जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Industries

Industries News

 • मुंबई - शाखा विस्तार आणि व्यवसाय विकासाचा एक भाग म्हणून इंडियन ओव्हरसीज बँकेने ३ हजार ५२४ नवीन कर्मचा-यांची भरती प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांनी दिली. विशेष अधिकारी (५२५) आणि लिपिक कर्मचारी (१५००) यांच्या व्यतिरिक्त १५०० प्रोबेशनरी अधिकायांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया बँकेने सुरू केली आहे. यंदा ४०० नवीन शाखा सुरू करण्याची बँकेची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. ३० जूनअखेर संपलेल्या कालावधीत बँकेच्या एकूण शाखांची संख्या २ हजार २०६ वर...
  August 3, 11:17 PM
 • नवी दिल्ली - चित्रपट प्रदर्शन, खाद्यप्रक्रिया आणि रिटेलमधील कंपनी एसआरएस लि. २३ ऑगस्ट रोजी खुल्या होणा-या १० रुपये प्रति शेअर मूल्याच्या आयपीओच्या माध्यमातून ३.५ कोटी रुपयांचे भांडवल उभे करीत आहे. कंपनीने आयपीओच्या माध्यमातून २५.१३ टक्के वाटा विकून २२५ कोटी उभारण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
  August 3, 11:08 PM
 • नवी दिल्ली - उत्पादनावर कोणताही दुष्परिणाम होऊ न देता रिलायन्स इंडस्ट्रीजने दुरुस्तीच्या कारणामुळे आंध्र किनारपट्टीवरील केजी-डी ६ तेलपट्ट्यातील उत्पादन स्थगित केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एमए तेलक्षेत्रावरील एफपीएसओ कॉम्प्रेसरच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी रिलायन्सने ३१ जुलै रोजी उत्पादन बंद केले. एमए तेलक्षेत्रातील पाच विहिरींतून दररोज १५००० बॅरल्स तेल आणि ७.६ दशलक्ष मानक घनमीटर्स नैसर्गिक वायू उत्पादित केला जातो.
  August 3, 11:02 PM
 • मुंबई - पवन ऊर्जा क्षेत्रात कार्यरत असलेल्या इंडोविंड एनर्जी या कंपनीने १२० कोटी रुपयांची गुंतवणूक करून कर्नाटक आणि तामिळनाडूनमध्ये २८ मेगावॅट ऊर्जा निर्मिती क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचा विचार केला आहे. या प्रकल्पासह एकूण पवन ऊर्जा निर्मिती क्षमता २०१२ पर्यंत ७१.९२ मेगावॅटपर्यंत नेण्यात येणार असल्याची माहिती कंपनीचे अध्यक्ष के. व्ही. बिर्ला यांनी दिली. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सध्या अस्तित्वात असलेल्या १५ प्रकल्पांची ऊर्जा निर्मिती क्षमता ४३.९२ मेगावॅट आहे. या दोन्ही...
  August 3, 01:12 AM
 • मुंबई । सहकारी बँकिंग क्षेत्रात आघाडीवर असलेल्या सारस्वत बँकेला आता निवडणुकीचे वेध लागले आहेत. गेल्या एका दशकात जवळपास सहापटींनी वाढ नोंदवत २८ हजार कोटी रुपयांचा व्यवसाय करणा-या या बँकेची निवडणूक ६ आॅगस्टला होत आहे. या निवडणुकीतून बँकेच्या संचालक मंडळावर १६ सदस्य निवडून जातील. या बँकेने अलीकडेच रिझर्व्ह बँकेकडून देशपातळीवर व्यवहार करण्याचा परवाना मिळवला. सारस्वत बँकेचे १ लाख ६८ हजार सभासद देशातील २०० मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावून १६ संचालकांची निवड करतील. या निवडणूक...
  August 3, 01:09 AM
 • मुंबई - कागद, सिमेंट आणि विद्युत क्षेत्रात कार्यरत असलेल्या ओरिएंट पेपर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडने आपल्या सिमेंट व्यवसायाचे स्वतंत्र कंपनीत रूपांतर करण्याचे जाहीर केले आहे. सिमेंट व्यवसायासाठी स्थापन करण्यात आलेल्या ओरिएंट सिमेंट लिमिटेड या नव्या कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत सिमेंट व्यवसाय स्वतंत्र करण्याच्या योजनेला मान्यता देण्यात आली. या नवीन कंपनीमध्ये ओरिएंट पेपर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडच्या विद्यमान भागधारकांना ओरिएंट सिमेंट कंपनीचा प्रत्येकी एक समभाग मिळणार आहे. या...
  August 3, 01:04 AM
 • नवी दिल्ली - जागतिक अस्थैर्यामुळे तसेच देशातील कर्ज महागल्याने अर्थव्यस्थेची गती थोडी मंदावली आहे. ही गती सुधारण्यासाठी उद्योजकांनी अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी द्यावी, असे आवाहन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी उद्योजकांना केले. औद्योगिक उत्पादनातील घट, महागडे कर्ज आणि जागतिक अस्थैर्य या पार्श्वभूमीवर आगामी धोरण ठरविण्यासाठी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी देशातील प्रमुख उद्योजकांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर त्यांनी वार्ताहरांना ही माहिती दिली. या बैठकीला उद्योगमंत्री आनंद शर्मा,...
  August 3, 01:01 AM
 • नवी दिल्ली - निव्वळ नफ्यात प्रचंड घटीचा फटका बसलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने अनुत्पादक संपत्ती (एनपीए) नियंत्रणात आणण्यासाठी १४ ट्रॅकिंग सेंटर्स स्थापन केल्याची माहिती आज संसदेसमोर सादर करण्यात आली. अनुत्पादक संपत्ती नियंत्रणात आणण्यासाठी बँकेच्या सर्व १४ सर्कल्समध्ये ट्रॅकिंग सेंटर्स स्थापन केल्याची माहिती स्टेट बँकेने दिली असल्याचे अर्थ राज्यमंत्री नमो नारायण मीणा यांनी राज्यसभेत सांगितले मागील वर्षाच्या १,८६६.६० कोटींवरून ३१ मार्च २०११ रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत...
  August 3, 12:56 AM
 • हैदराबाद - इंडिया इन्फोलाइन लि.ची उपकंपनी इंडिया इन्फोलाइन इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस लिमिटेड ३७५ कोटींच्या ओव्हर सबस्क्रिप्शन पर्यायासह ४ ऑगस्ट रोजी अपरिवर्तनीय रोख्यांचा ७५० कोटींचा आयपीओ काढत आहे. या इश्यूअंतर्गत मोडता येणा-या अपरिवर्तनीय रोख्यांची किंमत एक हजार रुपये ठेवण्यात आली आहे. तीन गुंतवणूक पर्याय व वार्षिक ११.९० टक्क्यांचा परतावा असणार आहे.
  August 3, 12:48 AM
 • नवी दिल्ली - येत्या ऑक्टोबरपर्यंत महागाई ९ टक्क्यांपर्यंत राहील, तसेच किमती नियंत्रणात आणण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक आपले कडक धोरण सुरूच ठेवील, असे मत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीने व्यक्त केले आहे. नोव्हेंबरमध्ये महागाई कमी होऊन ती मार्च २०१२ पर्यंत आरामात ६.५ टक्क्यांवर येईल, असे मत या समितीचे चेअरमन सी. रंगराजन यांनी व्यक्त केले. समितीच्या वतीने आर्थिक समीक्षा : २०११-१२ अहवाल जारी करण्यात आला, त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, जुलै-ऑक्टोबर या काळात मुख्य...
  August 2, 01:33 AM
 • मुंबई - निधीसाठी करावी लागलेली सर्वाधिक तरतूद आणि नफा क्षमतेवर आलेला ताण याचा मोठा फटका सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना बसला आहे. परिणामी जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत या बँकेचा निव्वळ नफा मोठ्या प्रमाणावर घसरला आहे. डिसेंबर २००९ नंतर पहिल्यांदाच इतकी जास्त घसरण निव्वळ नफ्यामध्ये झाली असल्याचे दिसून आले आहे, परंतु खासगी क्षेत्रातील बॅँकांना मात्र आपल्या नफ्याची तब्येत चांगली ठेवण्यात यश आले आहे. निव्वळ व्याज उत्पन्नात झालेली घट आणि मालमत्तेच्या पुनर्बांधणीसाठी करावी लागलेली...
  August 2, 01:27 AM
 • नवी दिल्ली । स्टार अलायन्सच्या जागतिक एअरलाइन्स जाळ्यात एअर इंडियाच्या सहभागास स्थगिती दिल्याने एअर इंडियाला मोठा झटका बसला आहे. स्टार अलायन्सचा हा निर्णय अनपेक्षित व धक्कादायक असल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले. एअर इंडिया अटी पूर्ण करीत नसल्याने २७ सदस्यीय स्टार अलायन्सने एअर इंडियाच्या जागतिक एअरलाइन्स जाळ्यातील सहभागाला स्थगिती दिली. एअर इंडिया स्टार अलायन्समध्ये सहभागी झाल्यास आंतरराष्ट्रीय प्रवाशांना विदेशात चांगली सेवा देता येते.
  August 2, 01:25 AM
 • लंडन - जागतिक बँकिंगमधील मोठी कंपनी एचएसबीसीने खर्चकपात मोहिमेचा भाग म्हणून सन २०१३ च्या अखेरीपर्यंत बँकेच्या जगभरातील ३०,००० नोक-या कमी केल्या जातील असे जाहीर केले आहे. या वर्षात अगोदरच पाच हजार नोकर कपात करण्यात आली असून, बँकेच्या २,९६,००० कर्मचा-यांच्या जागतिक मनुष्यबळापैकी २५००० लोकांना कमी केले जाईल असे स्पष्टीकरण बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट गलिव्हर यांनी म्हटल्याचे वृत्त दि गार्डियनने प्रकाशित केले आहे. बँक इक्विटीवरील परतावा सध्याच्या ९.५ टक्क्यांवरून १२ ते १५...
  August 2, 01:23 AM
 • चेन्नई । इंडियन ओव्हरसीज बँकेने सन २०१०-११ साठी केंद्र सरकारला २०३.७७ कोटी रुपयांचा लाभांश दिला आहे. बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. नरेंद्र यांनी नवी दिल्ली येथे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांना २०३.७७ कोटी रुपयांचा धनादेश सोपवला, असे बँकेकडून जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
  August 2, 01:16 AM
 • मुंबई- रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याज दरवाढीमुळे बँकांना आता बुडीत मालमत्तेची चिंता सतावू लागली आहे. त्यामुळे बुडीत मालमत्तेच्या वाढीस लगाम घालण्यासाठी बँकांनी आता एमएसएमईबरोबरच आता व्यावसायिक स्थावर मालमत्ता आणि निवासी मालमत्ता यांसारख्या व्याजदर संवेदनशील क्षेत्रांना देण्यात येणाया कर्जाचे प्रमाण कमी करण्याचा विचार केला आहे. केवळ हीच क्षेत्रे नाहीत, तर ऊर्जा आणि पायाभूत क्षेत्रांतील अन्य प्रकल्पांची अंमलबजावणी लांबणीवर पडू लागल्यामुळे या क्षेत्रांना कर्ज देण्याबाबतही...
  July 31, 03:29 AM
 • नवी दिल्ली - कला, पुराणवस्तू आणि रिअल इस्टेट यांसारख्या पठडीबाह्य मार्गातून प्रचंड नफा कमावून देण्याची वचने देऊन गुंतवणूकदारांना भुलवणाया संस्था आता सेबीच्या कडक नजरेखाली येणार आहेत. लवकरच सेबी पर्यायी गुंतवणुकीसाठी नवीन अधिनियम जारी करणार आहे. काल सायंकाळी झालेल्या सेबी मंडळाच्या बैठकीत या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली व त्यांतर सेबीचे अध्यक्ष यू. के. सिन्हा यांनी सेबी पर्यायी गुंतवणूक व पोर्टफोलिओ वेल्थ मॅनेजर्ससाठी नवीन नियम आखणार असल्याची माहिती दिली आहे. या पर्यायी किंवा...
  July 30, 05:00 AM
 • नवी दिल्ली - वाणिज्य मंत्रालयाने मंजुरी दिलेल्या एक दशलक्ष टन बिगर बासमती तांदळाच्या निर्यातीवर दिल्ली उच्च न्यायालयाने स्थगिती आणल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. तांदूळ निर्यातीबाबत असलेल्या जाचक अटींवर आक्षेप घेणारी याचिका एका खासगी कंपनीतर्फे दाखल करण्यात आली होती त्यावर उच्च न्यायालयाने ही स्थगिती दिली आहे. बिगर बासमती तांदळावर एप्रिल २००८ पासून बंदी आहे. मात्र, यंदा उत्पादन चांगले झाल्याने व किमती स्थिर ठेवण्याच्या उद्देशाने सरकारने एक दशलक्ष टन तांदूळ निर्यातीला...
  July 30, 04:39 AM
 • नवी दिल्ली - डाळींच्या किमतीतील घसरणीमुळे १६ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात अन्नधान्य महागाई निर्देशांक ७.३३ टक्के या २० महिन्यांतील नीचांक पातळीपर्यंत खाली घसरला आहे. घाऊक किंमत निर्देशांक म्हणून मोजण्यात येणारा हा निर्देशांक त्या आधीच्या आठवड्यात ७.५८ टक्के होता, तर जुलै २०१० च्या तिसया आठवड्यात तो १८.५६ टक्क्यांवर होता. सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, १६ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात गतवर्षीच्या तुलनेत डाळी ८ टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत. मात्र, इतर...
  July 29, 04:20 AM
 • चेन्नई- गरिबांना सवलतीच्या दरात खाद्यान्ने पुरवण्यासाठीचे प्रस्तावित राष्टीय अन्न सुरक्षा विधेयक या वर्षीच्या डिसेंबरमध्ये संसदेसमोर मांडले जाण्याची शक्यता असल्याची माहिती ग्राहक व्यवहार व खाद्य राज्यमंत्री के. व्ही. थॉमस यांनी दिली. यासंदर्भातील अधिकार प्राप्त मंत्री गटाने विधेयकाच्या मसुद्याला मंजुरी दिली असून ते सध्या विधी मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. विधी मंत्रालयाची मंजुरी मिळताच ते कॅबिनेटसमोर जाईल. आम्ही मुख्यमंत्र्यांसोबतही चर्चा करणार आहोत. कारण अंमलबजावणी...
  July 29, 04:00 AM
 • भारतीय वंशाचे स्टील उद्योजक लक्ष्मी एन मित्तल यांना मोठा धक्का बसला आहे. जून २०११ मध्ये संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत त्यांची कंपनी आर्सेलर मित्तलच्या नफ्यात १० टक्के घट झाली आहे. आता त्यांच्या कंपनीचा व्यवसाय १, ५३५ अरब डॉलरपर्यंत आला आहे.गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचा नफा १, ७०६ अरब डॉलर इतका होता. या कालावधी दरम्यान कंपनीतून २५, १२६ अरब डॉलरची विक्री झाली आहे. या आकड्यांविषयी बोलताना कंपनीचे प्रमुख लक्ष्मी एन मित्तल यांनी पुढील तिमाहीत कंपनी चांगली कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली आहे.
  July 28, 02:53 PM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात