Home >> Business >> Industries

Industries News

 • नवी दिल्ली- प्रमुख खरीप पिकांच्या हमी भावात केलेल्या वाढीमुळे महागाईवर काहीही परिणाम होणार नसल्याचे कृषी मूल्य आयोगाने स्पष्ट केले. गुरुवारी अर्थविषयक मंत्रिपरिषदेने खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीत (हमी भावात) १९ टक्क्यांनी वाढ केली होती. खाद्यान्न महागाई उच्च स्तरावर असली तरी शेतक-यांचे हित लक्षात घेता हमी भावातील वाढ आवश्यक असल्याचे मत कृषी मूल्य आयोगाचे चेअरमन अशोक गुलाटी यांनी व्यक्त केले. तेलबिया पिकांच्या हमी भावात यंदा जाणीवपूर्वक जास्त वाढ करण्यात आली आहे. देशाची...
  June 11, 04:20 AM
 • नवी दिल्ली- मुकेश अंबानींच्या अधिपत्याखालील रिलायन्स इंडस्ट्रीजला कर्ज पुरवताना एसबीआयने तीन वर्षांत सतत भारतीय रिझर्व्ह बँके (आरबीआय)च्या कर्जविषयक नियमांचे उल्लंघन केले आहे. सध्या २ जी घोटाळ्यात चौकशी सुरू असलेल्या विशिष्ट दूरसंचार कंपन्यांसह अडचणीत आलेल्या एअर इंडियालाही एसबीआयने खूप मोठा कर्जपुरवठा केलेला आहे. आता बँकेने रिलायन्सलाही आरबीआयने घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त कर्जपुरवठा केल्याचा खुलासा केला आहे. ३१ मार्च रोजी समाप्त आर्थिक वर्षात जास्तीचा कर्जपुरवठा...
  June 11, 04:09 AM
 • नवी दिल्ली- सरकारने आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात एकूण औद्योगिक उत्पादनात ६.३ टक्क्यांची वाढ झाली; पण मागील आकडेवारीच्या तुलनेत उत्पादनात फक्त ४.४ टक्क्यांची वाढ झाल्याने अर्थव्यवस्था अद्यापही मंदावलेलीच असल्याचे स्पष्ट होते. मागील आकडेवारीनुसार उत्पादन आणि खाणकाम क्षेत्राच्या खराब कामगिरीमुळे एकूण औद्योगिक विकास गडगडला होता. दरम्यान, मार्चमध्ये मात्र औद्योगिक उत्पादन ७.८ टक्क्यांवर आले, तर खनिकर्मजनित उत्पादन फक्त २.१ टक्क्यांनी वाढले. कॅपिटल गुडस्मध्ये १४.५...
  June 11, 03:52 AM
 • मुंबई- आंतरराष्ट्रीय स्तरावरील नकारात्मक संकेतामुळे चांदी तसेच सोन्याच्या भावात घट दिसून आली. चांदीच्या भावात किलोमागे ३०० रुपये घट होऊन प्रतिकिलोचे भाव ५४,७०० रुपये तर सोन्याच्या भावात प्रतिदहा ग्रॅममागे १३० रुपयांची घसरण होऊन भाव २२६८० वर आले. चांदीच्या नाण्यांतही प्रति १०० नाणी १००० रुपयांनी घट दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारातही सोने-चांदीच्या भावात घसरण झाली.
  June 9, 04:15 AM
 • नवी दिल्ली - थेट विदेशी गुंतवणुकीच्या १६ प्रस्तावांना मंजुरी दिल्याचे सरकारने आज स्पष्ट केले. स्टार न्यूज ब्रॉडकास्टिंग लि. व एल अॅण्ड टी फायनान्ससह इतर प्रस्तावांचा यात समावेश असून यातून ९२३.५५ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सरकारने सांगितले. विदेशी गुंतवणूक प्रोत्साहन बोर्डाकडे याबाबतचे एकूण ३८ प्रस्ताव आले होते. यापैकी १४ प्रस्तावांवरील निर्णय बोर्डाने प्रलंबित ठेवले. सात प्रस्ताव नाकारले तर एका प्रस्तावाची शिफारस आर्थिक व्यवहार समिती (सीसीइए) कडे करण्यात आल्याचे अर्थ...
  June 8, 05:23 AM
 • नवी दिल्ली- सार्वजनिक क्षेत्रातील नैसर्गिक वायू उत्पादक कंपनी ओएनजीसीने मुंबई किना-यावरील बेसिन क्षेत्रातून २०० अब्ज घन मीटर वायूचे विक्रमी उत्पादन काढल्याने मुंबई किना-यावरील बेसिन क्षेत्राची गणना आता जगातील सर्वात मोठ्या वायू उत्पादक क्षेत्रांमध्ये होत आहे. १९७६ मध्ये शोधलेल्या या बेसिन क्षेत्रातून १९८८ पासून दररोज २९ दशलक्ष घन मीटरचे उत्पादन काढले जात होते. ६ मे रोजी आजवर या क्षेत्रातून काढलेले वायू उत्पादन २०० अब्ज घनमीटर झाले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. १८० अब्ज घनमीटर...
  June 8, 05:14 AM
 • देशातील अव्वल दहा कंपन्यांपैकी सात कंपन्यांच्या बाजारभांडवलात २१,३४५.२८ कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. मुंबई शेअर बाजारातील वजनदार समभाग म्हणून ओळखल्या जाणाया रिलायन्स इंडस्ट्रीजचे बाजारभांडवल मात्र घसरले आहे, परंतु सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बॅँक आॅफ इंडिया आणि एनटीपीसी या दोन कंपन्यांनी मात्र बाजारभांडवलात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मागील आठवड्यात झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कृष्णा गोदावरी खोयातील डी- ६ क्षेत्रातील घटलेले तेल...
  June 7, 12:58 PM
 • झोपडपट्टी पुनर्विकास योजनेचा (एसआरए) विकास राज्य सरकारने स्वत:कडे घ्यावा तसेच म्हाडा, सिडको आणि एमएमआरडीए या आपल्या संस्थांना झोपडपट्टी पुनर्विकासाच्या अधिकृत संस्था म्हणून घोषित करावे, असा लेखी प्रस्ताव बिल्डर्स असोसिएशन आॅफ इंडियाने राज्य सरकारकडे सादर केला आहे. यंदा मे महिन्यात म्हाडाच्या ४ हजार ३४ घरांसाठी तब्बल २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी अर्ज केला होता. त्याशिवाय साधारणपणे ७ लाखांपेक्षा जास्त लोक अजून म्हाडाकडून किफायतशीर दरांमध्ये घर मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत....
  June 7, 12:37 PM
 • 2011-12 साठी या महिन्यात जारी केलेल्या चलन धोरणातही आंतरराष्ट्रीय बाजारातील वस्तूंच्या किमती हाच चिंतेचा सर्वात मोठा विषय असल्याचे म्हटले आहे. चालू वर्षातील पहिल्या 6 महिन्यांत एकूण महागाईचा दर 9 टक्क्यांवर जाईल आणि राहिलेल्या 6 महिन्यांत तो 6 टक्क्यांवर उतरेल, असे आरबीआयने म्हटले होते. 51 देशांतील 28,000 लोकांनी सहभाग घेतलेल्या या ऑनलाइन सर्वेक्षणात भारतातील 1000 लोक सहभागी झाले होते. सर्वेक्षणात सहभागी जागतिक ग्राहकांत भारतीय ग्राहकांना महागाई कायम राहण्याचा सर्वात जास्त विश्वास असल्याचे...
  June 6, 01:01 PM
 • नवी दिल्ली: कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या (सीएनजी) किमतीत किलोमागे पन्नास पैशांची वाढ करण्यात आली आहे. सीएनजीचा भाव आता २९.८० रुपये प्रतिकिलो असा झाला आहे. कुकिंग तसेच आॅटोमोबाइल क्षेत्राला सीएनजी पुरवठा करणाया इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड (आयजीएल) या कंपनीने ही भाववाढ केली आहे. दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा व गाझियाबाद येथे ४ जूनच्या मध्यरात्रीपासून ही दरवाढ लागू होईल, असे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी आयजीएलने ३ एप्रिलला किलोमागे ३० पैशांची वाढ केली होती.
  June 5, 04:14 AM
 • दुबई: मध्य आणि दक्षिणपूर्व युरोपमधील आघाडीचा ऊर्जा समूह ओएमव्हीने आज इराकमधील कुर्दिस्तान प्रदेशाच्या बिना बावी तेलविहिरीत खोदकामादरम्यान नवे तेलसाठे सापडल्याची घोषणा केली आहे. ओएमव्हीकडून बिना बावी तेलविहिरीत सुरू असलेल्या खोदकामादरम्यान हायड्रोकार्बनचा साठा आढळला. खोदकाम अद्याप चालू असून तेलाच्या साठ्यांचे सखोल मूल्यांकन केले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे. आम्ही पुढेही खोदकाम सुरू ठेवू आणि त्यातून येणारे अंतिम निकाल महत्त्वाचे असतील, असे कंपनीचे कार्यकारी मंडळ सदस्य जॅप...
  June 5, 03:57 AM
 • चेन्नई : पुढील आठवड्यात ९ जून रोजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या अध्यक्षतेखाली एक मंत्री परिषद होणार असून त्यात देशाचे उत्पादन धोरण जाहीर होणार आहे. हे देशाचे पहिले उत्पादन धोरण असेल, अशी माहिती वाणिज्य आणि उद्योगमंत्री आनंद शर्मा यांनी आज दिली आहे. या धोरणात मोठ्या गुंतवणूक प्रदेशांसाठी राष्टीय गुंतवणूक आणि उत्पादन क्षेत्रे (एनआयएमझेडएस) स्थापन करण्याच्या सूचना आहेत. अशी क्षेत्रे स्थापन केल्यास सन २०२५ पर्यंत उत्पादन क्षेत्रातून देशाच्या विकासदरात सध्याच्या १६ टक्क्यांवरून वाढ...
  June 5, 03:55 AM
 • मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या आर्थिक वर्षात कंपनीला कर्जमुक्त करण्याचा संकल्प कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. रिटेल क्षेत्रावर आगामी काळात भर, प्लास्टीक तसेच पॉलिस्टर उत्पादनात वाढ,चांगल्या तेल उत्पादनाची ग्वाही आणि भागधारकांना ८० टक्के लाभांश अशा महत्वाच्या घोषणा अंबानी यांनी केल्या. ब्रिटनच्या बीपी कंपनीला विकलेल्या तेल आणि वायू क्षेत्रांचा मोबदला वापरून रिलायन्स इंडस्ट्रीज पुढील वर्षात कर्जमुक्त होईल, असा दावा आज...
  June 4, 12:05 PM
 • नवी दिल्ली - केंद्र सरकारने आज सेंद्रिय साखर, डाळी आणि खाद्यतेलाच्या अंशत: निर्यातीला मंजुरी दिली आहे. या निर्णयांतर्गत वार्षिक 10,000 टन सेंद्रिय खाद्यतेल निर्यात करता येणार असल्याचे माहिती विदेश व्यापार महासंचालकांनी दिली. सरकारने 10,000 टन सेंद्रिय साखरेच्या निर्यातीसही मंजुरी दिली. या दहा हजार टनांच्या निर्यातीसाठी आता साखर महासंचालकांकडून रिलीज ऑर्डर घेण्याची आवश्यकता असणार नाही. यावर्षीचे साखर उत्पादन घरगुती मागणीपेक्षा जास्त होणार असल्याचे संकेत असल्याने सरकारने पाच लाख लाख...
  June 4, 05:49 AM
 • नवी दिल्ली - या वर्षी चीनमधील पोलादाची मागणी 600 दशलक्ष टनांवर स्थिर राहणार असल्याची माहिती चीनमधील आघाडीची पोलाद निर्यातदार ब्राइट रबी रिसोर्सेसने दिली आहे. मागील वर्षीही चीनने 600 दशलक्ष टन आयर्न ओर आयात केले होते, असे कंपनीचे अध्यक्ष व्हिक्टर वँग यांनी सांगितले.चीन हा जगातील सर्वात मोठा स्टील निर्माता देश आहे. गेल्या वर्षी उत्पादित 127 दशलक्ष टन कच्च्या स्टीलमध्ये चीनचा वाटा 59 दशलक्ष टन होता.मागील वर्षात भारताने 87.3 दशलक्ष टन पोलाद निर्यात केले असून, सन 2009-10 तुलनेत त्यात 12.98 टक्क्यांनी घट झाली...
  June 4, 05:44 AM
 • मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत कृष्णा-गोदावरी खो:यातील नैसर्गिक वायू उत्पादनातील घसरण रोखण्याच्या दृष्टीने अपेक्षित कोणतीही योजना मुकेश अंबानींनी जाहीर न केल्याने बाजाराचा हिरमोड झाला. या नाराजीतून झालेल्या विक्रीच्या मा:यामुळे सेन्सेक्स ११७ अंकांनी घसरला. विशेष म्हणजे अनिल अंबानी यांच्या समूहातील समभागांना मागणी येऊनही त्याचा फारसा परिणाम बाजारावर झाला नाही. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सकाळच्या सत्रात १८,६७२.६५ अंकांच्या कमाल पातळीवर...
  June 3, 11:46 PM
 • मुंबई - आज येथे पार पडलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या ३७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या आॢथक वर्षात कंपनीला कर्जमुक्त करण्याचा संकल्प कंपनीचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. रिटेल क्षेत्रावर आगामी काळात भर, प्लास्टीक तसेच पॉलस्टिर उत्पादनात वाढ,चांगल्या तेल उत्पादनाची ग्वाही आणि भागधारकांंना ८ टक्के लाभांश अशा महत्वाच्या घोषणा अंबानी यांनी केल्या. ब्रिटनच्या बीपी कंपनीला विकलेल्या तेल आणि वायू क्षेत्रांचा मोबदला वापरून रिलायन्स इंडस्ट्रीज पुढील वर्षात कर्जमुक्त...
  June 3, 11:45 PM
 • दिल्ली - अन्नधान्याच्या चलनवाढीने घसरणीचा सूर दाखवलेला असून २१ मे अखेर संपलेल्या सप्ताहामध्ये ही चलनवाढ अगोदरच्या ८.५५ टक्क्यांवरून ८.६ टक्क्यांवर आली आहे. येत्या काही आठवड्यांत चलनवाढ कमी होण्याची अपेक्षा सरकारने व्यक्त केलेली असली तरी आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या अनिश्चिततेबाबत चिंता व्यक्त केली आहे. घाऊक किमतीवर आधारित अन्नधान्याची चलनवाढ अगोदरच्या सप्ताहातील ८.५५ टक्क्यांवरून ८.६ टक्क्यांवर आली आहे, परंतु प्राथमिक खाद्येतर वस्तूंच्या चलनवाढीची...
  June 3, 04:03 AM
 • मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजच्या भागधारकांची वार्षिक सभा शुक्रवार, 3 जून रोजी होत आहे. या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये रिलायन्सचे प्रमुख मुकेश अंबानी कही महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते काय घोषणा करणार याकडे कंपनीच्या 36 लाख गुंतवणुकदारांचे लक्ष लागले आहे. या सभेमध्ये अंबानी हे आपल्या विदयमान तसेच नवीन व्यवसायांसाठी काही नवीन उपक्रम तसेच भागिदारी आणि अधिग्रहणाबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्याच प्रमाणे वित्तीय सेवा, दूरसंचार, ऊर्जा या सारख्या नवीन क्षेत्रातील...
  June 3, 03:54 AM
 • मुंबई - टाटा एआयजी लाइफ इन्शुरन्स कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 'टाटा एआयजी इन्शुरन्स इनव्हेस्टअॅश्युअर गोल्ड सुप्रीम' आणि 'टाटा एआयजी लाइफ इन्शुरन्स इन्व्हेस्ट अॅशुरन्स मॅक्झिमायझर' अशा दोन योजना आणल्या आहेत. यातील पहिली योजना ही संपूर्ण आयुष्यासाठी युनिट लिंक योजना असून, दुसरी विना सहभाग एन्डाऊंमेंट युनिट लिंक्ड योजना आहे. या दोन्ही योजनांतर्गत पॉलिसीधारकांना ५ ते ७ वर्षे विमा हप्ते भरून आजीवन विमा संरक्षण मिळवण्याची सुविधा आहे. टाटा एआयजी लाइफ इन्व्हेस्ट अॅशुरन्स मॅक्झिमायझर...
  June 3, 03:52 AM
 
जाहिरात

RECOMMENDED