Home >> Business >> Industries

Industries News

 • नवी दिल्ली - एप्रिल महिन्यात देशात 15.96 लाख टन युरिया आणि 2.63 लाख टन डायअमोनियम फॉस्फेटचे (डीएपी) उत्पादन झाले. चालू वर्षातील एप्रिल महिन्यात, 3.65 लाख टन युरियाची आयात झाली; त्यापैकी 1.42 लाख टन ओमिफ्को, ओमान तर 2.22 लाख टन इतर स्रोतांकडून आयात करण्यात आला. एप्रिलमध्ये 0.30 लाख टन डीएपी तसेच 3.21 लाख टन एमओपीदेखील आयात करण्यात आले आहे. राज्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी देशात मुबलक फर्टिलायझर्स उपलब्ध आहेत. डीएपी, एमओपीची एप्रिलमधील उपलब्धता अनुक्रमे 2.31 लाख टन व 0.98 लाख टन होती. एप्रिलदरम्यान देशभरात 19.45 लाख टन...
  May 20, 01:42 PM
 • कोल इंडिया ही शासकीय कंपनी देशातील सर्वात मोठी शासकीय कंपनी झाली आहे. पब्लिक इश्यू जाहीर करण्यासह कंपनीने उचलेले प्रत्येक पाऊल अचूक ठरल्याने तिला हा बहुमान मिळाला आहे. कोल इंडियाच्या बाजारातील भांडवलाच्या दृष्टीने ती भारतातील दुसरी सर्वात मोठी कंपनी होत असताना तिने भांडवलाच्या दृष्टीने आेएनजीसीची मक्तेदारी मोडून काढली. ओएनजीसीचा बाजारातील वाटा 2,41,222 कोटी असून कोल इंडियाच्या भांडवलाचा बाजारातील नुकताच जाहीर झालेला वाटा 2,51,170 कोटी रूपये आहे. रिलायन्सनंतर कोल इंडिया ही दुस:या...
  May 19, 05:28 PM
 • सेल या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीचा 8,000 कोटींचा बहुप्रतीक्षित एफपीओ लवकरच जाहीर होत आहे. कंपनीची फॉलो ऑन पब्लिक ऑफर (एफपीओ) येत्या 14 च्या जवळपास जाहीर होण्याची शक्यता आहे. स्टील क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी तिच्या प्रस्तावित एफपीओसाठी सेबीसमोर या महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रॉस्पेक्टस सादर करणार आहे. या एफपीओसाठी रेड हेरींग प्रॉस्पेक्टस चालू महिन्याच्या अखेरीपर्यंत सेबी समोर सादर केले जाईल; पण निश्चित तारीख अजून ठरलेली नाही असे सेलचे प्रवक्ते आर. के. सिंघल यांनी सांगितले. 23 मे रोजी...
  May 19, 05:08 PM
 • नवी दिल्ली -केंद्र शासनाने आज औद्योगिक उत्पादनाचे मापन करणारा निर्देशांक मंजूर केला आहे. या अंतर्गत आईस्क्रीम, ज्यूस आणि मोबाईल हॅण्डसेटसारख्या 100 नवीन वस्तूंच्या उत्पादन कलावरून या वस्तूंच्या एकूण औद्योगिक उत्पादनाचे आकलन होईल. कॉम्प्युटर स्टेशनरी, वर्तमानपत्रे, अमोनिया सल्फेटसारखी रसायने, इलेक्ट्रीक उत्पादने, रत्ने आणि दागिने यासारख्या वस्तूंचा या औद्योगिक निर्देशांकात (आयआयपी) समावेश आहे. निर्देशांकातून काढलेल्या वस्तू टाईपरायटर्स, लाऊड स्पीकर आणि व्हीसीआर यासारख्या सध्या...
  May 19, 05:01 PM
 • नवी दिल्ली - ग्राहकांच्या हितासाठी कोणत्याही क्षेत्रात कोणत्याही कंपनीचा एकाधिकार राहु नये म्हणून सीसीआयने नवीन नियम जारी केले आहेत. यामुळेकॉर्पोरेट कंपन्यांची अधिग्रहणे आणि विलय यात कोणतेही अडथळे येणार नाहीत असे भारतातील स्पर्धात्मकतेवर नजर ठेवणारे प्राधिकरण सीसीआयने म्हटले आहे. कंपन्यांची अधिग्रहणे आणि विलयासंदर्भात सीसीआयने जारी केलेल्या नियमांमुळे अडथळे निर्माण होणार नाहीत, उलट आम्ही व्यावहारिक दृष्टीकोन बाळगणार आहोत; आपली अर्थव्यवस्था मुक्त असल्याने तिचे नियमन होणे...
  May 19, 04:48 PM
 • बंगलुरू - भारतातील विक्री आणि निर्यात वाढविण्यासाठी फोर्ड मोटर तिच्या चेन्नईमधील प्रकल्पात७२ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणुक करणार आहे. सन२०१२ च्या मध्यावर प्रकल्पाचा विस्तार पूर्ण होताच त्यात फोर्डच्या अतिरिक्त८०.००० डिझेल इंजिन्सचे वार्षिक उत्पादन काढले जाईल. या विस्तारामुळे आम्ही भारतातील गुंतवणुकीला किती महत्व देतो ते अधारेखीत होते असे फोर्ड इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मायकल बोनहॅम यांनी म्हटले आहे. या गुंतवणुकीमुळे फोर्डची भारतातील एकूण गुंतवणुकएक अब्ज डॉलर्सवर जाणार आहे. ही...
  May 19, 04:44 PM
 
जाहिरात

RECOMMENDED