जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Industries

Industries News

 • नवी दिल्ली. कडधान्यांच्या किमतीतील घसरणीमुळे ९ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात अन्नधान्य महागाई निर्देशांक ७.५८ टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे. गेल्या तीन आठवड्यांतील हा नीचांक आहे. घाऊक किंमत निर्देशांक म्हणून मोजण्यात येणारा हा निर्देशांक त्या आधीच्या आठवड्यात ८.३१ टक्के होता, तर जुलै २०१० च्या दुस-या आठवड्यात तो १९.५२ टक्क्यांवर होता. सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, ९ जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात, गतवर्षीच्या तुलनेत डाळी ७.६७ टक्क्यांनी स्वस्त झाल्या आहेत. मात्र,...
  July 22, 12:56 AM
 • नवी दिल्ली. ट्रान्स्फॉर्मर निर्मिती करणा-या पीएमई पॉवर सोल्यूशन कंपनीने प्राथमिक समभाग प्रस्तावासाठी (आयपीओ) गुरुवारी सेबीकडे कागदपत्रे सादर केली. आयपीओच्या माध्यमातून ३०० कोटी रुपये जमा करण्याची कंपनीची योजना आहे. कंपनी या निधीचा वापर विस्तार योजनांसाठी तसेच कर्ज फेडण्यासाठी करणार आहे. आयपीओच्या माध्यमातून १० रुपये दर्शनी मूल्याचे १.१४ कोटी समभाग विक्रीची कंपनीची योजना आहे.
  July 22, 12:46 AM
 • मुंबई. खासगी क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कोटक महिंद्र बँकेच्या करोत्तर नफ्यामध्ये २७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीमध्ये हा नफा अगोदरच्या ३२८ कोटी रुपयांवरून ४१६ कोटी रुपयांवर गेला आहे. संकलित उचल या कालावधीत ३६ टक्क्यांनी वाढून ती ३० जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत ३२९८७ कोटी रुपयांवरून ४४६९९ कोटी रुपयांवर गेली आहे. पहिल्या तिमाहीतील नफा वगळता भांडवल पूर्ततेचे प्रमाण १८.४ टक्के नोंद झाले आहे. व्यवस्थापनाखालील मालमत्ता ३० जूनअखेर ५१७...
  July 22, 12:44 AM
 • नवी दिल्ली. मोटारसायकल बनविणारी जगातील सर्वात मोठ्या हिरो होंडा कंपनीने बाजाराच्या अपेक्षांपेक्षा अधिक नफा मिळवला. गुरुवारी जाहीर झालेल्या तिमाही आर्थिक निकालानंतर कंपनीच्या समभागांतही तेजी आली. या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात १४ टक्के वाढ झाली आणि तो वाढून ५५८ कोटी रुपयांवर पोहोचला. आर्थिक निकालानुसार या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत ३१ टक्के वाढ होऊन ती ५६३८ कोटी रुपये झाली.
  July 22, 12:43 AM
 • मुंबई. वेदांत समूहातील कंपनी हिंदुस्थान झिंकच्या निव्वळ नफ्यात या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत ६७.७९ टक्के वाढ होऊन तो १४९४.९१ कोटी रुपये झाला आहे. कंपनीच्या एकूण विक्रीतही या तिमाहीत ४४.६२ टक्के वाढ होऊन ती २८२१.३५ कोटी रुपये झाली. मुंबई शेअर बाजारात कंपनीच्या समभागात गुरुवारी ०.६९ टक्के वाढ दिसून आली व तो १३८.२० रुपयांवर बंद झाला.
  July 22, 12:42 AM
 • नवी दिल्ली. सध्याच्या हीरक महोत्सवी वर्षात ईएसआयसीने सहा पदव्युत्तर वैद्यकीय विज्ञान, संशोधन संस्था व एका दंत महाविद्यालयाची सुरुवात केली आहे, असे केंद्रीय श्रम आणि रोजगारमंत्री मल्लिकार्जुन खारगे यांनी सांगितले. कर्मचारी राज्य विमा महामंडळाने नुकतेच विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे एकदिवसीय ईएसआयसी ऑफिसर्स कॉनक्लेव्हचे आयोजन केले होते. या संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खारगे यांनी हीरकमहोत्सवी वर्षात लक्ष्य गाठल्याबद्दल ईएसआयसी...
  July 21, 01:27 AM
 • नवी दिल्ली. भारतातील सर्वात मोठी ऊर्जानिर्मिती कंपनी एनटीपीसीने आंतरराष्ट्रीय बाजारात ५० कोटी डॉलर्सचा बाँड इश्यू यशस्वीपणे जारी केला आहे. कंपनीकडून स्थापीत १ अब्ज डॉलर्सच्या मध्यमकालिक नोट कार्यक्रमाअंतर्गत नोट जारी केल्या. कंपनीचा मध्यमकालिक नोट प्रोग्राम अद्ययावत केल्यानंतर कंपनीने मे व जूनमध्ये रोड शो आयोजित केले होते. कंपनीचे वित्त संचालक ए. के. सिंघल यांनी सांगितले की, बाजारात अनिश्चितता असताना गुंतवणूकदारांचा हा प्रचंड प्रतिसाद अत्यंत...
  July 21, 01:24 AM
 • नवी दिल्ली. भारत हेवी इलेक्ट्रिकल्सने (भेल) झारखंडमध्ये ५२५ मेगावॅट रेटिंगच्या भारताचा पहिला थर्मल संच कार्यान्वित करून देदीप्यमान यश मिळवले आहे. हा संच मायथॉन राईट बँक थर्मल पॉवर प्रोजेक्टमध्ये सुरू करण्यात आला आहे. हा संच कार्यान्वित करून भारतीय परिस्थितीत अनुकूल अत्याधुनिक उपकरणे पुरवठा करणा-या थर्मल पॉवर प्रोजेक्ट्सच्या संपादनात भेलने नेतृत्वाची गुणवत्ता कायम राखली आहे. भेलने टाटा पॉवर व दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन (डीव्हीसी) चा संयुक्त उपक्रम मायथॉन...
  July 21, 01:22 AM
 • नवी दिल्ली. ओएनजीसीचे सीएमडी ए. के. हजारिका यांनी नवी दिल्ली येथे कंपनीच्या आरोग्य, सुरक्षा व पर्यावरणाची पडताळणी केली. कॉर्पोरेट आरोग्य, सुरक्षा व पर्यावरण (एचएसई) यासंदर्भात विविध केंद्रांकडून चालू असलेल्या पुढाकाराबद्दल माहिती देण्यात आली. ओएनजीसीद्वारा एचएसईला प्राधान्य दिले जाते. सुरक्षा हा सर्वांसाठीच चिंतेचा विषय आहे संस्थेचे मत आहे. एचएसईच्या यंत्रणेची संस्थेच्या सर्व वरिष्ठ अधिका-यांकडून समीक्षा केली जाते. सीएमडी हजारिका यांनी सांगितले की,...
  July 21, 01:21 AM
 • नवी दिल्ली. क्षमता विस्तार योजनेंतर्गत देशातील सर्वात मोठी पॉवर युटिलिटी कंपनी एनटीपीसी लि. ने भारतीय स्टेट बँकेसोबत १०००० कोटी रुपयांच्या करासंबंधी सहमतीवर स्वाक्षरी केली. या कर्जाचा उपयोग चालू व नवीन योजनांतील भांडवली खर्चाला वित्तसाह्य देण्यासाठी केला जाईल. या कर सहमतीवर एनटीपीसीचे सीएमडी अरुप रॉयचौधरी आणि एसबीआयचे अध्यक्ष प्रतीप चौधरी यांच्या उपस्थितीत स्वाक्ष-या करण्यात आल्या. या प्रसंगी एनटीपीसीचे संचालक (वित्तपुरवठा) ए. के. सिंहल आणि एसबीआयचे...
  July 21, 01:19 AM
 • नवी दिल्ली. सातत्याने वाढणारी महागाई व आगामी काळात रिझर्व्ह बँकेकडून होणारी व्याज दरवाढ यामुळे लघु व मध्यम उद्योजकांचा आत्मविश्वास डळमळीत झाला असल्याचे मत सीआयआय या संघटनेने व्यक्त केले आहे. एप्रिल-जून या काळात लघु व मध्यम (एसएमई) उद्योगाच्या विश्वास निर्देशांकात (बिझनेस कॉन्फिडन्स इंडेक्स) गतवर्षीच्या तुलनेत ४.९ टक्क्यांनी घट होऊन तो ५७.२ वर आल्याचे सीआयआयने म्हटले आहे. महागाई तसेच वाढते व्याजदर यामुळे एसएमईसमोर मोठे आव्हान उभे असून, या क्षेत्राच्या विस्तार योजनांना खीळ...
  July 21, 01:01 AM
 • नवी दिल्ली. औद्योगिक उत्पादनदरात फेरफार होण्याच्या शक्यतेमुळे सरकारने सन २०११-१२ चा विकासदर अंदाज ९ टक्क्यांवरून ८.६ टक्क्यांपर्यंत कमी केला आहे. २०१०-११ मधील ८.५ टक्क्यांच्या तुलनेत यावर्षी विकासदर किंचित वाढून ८.६ टक्क्यांपर्यंत जाईल, असे अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. वास्तविक विकासदर वृद्धीचे वार्षिक संकेत गेल्या वर्षात सकारात्मक राहिले असले तरी मागील दोन तिमाहीत ते मंदावणार असे संकेत मिळत आहेत.
  July 21, 12:51 AM
 • कोची- केरळच्या उच्च न्यायालयाने बुधवारी आदेश दिले की, गेल्या वर्षी मंगलौर विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या १५८ प्रवाशांच्या नातेवाईकांना एका महिन्याच्या आत प्रत्येकी ७५ लाख रुपये द्यावेत.न्यायमूर्ति पी. आर. रामचंद्रन मेनन यांनी मोहम्मद रफी यांच्या नातेवाईकांनी दाखल केलेल्या याचिकेवर हा निर्णय दिला. रफी यांचा मृत्यू गेल्या वर्षी १८ मे रोजी झालेल्या विमान अपघातात मृत्यू झाला होता. न्यायालयाने एयर इंडियाला सर्व रक्कम एका महिन्याच्या आत देण्याचेही आदेश दिला आहे. दुबईवरुन आलेल्या...
  July 20, 08:47 PM
 • औरंगाबाद: दर्जेदार बांधकाम वाजवी दरात देण्याची सचोटी, रो-हाऊससाठी सर्वप्रथम सेन्सर आधारित सुरक्षा व्यवस्थेचा वापर, मोशन सेन्सर, टीव्ही, एसी इन्व्हर्टर, सोलर हिटर यांसारख्या सुविधा यामुळे औरंगाबादेत आर. के. कॉन्स्ट्रोची गृहनिर्मिती मापदंड मानली जाते, असे मत आर. के. कॉन्स्ट्रोचे समीर मेहता यांनी व्यक्त केले. जनसामान्यांत आरकेसी या नावाने प्रसिद्ध असणा-या आर. के. कॉन्स्ट्रोच्या आजवरच्या प्रगतीबाबत तसेच आगामी प्रकल्पांबाबत माहिती देताना मेहता यांनी सांगितले की, ९० च्या दशकातील छोट्या...
  July 20, 04:03 AM
 • नवी दिल्ली: सरकारने मंगळवारी ३,८४४.७ कोटींच्या थेट विदेशी गुंतवणुकीच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्याची घोषणा केली असून या गुंतवणुकीत मल्टिपल प्रायव्हेट इक्विटी फंड व कॉक्स अॅण्ड किंग्ज या जागतिक पर्यटन कंपन्यांचा समावेश आहे. मल्टिपल प्रायव्हेट इक्विटी फंडच्या मुंबईतील योजना-१ मधून १००० कोटींच्या विदेशी गुंतवणुकीस सरकारने मंजुरी मिळाल्याने ही गुंतवणूक आजवरची सर्वांत मोठी गुंतवणूक ठरली आहे. या कंपनीला आता भारतीय कंपन्यांच्या सेक्युरिटीमध्ये गुंतवणूक करून मिळालेले उत्पन्न वितरित...
  July 20, 04:00 AM
 • नवी दिल्ली: नवीन जिंदाल यांच्या जिंदाल पॉवर लिमिटेडचा प्रारंभिक समभाग विक्री प्रस्ताव (आयपीओ) येत्या आऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात बाजारात येण्याची शक्यता खात्रीलायक सूत्रांनी वर्तवली आहे. या आयपीओच्या माध्यमातून ७००० कोटी रुपये उभे करण्याची कंपनीची योजना आहे. जिंदाल पॉवर यासंदर्भातील डीआरएचपी (ड्राफ्ट रेड हिअरिंग प्रोस्पेक्टस) लवकरच भरणार असून, आयपीओ आॅक्टोबरपर्यंत बाजारात येईल, असेही या सूत्रांनी स्पष्ट केले. हा आयपीओ मार्च-२०११ पर्यंत बाजारात येणार होता, परंतु बाजारातील...
  July 20, 03:57 AM
 • नवी दिल्ली: माहिती तंत्रज्ञान आणि आरोग्यनिगा क्षेत्रांत हुशार कर्मचा-यांची पळवापळवी सुरू असल्याने महत्त्वाचे मनुष्यबळ टिकवून ठेवणे मोठे आव्हान बनले आहे, असे एका सर्वेक्षणात दिसून आले. माय हायरिंग क्लब संकेतस्थळाच्या अभ्यासानुसार आयटी आणि आयटीईएस क्षेत्रांत चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सर्वात जास्त २३ टक्के कर्मचा-यांची तूट निर्माण झाली आहे. याउलट बँकिंग व वित्तीय सेवा क्षेत्रात १८ टक्के, तर आरोग्यनिगा क्षेत्रात १२ टक्के, एमएमसीजीत ११ टक्के व वाहन निर्मिती क्षेत्रात ११ टक्के...
  July 20, 03:49 AM
 • सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपन्यांपैकी एक असलेल्या स्टील अॅथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) या कंपनीमध्ये ९९.१२ टक्के शेअर असलेली महाराष्ट्र इलेक्ट्रोस्मेल्ट (एमईएल) ही कंपनी पूर्णपणे विलीन झाली आहे.एमईएल या कंपनीच्या लिलावाची प्रक्रिया २००६ मध्ये सुरु करण्यात आली होती. आता १४ जुनला सरकारने दिलेल्या आदेशानंतर या दोन्ही कंपन्यांमध्ये विलीनीकरण करण्यात आले. महाराष्ट्रात चंद्रपूर जिल्ह्यात असलेल्या एमईएल या कंपनीत स्टील आणि लोखंड बनविण्यात येते. सेलसाठी ही कंपनी खूप उपयुक्त आहे. सेल आणि...
  July 19, 05:38 PM
 • नवी दिल्ली. नागरी उड्डाण महासंचालकांनी हव्या त्या आसनासाठी एअरलाइन्सकडून आकारला जाणारा अतिरिक्त अधिभार रद्द करण्याचा आदेश दिल्याने हव्या त्या आसनासाठी अग्रिम नोंदणी करणा-या ग्राहकांना कमी पैसे मोजावे लागणार आहेत. पाय ठेवण्यासाठी जास्त जागा मिळत असल्याने पुढील व इमर्जन्सी रोमधील आसनांना जास्त पसंती मिळते. एअरलाइन्स या आसनांसाठी ४० रुपयांपासून ४०० रुपयांपर्यंत अतिरिक्त तिकीट आकारतात. हव्या त्या आसनासाठी अग्रिम नोंदणी केल्यास अतिरिक्त तिकीट आकारू नये, असे...
  July 19, 01:36 AM
 • नवी दिल्ली. पार्श्वनाथ सेझ लिमिटेडसह अनेक रिअल्टी कंपन्यांनी करासंदर्भात सतत अनिश्चितता राहत असल्याने महाराष्ट्रासह पाच राज्यांत केंद्राने मंजूर केलेले विशेष आर्थिक प्रकल्प (सेझ) रद्द करण्याची विनंती केली आहे. पार्श्वनाथचा पुण्यातील ऑटो कंपोनंट प्रकल्प यात समाविष्ट असून नवी मुंबईतील रहेजा सेझ, जीपी रिअॅल्टर्ससह ४५ सेझ विकासकांनी प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी आणखी वेळ देण्याची मागणी केली आहे. पार्श्वनाथ समूहाच्या पार्श्वनाथ सेझ लि., ने महाराष्ट्र, उत्तर प्रदेश,...
  July 19, 01:27 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात