जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Industries

Industries News

 • नवी दिल्ली. मंत्रिगटाने एअर इंडियाला १२०० कोटींची इक्विटी आणि व्हीव्हीआयपी व बचाव उड्डाणांसाठी ५३२ कोटी देण्यास मंजुरी दिल्याने सध्या तंगीतून जात असलेल्या एअर इंडियाला मोठा दिलासा मिळाला आहे. एअर इंडियाला ६७०० कोटींची कमतरता असून अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिगटाने भविष्यातील मुद्द्यांवर चर्चा केली.
  July 19, 01:17 AM
 • नवी दिल्ली. जगभरात मंदी पुन्हा डोके वर काढत असून, त्यामुळे इंग्लंडमध्ये लाखो नोक-यांवर गंडांतर येऊ शकते, असे मत इंग्लंडचे उपपंतप्रधान निक क्लेग यांनी व्यक्त केल्याने इंग्लंडमध्ये खळबळ उडाली आहे. इंग्लंडची अर्थव्यवस्था सध्या अत्यंत कठीण परिस्थितीतून जात असल्याचे वृत्त याआधीच जगजाहीर झाले होते. इंग्लंडच नव्हे, तर तमाम युरोपातील देश वित्तीय संकटामुळे त्रस्त आहेत.
  July 19, 01:14 AM
 • अहमदाबाद. सॉफ्टवेअर निर्यातीत देशातील दुस-या क्रमांकाची कंपनी इन्फोसिसचा गुजरातमध्ये आयटी केंद्र उघडण्याचा मानस व्यक्त केला आहे. इन्फोसिसचे चेअरमन एन. आर. नारायण मूर्ती यांनी सांगितले की, आम्हाला अजून या केंद्रासाठी जमीन मिळायची आहे. याबाबतचा निर्णय गुजरात सरकारने घ्यायचा आहे. त्यानंतर आयटी केंद्र सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल.
  July 19, 01:12 AM
 • नवी दिल्ली. टाटा सन्स समूहातील ब्रिटिश कंपनी जग्वार लॅण्ड रोव्हर भारतातील जोडणी प्रकल्प वाढवण्यासह चीनमध्येही जोडणी प्रकल्प उभारण्याचा विचार करीत असल्याची माहिती टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांनी दिली. लॅण्ड रोव्हर फ्रीलॅण्डरचे भारतातील जोडणी कार्य सुरू झाले आहे. इतर उत्पादनांचीही जोडणी इथेच करण्यासंदर्भात विचार सुरू आहे, अशी माहिती त्यांनी टाटा मोटर्सच्या चालू वर्षाच्या वार्षिक अहवालात दिली आहे. टाटा मोटर्स आणि जेएलआर ब्रिटन व भारतात उत्पादन प्रकल्प स्थापन करण्यासाठी संयुक्त...
  July 19, 01:09 AM
 • उत्पन्न आधारित योजना-उत्पन्नावर आधारित योजनेमध्ये अंतिम परतफेडीची रक्कम पीक कापल्यानंतर निश्चित केली जाते. परताव्याची रक्कम निश्चित करताना स्वतंत्र शेतावर आधारित मोजमाप न करता संपूर्ण तालुका, पंचायत किंवा ब्लॉकच्या सरासरीचा आधार घेतला जातो.एनएआयएस (नॅशनल अँग्रिकल्चर इन्शुरन्स स्किम)-नॅशनल अँग्रिकल्चर इन्शुरन्स स्किम अर्थात राष्ट्रीय कृषी विमा योजनेला 1999 मध्ये सुरुवात झाली आणि आजपर्यंत ही सर्वात यशस्वी आणि मोठय़ा प्रमाणात विस्तारलेली योजना आहे. देशातील सर्व राज्य आणि...
  July 18, 10:53 AM
 • नवी दिल्ली- सार्वजनिक क्षेत्रातील दिग्गज कंपनी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) च्या प्रस्तावित फॉलोआॅन पब्लिक आॅफर (एफपीओ) संदर्भात सरकारने पावले उचलायला सुरुवात केली आहे. या एफपीओच्या व्यवस्थापनासाठी सरकारने १७ बँकांची छाननी केली आहे. या एफपीओद्वारे सरकार भेलमधील आपल्या ५ टक्के समभागांची पुनर्गुंतवणूक करणार आहे. सध्याच्या बाजारभावाप्रमाणे यातून सुमारे ४७०० कोटी रुपये जमा करण्याची योजना आहे. भेलच्या एफपीओसाठी सरकारने ज्या बँकांची छाननी केली आहे त्या बँका अशा : आयसीआयसीआय...
  July 17, 07:09 AM
 • बंगळूरू- सॉफ्टवेअर क्षेत्रातील आघाडीची कंपनी 'इन्फोसिस टेक्नॉलॉजी'ने आपले नवीन कार्यकारी मंडळ जाहीर केले आहे. 'इन्फोसिस'चे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक एस. गोपालकृष्णन यांनी कार्यकारी मंडळाची घोषणा केली. इन्फोसिसच्या भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने ही महत्त्वाची घोषणा असल्याचे ते म्हणाले. कंपनीची सर्व ध्येयधोरणे हे मंडळ ठरविते. असे आहे कार्यकारी मंडळाचे सदस्य एस. गोपालकृष्णन, एस. डी शिबुलाल (मुख्य कार्यकारी अधिकारी), श्रीनाथ बात्नी (संचालक व प्रमुख- डिलिव्हरी...
  July 16, 04:35 PM
 • नवी दिल्ली: भारतातील दारू सेवनाचे वाढणारे प्रमाण व तळीरामांची वाढती संख्या याचा परिणाम दारूच्या विक्रीवरही झाला आहे. भारतातील दोन ब्रॅण्डचा समावेश आता जगातील टॉप-१० ब्रॅण्डमध्ये झाला आहे. दारू विक्रीच्या बाबतीत नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार भारतातील बॅगपायपर व मॅक्डॉवल नंबर वन या दोन ब्रॅण्डनी टॉप टेनमध्ये मजल मारली आहे. बॅगपायपर पूर्वीपासूनच टॉप टेनमध्ये होता. मॅक्डॉवल नंबर वनचा मात्र नव्याने समावेश झाला आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही ब्रॅण्ड विजय मल्या यांच्या मालकीच्या...
  July 16, 03:27 AM
 • नवी दिल्ली : भारतातील मोठ्या पवन ऊर्जा कंपन्यांपैकी एक सुझलॉन एनर्जीला चेन्नईतील ओरिएण्ट ग्रीन पॉवर कंपनीने १०० मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांना टर्बाइन पुरवठ्यासाठी ६५० कोटी रुपयांची ऑर्डर दिल्याची माहिती सुझलॉनने दिली आहे. ६५० कोटी रुपये मूल्याच्या या ऑर्डरमध्ये ओरिएण्ट ग्रीन पॉवरला ४८ सुझलॉन विंड टर्बाईनचा पुरवठा करण्यात येणार आहे. कंपनीच्या गुजरातेतील पहिल्या प्रकल्पाची क्षमता ५०.४ मेगावॅट असून तो मे मध्ये सुरू होईल, तर ५०.४ मेगावॅट क्षमतेचा कर्नाटकातील प्रकल्प जून २०१२ मध्ये...
  July 16, 03:20 AM
 • हैदराबाद: एक लाखात नॅनो दिल्यानंतर टाटा ग्रुप पुढील वर्षाच्या अखेरीपर्यंत ग्रामीण भागासाठी ३२ हजार रुपयांत घरांची निर्मिती करणार आहे. देशभरात सध्या ३० ठिकाणी टाटा ग्रुपचे असे पथदर्शी प्रकल्प सुरू असून क्वायर बोर्ड, ज्यूट बोर्ड व राज्य शासनासोबत चर्चा सुरू असल्याची माहिती टाटा स्टीलचे जागतिक संशोधन प्रमुख सुमितेश दास यांनी दिली. ही घरे प्रीफॅब प्रकारातील असतील. त्यात कंपनी सुटे छत, दारे, खिडक्या पुरवणार आहे. जमिनीचा तुकडा असेल तर हे घर सात दिवसांच्या आत उभे करता येते. २० चौरस मीटरच्या...
  July 15, 09:29 PM
 • नवी दिल्ली- केजी-डी ६ बाबत कॅगला कोणताही चुकीचा खर्चफुगवटा किंवा कोणतीही फसवाफसवी आढळली नसून वायूपट्ट्याच्या खर्चात बेकायदेशीरपणे वाढ केल्याचे आरोप कॉर्पोरेट शत्रूंकडून पसरवण्यात आले आहेत, असे स्पष्टीकरण रिलायन्स इंडस्ट्रीजने केले आहे. तेल मंत्रालय व त्याचा तांत्रिक विभाग डीजीएचकडून मेहेरनजर झाल्याचा आरोप करणा-या लेखापरीक्षण अहवालाला उत्तर देताना रिलायन्स इंडस्ट्रीजने म्हटले आहे की, कॉर्पोरेट शत्रुत्वामुळे काही लोकांनी आरोप करण्याचा धडाका लावला. वायूपट्ट्याचे प्रारंभिक...
  July 15, 05:55 AM
 • मुंबई- पावसाळ्यामध्ये बांधकाम तसेच अन्य पायाभूत क्षेत्रांची कामे थंडावल्यामुळे सिमेंटची मागणी रोडावली आहे. बहुतांश सिमेंट कंपन्यांनी किमती कमी केल्या असून, पुढील दोन आठवड्यांत सिमेंटच्या किमती आणखी कमी होण्याची शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. एसीसी, अल्ट्राटेक आणि गुजरात अंबुजा या कंपन्यांच्या सिमेंट विक्रीमध्ये अगोदरच्या महिन्याच्या तुलनेत जून महिन्यामध्ये अनुक्रमे ४ टक्के, ०.६ टक्के आणि ३.६ टक्क्यांनी घसरण झाली असल्याचे दिसून आले आहे. साधारणपणे पावसाळ्यामध्ये म्हणजे जून...
  July 15, 05:50 AM
 • मदुराई - खाद्य क्षेत्रातील लघु आणि मध्यम उद्योगांच्या वाढीसाठी सरकारने विविध राज्यांत ३० फूड पार्क उभारण्याचे नियोजन केले असल्याची माहिती इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पॅकेजींगच्या वरिष्ठ अधिका-यांनी दिली.खाद्य प्रक्रिया मंत्रालयाकडून प्रस्तावित या फूड पार्क्समुळे अन्न प्रक्रियेत कार्यरत २०,००० लघु आणि मध्यम उद्योगांना मदत मिळेल अशी माहिती आयआयपीचे संचालक एन. सी. सहा यांनी दिली. येथे आयोजीत पॅकेजिंग व प्रक्रिया याविषयीच्या कार्यशाळेत ते बोलत होते. या फूड पार्कमुळे देशात सध्या अपु-या...
  July 14, 05:52 AM
 • नवी दिल्ली: देशातील सर्वात मोठे वायुक्षेत्र केजी-डी ६ बाबत कॅगने मांडलेल्या प्रत्येक निरीक्षणासंदर्भात रिलायन्स इंडस्ट्रीज व हायड्रोकार्बन महासंचालनालयाकडून उत्तर सादर करण्यात आले आहे. कॅगने बोलावलेल्या बैठकीत केर्न इंडिया आणि ब्रिटनच्या बीजी ग्रुपनेदेखील राजस्थान तेलपट्टे आणि पन्ना, मुक्ता व ताप्ती क्षेत्राबद्दल उत्तरे दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कॅगच्या अहवालात तेल मंत्रालय आणि डीजीएचने या तेलपट्ट्यातील भांडवली वाढीकडे कानाडोळा केल्याने सरकारचे मोठे नुकसान...
  July 13, 05:17 AM
 • नवी दिल्ली: उत्पादन व खाण क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे मे महिन्यातील औद्योगिक विकासाला खीळ बसली आहे. त्यामुळे औद्योगिक उत्पादनाच्या निर्देशांकात ५.६ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. गेल्या वर्षातील मे महिन्यात हा निर्देशांक ८.५ टक्के होता. विविध उद्योगांतून मिळणारे उत्पादन मोजण्यासाठी औद्योगिक उत्पादन निर्देशांक (आयआयपी) वापरला जातो. एप्रिलमध्ये हा दर ६.३ टक्के अपेक्षित असताना ५.७ टक्के होता. सरकारने जारी केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल-मे महिन्यातील सरासरी औद्योगिक उत्पादन...
  July 13, 05:05 AM
 • नवी दिल्ली - सध्या हलाखीच्या स्थितीत असलेल्या स्कूटर इंडिया या सार्वजनिक उद्योगातील 95 टक्के हिस्सा विकत घेण्याचा महिंद्रा अँण्ड महिंद्राचा तूर्त कसलाही विचार नसल्याचे महिंद्रा अँण्ड महिंद्राचे ऑटोमोटिव्ह आणि फार्म इक्विपमेंट विभागाचे अध्यक्ष पवन गोयंका यांनी पत्रकारांना सांगितले.याबाबत आम्ही आमच्या पद्धतीने विश्लेषण केले आहे. त्यानंतर स्कूटर इंडियाचा विचार सध्या आम्ही सोडून दिला आहे. मात्र, याचा अर्थ असा नव्हे की, भविष्यात आम्ही त्याबाबत विचारच करणार नाही, असेही गोयंका यांनी...
  July 12, 10:43 AM
 • वॉशिंग्टन-कर्जाच्या खाईत बुडालेल्या ग्रीसला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) व युरोपियन संघाच्या संयुक्त बेलआऊट पॅकेजअंतर्गत 4.6 अब्ज डॉलरचा नवा निधी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून देण्यात आला आहे. अथेन्सने काही प्रमाणात सुधारणा केली आहे, 2012 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत ग्रीस सकारात्मक आथक वाढ दाखवील, अशी अपेक्षा या वेळी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने व्यक्त केली आहे. युरोपियन संघ व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांच्याकडून देण्यात येणार्या 110 अब्जांच्या तीनवर्षीय संयुक्त बेलआऊट...
  July 10, 06:21 AM
 • नवी दिल्ली- भारतीय उद्योगातील ख्यातनाम व मार्गदर्शक व्यक्तिमत्त्वांपैकी एक, डाबर इंडियाचे मानद अध्यक्ष अशोक बर्मन यांचे लंडनमध्ये निधन झाले. ८२ वर्षीय अशोक बर्मन हे डाबर इंडियाचे अध्यक्ष आनंद बर्मन यांचे वडील होत. १९ जून १९३० रोजी कलकत्त्यात जन्म झालेल्या अशोक बर्मन यांनी कंपनीच्या विकासात सिंहाचा वाटा देऊन एफएमजीसी क्षेत्रात आज आघाडीवर असलेल्या कंपनीला नावारूपास आणले. भारतीय उद्योग क्षेत्रात ख्यातनाम असणारे फिलाटेक्स इंडियाच्या संचालकपदासह बर्मन गॅनन डंकले अॅण्ड कं., डाबर...
  July 10, 03:32 AM
 • नवी दिल्ली- गहू आणि बिगर बासमती तांदूळ निर्यातीच्या मुद्द्यावर मंत्र्यांच्या पॅनलची बैठक पुढील आठवड्यात होण्याची शक्यता असताना वाणिज्य आणि उद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी देशाकडे मुबलक धान्यसाठा असल्याचे म्हटले आहे. गहू व तांदळाचा गरजेपेक्षा दुप्पट व अडचणीच्या परिस्थितीसाठी राखून ठेवलेला मुबलक धान्यसाठा देशाकडे असल्याची माहिती त्यांनी दिली. यासंदर्भातील मंत्रिगटाला या वस्तूंच्या जागतिक आणि घरगुती किमतींसह सर्व बाबींचा विचार करावा लागेल. ११ जुलै रोजी यांसदर्भातील मंत्रिगटाची...
  July 10, 03:28 AM
 • नवी दिल्ली - भारतीय रुपयाचे अधिकृत चिन्ह तयार होऊन एक वर्ष उलटले; पण ते कोणत्याही चलनावर दिसत नव्हते. आता सरकारने या रुपयाच्या चिन्हासह नवी नाणी जारी केली असून त्यांचे रंगरूपही बदलण्यात आले आहे.केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी शुक्रवारी दिल्लीत 50 पैसे, 1, 2, 5 आणि 10 रुपयांची नवी नाणी जारी केली. ही नवी नाणी आकाराने किंचित कमी आणि वजनाला हलकी आहेत. नाण्यांची ही नवी मालिका कोणत्या मूल्याचे कोणते नाणे हे ओळखण्यासाठी अधिक सोयीस्कर असणार आहे. तसेच अंध व्यक्तींना ही नाणी अधिक लवकर ओळखू यावीत...
  July 9, 02:44 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात