जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Industries

Industries News

 • मुंबई- बॅँक ऑफ बडोदा चालू आर्थिक वर्षामध्ये (एप्रिल ते मार्च) 4 हजार नोकर्या देणार असल्याचे बॅँकेच्या मुख्य अर्थतज्ज्ञ रुपा नित्सुरे रेगे यांनी सांगितले.या नवीन कर्मचारी भरतीमध्ये 1200 प्रोबेशनरी अधिकारी आणि 200 विशेष अधिकारी, 2000 लिपिक यांचा समावेश असेल आणि उर्वरित कर्मचार्यांची कॅम्पस मुलाखतीच्या माध्यमातून निवड होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर बॅँकेला आता ऑस्ट्रेलिया, कतार, संयुक्त अरब अमिरात, शांघाय येथे नवीन शाखा सुरू करण्याची, शारजाह येथे दोन व्यवसाय सेवा विभाग सुरू...
  July 28, 03:48 AM
 • नवी दिल्ली- सध्या सरकारपुढे वाढती महागाई हाच कळीचा मुद्दा आहे. सरकार तसेच भारतीय रिझर्व्ह बँक महागाई नियंत्रणासाठी प्रयत्न करीत असले, तरी या वर्षाच्या अखेरीस महागाई 6 ते 7 टक्क्यांपेक्षा कमी असणार नाही, असे स्पष्ट मत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केले. रिझर्व्ह बँकेने केलेल्या व्याजदर वाढीच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले की, आपला लढा महागाईशी आहे. रेपो तसेच रिव्हर्स रेपो दरातील वाढ हे त्याचेच निदर्शक आहे, परंतु महागाई 6 ते 7 टक्क्यांपेक्षा खाली येणार नाही,...
  July 28, 03:40 AM
 • मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण आढाव्यात व्याज दरवाढ केली असून, यामुळे गृह, वाहन व वैयक्तिक स्वरूपाची कर्जे महागण्याची शक्यता आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी मध्यवर्ती बँकेने केलेली मागील तीन महिन्यांतील ही तिसरी, तर 17 महिन्यांतील 11 वी दरवाढ आहे. यंदाच्या वर्षाच्या तिसर्‍या तिमाही पतधोरण आढाव्याच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत वर्षाखेरीस चलनवाढीचा अंदाज 6 वरून 7 टक्क्यांपर्यंत वाढविला आहे. चालू आर्थिक वर्षात विकासदर 8 टक्के राहण्याचा अंदाज मात्र कायम आहे.महत्त्वाच्या धोरणांचे...
  July 27, 06:55 AM
 • नवी दिल्ली- आमच्यावरील आक्षेपांबाबत स्पष्टीकरण देण्यास कॅगने आम्हाला फारच कमी वेळ दिला हे रिलायन्सचे उत्तर खोडून काढत, आम्ही त्यांना पुरेसा अवधी दिल्याचे कॅगने मंगळवारी स्पष्ट केले. कॅगच्या अहवालावर स्पष्टीकरणास आम्ही रिलायन्सला योग्य अवधी दिला. आता अहवाल लवकरच पूर्ण होईल, असे स्पष्ट मत भारताचे मुख्य लेखा परीक्षक व नियंत्रक विनोद राय यांनी व्यक्त केले. एका कार्यक्रमानिमित्त ते येथे आले असता पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे स्पष्टीकरण दिले. तेल...
  July 27, 03:25 AM
 • ब्लॅकबेरी स्मार्टफोन बनवणारी कंपनी रिसर्च इन मोशन (रिम) च्या एका निर्णयामुळे कंपनीचे कर्मचारी पुरते हैराण झाले आहेत. कंपनीने यावर्षी ११ टक्के म्हणजे २००० कर्मचा-यांना कामावरून कमी केले आहे. हे सर्व कर्मचारी रिमच्या वाटर्लु येथील मुख्य कार्यालयात काम करत होते.खर्चात कपात करण्यासाठी रिमने आपल्या कर्मचा-यांना कमी केल्याचे बोलले जाते. कंपनीच्या या निर्णयामुळे जागतिक स्तरावर आतापर्यंत १७ हजार कर्मचा-यांना कामावरून काढण्यात आले आहे.मागील काही महिन्यांपासून कंपनीचे शेअर कमालीचे गडगडले...
  July 26, 03:12 PM
 • मुंबई- सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने यंदाच्या वर्षात एकूण 950 कर्मचार्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्यामध्ये 450 कर्मचारी, तर 500 अधिकार्यांचा समावेश असेल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. एस. भट्टाचार्य यांनी दिली.नवीन कर्मचारी भरतीबरोबरच बँकेने महत्त्वाकांक्षी शाखा विस्तार कार्यक्रम हाती घेतला असून त्याअंतर्गत नाशिक आणि औरंगाबादसह पाच ठिकाणी नवीन शाखा सुरू करण्यात येणार आहेत. अन्य ठिकाणांमध्ये कोल्हापूर आणि सातारा या शहरांचा समावेश आहे. या...
  July 26, 04:48 AM
 • नवी दिल्ली- साखरेच्या जागतिक बाजारात वाढलेल्या किमती व देशातील मागणीपेक्षा जास्त झालेले उत्पादन या पार्श्वभूमीवर सरकारने आणखी 5 लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी द्यावी, अशी मागणी सहकारी साखर कारखान्याच्या राष्ट्रीय महासंघाने (एनएफसीएसएफ) सरकारकडे केली आहे.सरकारने आतापर्यंत 2.1 दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यापैकी 2 दशलक्ष टन साखरेची निर्यात खुल्या परवान्याअंतर्गत करण्यात आली आहे. 2010-11 या गळीत हंगामात साखरेचे उत्पादन अधिक झाल्याने साखर निर्यातीला परवानगी...
  July 26, 04:46 AM
 • एअरटेल कंपनीने कॉल दरामध्ये वाढ केल्यानंतर आता मोबाईल सेवा पुरविणा-या छोटया कंपन्यादेखील आपल्या कॉल दरामध्ये वाढ करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जेव्हा जेव्हा मोठया कंपन्या आपल्या कॉल दरात वाढ करतात तेव्हा छोटया कंपन्यांना त्यांच्या कॉल दरात वाढ करणे सोपे जाते, असे मोबाईल क्षेत्रातील एका माहितगाराने सांगितले.गेल्याच आठवडयात एअरटेलने आपल्या कॉल्सच्या दरात २० ते २५ टक्के वाढ केली होती. दिल्ली, आंध्र प्रदेश, केरळ, राजस्थान, मध्य प्रदेश आणि गुजरात सर्कलमध्ये त्यांना कॉल दरात वाढ...
  July 25, 05:27 PM
 • कोणत्याही राष्ट्राच्या विकासामध्ये ऊर्जाक्षेत्र अतिशय महत्त्वाची भूमिका बजावते. विकासातील या क्षेत्राचे योगदान विश्वासार्ह विद्युतपुरवठा उपलब्ध करून देण्याचे असते, ज्यामुळे राष्ट्राचा आर्थिक विकास साधला जाऊ शकतो. ऊर्जानिर्मिती वाढीतील विलंबाने अर्थचक्रावर परिणाम होतो. विजेचा भारतातील दरडोई वापर 734 किलोव्ॉट इतका आहे. जो जागतिक सरासरीपेक्षा 30 टक्क्यांनी कमी आहे. राष्ट्रीय वीज धोरणात सन 2012 पर्यंत घरोघर वीज हे महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवले.या धोरणामध्ये सन 2012पर्यंत विजेचा...
  July 25, 02:46 AM
 • मुंबई. साखर उत्पादक बलरामपूर चीनी मिल्सने ३० जून २०११ रोजी संपलेल्या तिमाहीत १९.८६ कोटी रुपयांचा तोटा झाल्याची माहिती दिली आहे. वर्षभरापूर्वी कंपनीला ११.१३ कोटी रुपयांचा नफा झाला होता. पुनरीक्षण काळात कंपनीची विक्री मागील ५३८.८२ कोटींच्या तुलनेत ५६३.३७ कोटींवर गेली. कोलकात्यात मुख्यालय असलेल्या या कंपनीचे कारखाने उत्तर प्रदेशात असून तिची गाळप क्षमता ७६,५०० टन दैनिक आहे.
  July 24, 05:16 AM
 • नवी दिल्ली. शुक्रवारी आलेल्या घसरणीनंतर शनिवारी सोने व चांदीच्या भावांत मोठी तेजी आली. खरेदीदारांनी केलेल्या चांगल्या खरेदीमुळे या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ दिसून आली. सोन्याच्या भावात २६० रुपयांनी वाढ होऊन प्रति दहा ग्रॅमचा भाव २३,४२० रुपये झाला. चांदीच्या १६०० रुपयांची वाढ होऊन भाव ५९,००० रुपये प्रतिकिलो झाला.
  July 24, 05:15 AM
 • मुंबई. देशातील तसेच आंतरराष्ट्रीय बाजारातील जोरदार मागणीमुळे ३० जून रोजी संपलेल्या पहिल्या तिमाहीत गोदरेज कंझ्युमर प्रॉडक्टस् (जीसीपीएल) कंपनीच्या निव्वळ नफ्यात ९४ टक्के वाढ होऊन तो २३९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या एकूण विक्रीतही या तिमाहीत ४० टक्के वाढ होऊन ती ९९८ कोटी रुपये झाली. कंपनीने सर्वच उत्पादनाच्या विशेषत: घरगुती कीटकनाशकांच्या बाबतीत अत्यंत चांगली कामगिरी केल्याने हे चांगले आकडे पाहायला मिळाल्याचे जीसीपीएलचे...
  July 24, 05:13 AM
 • हैदराबाद. सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ हैदराबादचा निव्वळ नफा वाढून २८४ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत झालेल्या नफ्याच्या तुलनेत ३० जून रोजी संपलेल्या तिमाहीतील नफ्यात ४१.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेच्या ठेवींतही वाढ झाली असून, त्या ९२.६१६ कोटी रुपये झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ठेवींच्या प्रमाणात १६.३० टक्के वाढ झाल्याचे बँकेने म्हटले आहे.
  July 24, 05:11 AM
 • मुंबई. आफ्रिकेतील वाढती बाजारपेठ काबीज करण्यासाठी टाटा मोटर्सने आपल्या व्यावसायिक वाहनांच्या जुळणीसाठी दक्षिण आफ्रिकेत नवीन प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पात ७२ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली असून वर्षाला ३ हजार ६५० वाहनांचे उत्पादन करण्याची क्षमता आहे. उत्तर प्रिटोरियामधील रॉसलीन येथे ३४ हजार ५०० चौरस मीटर क्षेत्रफळावर उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाचे उद्घाटन दक्षिण आफ्रिकेचे व्यापार आणि उद्योगमंत्री डॉ. रॉब डेव्हिस यांच्या हस्ते झाले. टाटा...
  July 24, 04:55 AM
 • मुंबई - आयपीओसंदर्भातील अंतिम नियम सध्या जारी झाले नसले व बहुतांश विमा कंपन्या बाजारात प्रवेश करण्यास सध्या इच्छुक नसल्या तरी विमा कंपन्यांनी सार्वजनिक बाजारात उतरणे अनिवार्य करण्यासंदर्भात विचार सुरू आहे, अशी माहिती विमा नियामक इर्डाने दिली आहे. इन्शुरन्स कायदा विमा कंपन्यांना बाजारात उतरण्यास बाध्य करीत नाही; पण नियामक मात्र बाध्य करू शकतो, अशी माहिती इर्डाचे जे. हरी नारायण यांनी इथे झालेल्या औद्योगिक परिषदेदरम्यान दिली.विमा उद्योगाची भांडवलासाठी इतर क्षेत्रांशी स्पर्धा...
  July 23, 02:20 AM
 • नवी दिल्ली - दूरसंचार विभागाचे निर्णय घेणा-या दूरसंचार आयोगाने पुढील तीन वर्षांत सर्व खेड्यांना ब्रॉडबँड जोडण्या देण्यासाठी २० हजार कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाला वैश्विक सेवा उत्तरदायित्वाद्वारे (यूएसओ) निधीपुरवठा केला जाईल. आम्ही लवकरच हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर ठेवणार आहोत, अशी माहिती केंद्रीय दूरसंचारमंत्री कपिल सिब्बल यांनी दिली. नॅशनल ऑप्टिकल फायबर नेटवर्क नावाच्या या योजनेचे उद्दिष्ट सध्याचे ऑप्टिकल फायबर नेटवर्क यूएसओचा निधी वापरून जिल्हा मुख्यालय...
  July 23, 02:11 AM
 • नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठय़ा कंपन्यांपैकी एक असलेल्या भारत एअरटेलने राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, केरळ आणि मध्य प्रदेशमधील एअरटेल नेटवर्कमध्ये कॉल्स आणि एसएमएससाठी फ्रीडम आणि अँडव्हान्टेज पॅकचे प्रीपेड दर 20 टक्क्यांनी वाढवले आहेत. प्रतिमिनिट बिलिंगवरील अँडव्हान्टेज पॅकच्या ग्राहकाला आता लोकल व एसटीडी कॉल्ससाठी 50 पैशांऐवजी 60 पैसे तर लँडलाइन कॉलसाठी 90 पैसे द्यावे लागतील. स्थानिकसाठी एक रुपया तर राष्ट्रीय एसएमएससाठी 1 रुपये 50 पैसे आकारण्यात येतील. सध्याचे व्हाऊचर संपल्यानंतर हे...
  July 22, 06:47 PM
 • नवी दिल्ली. ब्रिटनची बीपी ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधील २३ तेल व वायुपट्टे ७.२ अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करून रिलायन्समध्ये ३० टक्के वाटा मिळवणार आहे. या व्यवहाराला गुरुवारी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी मिळणे अपेक्षित होते. या सौद्यावर लवकर निर्णय घेण्याचा आग्रह तेल मंत्रालयाकडून होत असला तरी आर्थिक प्रकरणावरील कॅबिनेट समितीने बैठकीत हे प्रकरण विचारार्थ घेतलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
  July 22, 01:19 AM
 • नवी दिल्ली. स्टेट बँक ऑफ इंडिया कमर्शियल अँड इंडस्ट्रियल बँक (एसबीआयसीआय) व एसबीआयच्या विलीनीकरणास गुरुवारी सरकारने मंजुरी दिली. दोन शाखांसह एसबीआयसीआय ही एसबीआयच्या मालकीची उपकंपनी असून ती खासगी क्षेत्रात वित्तसेवा पुरवठा करीत होती. काही कालावधीपासून या बँकेच्या कामगिरीत अनियमितपणा आला होता. बँक स्थापन झाल्यापासून बँकेने ग्राहकांना कोणताही लाभांश दिलेला नाही. एकूण विश्लेषणात दिसून आले की, बँकेच्या सध्याच्या रूपातून कंपनीला विशिष्ट क्षेत्रातील कसलाही फायदा नाही, अशी...
  July 22, 01:12 AM
 • मुंबई. आयटी, बीपीओ आणि सल्ला सेवा पुरवण्यात आघाडीवर असलेल्या हेक्झावेअर टेक्नॉलॉजीज लिमिटेडला तिच्या एका विद्यमान ग्राहकाकडून पुढील पाच वर्षांसाठी ११७ दशलक्ष डॉलर्सचे कंत्राट मिळाले असल्याचे कंपनीच्या अमेरिकेतील कामकाजाचे अध्यक्ष राजीव पंत यांनी सांगितले. या करारामुळे कंपनीच्या व्यवसायामध्ये आणखी ७७ दशलक्ष डॉलरची भर पडू शकेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या तीन महिन्यांतील कंपनीचा हा तिसरा सर्वांत मोठा व्यवहार आहे. अमेरिकेतील मल्टिनॅशनल कॉर्पोेशन या...
  July 22, 01:10 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात