्त घसरण निव्वळ नफ्यामध्ये झाली असल्याचे दिसून आले आहे, परंतु खासगी क्षेत्रातील बॅँकांना मात्र आपल्या नफ्याची तब्येत चांगली ठेवण्यात यश आले आहे. निव्वळ व्याज उत्पन्नात झालेली घट आणि मालमत्तेच्या पुनर्बांधणीसाठी करावी लागलेली...
  August 2, 01:27 AM
 • नवी दिल्ली । स्टार अलायन्सच्या जागतिक एअरलाइन्स जाळ्यात एअर इंडियाच्या सहभागास स्थगिती दिल्याने एअर इंडियाला मोठा झटका बसला आहे. स्टार अलायन्सचा हा निर्णय अनपेक्षित व धक्कादायक असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले. एअर इंडिया अटी पूर्ण करीत नसल्याने २७ सदस्यीय स्टार अलायन्सने एअर इंडियाच्या जागतिक एअरलाइन्स जाळ्यातील सहभागाला स्थगिती दिली. एअर इंडिया स्टार अलायन्समध्ये सहभागी झाल्यास आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विदेशात चांगली सेवा देता येते.
  August 2, 01:25 AM
 • लंडन - जागतिक बँकिंगमधील मोठी कंपनी एचएसबीसीने खर्चकपात मोहिमेचा भाग म्हणून सन २०१३ च्या अखेरीपर्यंत बँकेच्या जगभरातील ३०,००० नोक-या कमी केल्या जातील असे जाहीर केले आहे. या वर्षात अगोदरच पाच हजार नोकर कपात करण्यात आली असून, बँकेच्या २,९६,००० कर्मचा-यांच्या जागतिक मनुष्यबळापैकी २५००० लोकांना कमी केले जाईल असे स्पष्टीकरण बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट गलिव्हर यांनी म्हटल्याचे वृत्त दि गार्डियनने प्रकाशित केले आहे. बँक इक्विटीवरील परतावा सध्याच्या ९.५ टक्क्यांवरून १२ ते १५...
  August 2, 01:23 AM
 • चेन्नई । इंडियन ओव्हरसीज बँकेने सन २०१०-११ साठी केंद्र सरकारला २०३.७७ कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. नरेंद्र यांनी नवी दिल्ली येथे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना २०३.७७ कोटी रुपयांचा धनादेश सोपवला, असे बँकेकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
  August 2, 01:16 AM
 • मुंबई- रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याज दरवाढीमुळे बँकांना आता बुडीत मालमत्तेची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे बुडीत मालमत्तेच्या वाढीस लगाम घालण्यासाठी बँकांनी आता एमएसएमईबरोबरच आता व्यावसायिक स्थावर मालमत्ता आणि निवासी मालमत्ता यांसारख्या व्याजदर संवेदनशील क्षेत्रांना देण्यात येणाया कर्जाचे प्रमाण कमी करण्याचा विचार केला आहे. केवळ हीच क्षेत्रे नाहीत, तर ऊर्जा आणि पायाभूत क्षेत्रांतील अन्य प्रकल्पांची अंमलबजावणी लांबणीवर पडू लागल्यामुळे या क्षेत्रांना कर्ज देण्याबाबतही...
  July 31, 03:29 AM
 
जाहिरात

RECOMMENDED