जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Industries

Industries News

 • नवी दिल्ली - गेल्या काही दिवसापासून कडाडलेल्या महागाईपासून सामान्यांची सुटका होण्याची शक्यता आहे. महागाईचा दर या आठवड्यात ९.१३ वरुन ७.७८ इतका खाली आला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून महागाईचा फटका बसलेल्यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात महागाई दर ९.१३ वरुन ७.७८ इतका खाली आला आहे. गेल्या काही वर्षात खाद्यवस्तूंच्या भावांमुळे भारतीयांना अतिरिक्त सुमारे ५.८ लाख कोटींचा फटका बसला आहे. क्रिसिलने केलेल्या संशोधनानुसार सन २००८-०९ व २०१०-११ दरम्यान...
  June 30, 01:51 PM
 • नवी दिल्ली - बुधवारी चांदीच्या भावात वाढ दिसून आली, तर सलग दुसऱ्या दिवशी सोने तेजीने झळाळले. चांदीच्या भावात किलोमागे ६५० रुपयांची वाढ झाली आणि भाव ५२,१५० रुपये झाले. सोन्याच्या भावात १५० रुपयांची वाढ झाली आणि भाव २२,४४० रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
  June 30, 03:47 AM
 • नवी दिल्ली - कर्जातून मुक्त होण्यासाठी तसेच नव्या विस्तार योजनांसाठी निधी मिळवण्यासाठी तीन दुकाने व डेहराडून येथील जमीन विकण्याची विशाल रिटेलची योजना आहे. कंपनी सध्याचे नाव बदलून व्ही २ रिटेल असे करणार आहे. विशाल रिटेलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आर. सी. अग्रवाल यांनी सांगितले की, ५० कोटी रुपये किमतीची तीन दुकाने व जमीन विकून ३० कोटी रुपयांचे कर्ज फेडण्याचा आमचा विचार आहे. कंपनी सध्या आठ नव्या स्टोअर्सच्या निर्मितीत व्यस्त आहे.
  June 30, 03:45 AM
 • नवी दिल्ली - आर्थिक पुनर्रचना कार्यक्रम राबवून एअर इंडियाने तिच्या पुनरुज्जीवनासाठी आठ ते दहा वर्षांचे नियोजन करावे, असे आज केंद्र सरकारने एअर इंडियाला सूचित केले आहे. मागील आठवड्यात झालेल्या मंत्री परिषदेच्या बैठकीत पुनर्रचनेबद्दल चर्चा झाल्याने एअर इंडियाला सरकारकडून इक्विटीच्या रूपात आणखी १२०० कोटी रुपये तसेच देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल तत्त्वावर आणखी दोन उपकंपन्यांच्या कामास मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे, असे सूत्रांनी सांगितले. सरकारने यापूर्वीच दोन टप्प्यांत २ हजार...
  June 30, 03:43 AM
 • नवी दिल्ली - बँकांतील इक्विटी कमी करण्याच्या सरकारी निर्णयाविरोधात बँक कर्मचाऱ्यांनी ७ जुलै रोजी संपाची हाक दिल्याने बँकांच्या कामकाजावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी पावले उचलली जात असल्याची माहिती सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडून देण्यात आली. बँकेच्या शाखा आणि कार्यालये संपादरम्यान नेहमीप्रमाणे कार्यरत राहावीत यासाठी सध्याच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे पावले उचलली जात आहेत, अशी माहिती देना बँकेने दिली आहे. आपण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत, असे युनियन बँकेने सांगितले, तर बँकेच्या...
  June 30, 03:38 AM
 • चेन्नई - बाजारातील सद्य:स्थिती पाहता फॉलोआन पब्लिक ऑफर (एफपीओ) आणण्याचा आमचा विचार असल्याचे मत सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँकेचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक टी. एम. भसीन यांनी व्यक्त केले आहे. बँकेच्या विस्तार योजनांसाठी या ऑफरच्या माध्यमातून भांडवल बाजारातून निधी जमा करण्याची बँकेची योजना आहे. या एफपीओत बँक १० रुपये दर्शनी किमतीचे ६.१ कोटींचे समभाग विक्री करणार आहे. यासाठी रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टस (आरएचपी) तयार करण्यात येत असून, यासाठी एक महिन्याचा अवधी लागणार आहे.
  June 30, 03:34 AM
 • वॉशिंग्टन - भारतात सर्वांत जास्त विदेशी गुंतवणूक करणाऱ्या मॉरिशससोबतच्या कर करारात बदल करण्यासंदर्भात वाटाघाटी सुरू असल्याची माहिती अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी दिली. दुहेरी कर करारात सुधारणा करण्यासाठी आम्ही मॉरिशसशी अद्याप चर्चा करीत असून ती सध्या चालूच आहे, असे अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी सांगितले. थेट विदेशी गुंतवणुकीतील सुमारे ४२ टक्के, तर एफआयआयमधील ४० टक्के गुंतवणूक मॉरिशसच्या माध्यमातून केली जाते. भांडवली लाभ कराची बचत करण्यासाठी बहुतांश तिसऱ्या जगातील देश...
  June 30, 03:31 AM
 • औरंगाबाद - जर्मनीतील व्हॅनोव्हर येथे भरणाऱ्या वर्ल्ड प्रीमियर ट्रेड फेअर फॉर टूल अॅण्ड मेटल वर्किंग टेक्नॉलॉजी (इएमओ २०११) या प्रदर्शनास भेट देण्यासाठी १८ ते २८ सप्टेंबर या काळात मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल अॅण्ड अॅग्रीकल्चर (मसिआ) संघटनेचे सदस्य जाणार आहेत. मसिआचे अध्यक्ष संतोष कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली व संदीप नागोरी आणि भारत मोतिंगे यांच्या नियोजनाखाली हा युरोप दौरा होणार आहे. प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर नेदरलँड, फ्रान्स, बेल्जियम या राष्ट्रांना भेट देण्यात येणार आहे....
  June 30, 03:29 AM
 • नवी दिल्ली- ही कंपनी भारतातील मोठी कंपनी आहे. पण कंपनीला आपल्या कर्मचा-यांना पगार देणेही सध्या अवघड जात आहे. कर्मचा-यांचा पगार देण्यासाठी ती कंपनी बँकांकडून कर्ज घेत आहे.एअर इंडिया ही भारताची सार्वजनिक कंपनी आहे. कंपनीची सध्या आर्थिक स्थिती हलाखीची असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून त्यांना कर्मचा-यांचा पगारही वेळेवर देता येत नाही. पगारासाठी प्रत्येक वेळेस कंपनीला सरकारची मदत घ्यावी लागत आहे. कंपनी सध्या तोट्यात आहे.यावेळेस तर कंपनीने चक्क बँकेकडून कर्ज घेऊन कर्मचा-यांना मे...
  June 29, 12:52 PM
 • पुणे - बॅँक ऑफ महाराष्ट्र व एसबीआय कार्ड यांनी एकत्र येऊन एसबीआय-बॅँक ऑफ महाराष्ट्र क्रेडिट कार्डची घोषणा मंगळवारी केली. हे कार्ड प्लॅटिनम व गोल्ड या दोन प्रकारात उपलब्ध होणार आहे. बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे येथील मुख्य कार्यालयात झालेल्या समारंभात बॅँक ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक ए. एस. भट्टाचार्य व स्टेट बॅँक ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक व सीएफओ दिवाकर गुप्ता यांच्या हस्ते या कार्डचे अनावरण करण्यात आले. प्लॅटिनम कार्ड हे अधिक वेतन व अधिक खर्च असणाऱ्या ग्राहकांसाठी...
  June 29, 03:22 AM
 • नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बाजारात चांदी व सोन्याचे भाव घटल्याने दिल्ली सराफा बाजारातही भाव घसरले. सोमवारी दिल्लीतील चांदीचे भाव ९५० रुपयांनी घसरून ५१,६०० प्रति कि. ग्रॅ. वर आले. सोन्याच्या किमतीही १३५ रुपयांनी घसरून प्रती दहा ग्रॅमसाठी २२,२३५ वर आल्या. दिल्ली बुलीयन वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष व्ही. के. गोयल यांनी सांगितले की, मागणी कमी झाल्याने घरगुती बाजारात चांदी व सोन्याच्या किमती घसरल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचे भाव ३४.१० डॉलर प्रतिऔंसावर सुरू झाले. विक्रीमुळे भाव...
  June 29, 03:20 AM
 • औरंगाबाद - चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अॅण्ड अॅग्रिकल्चर (सीएमआयए) या संघटनेच्या अध्यक्षपदी मुकुंद कुलकर्णी तर सचिवपदी मिलिंद कंक यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. सीएमआयएच्या प्रतिनिधी निवडणुकीची प्रक्रिया २६ जून रोजी पूर्ण झाली. त्यानंतर नवीन कार्यकारिणी निवडण्यात आली. ही कार्यकारिणी अशी: अध्यक्ष मुकुंद कुलकर्णी, उपाध्यक्ष सुनील रायठ्ठा, सचिव मिलिंद कंक, कोषाध्यक्ष सुयोग माच्छर, सहकोषाध्यक्ष नितीन गुप्ता, सहसचिव मनीष शर्मा, संपर्क...
  June 29, 03:17 AM
 • वॉशिंग्टन - सर्वात गतीने वाढणाऱ्या अमेरिकेतील कंपन्यांना भारतातील निर्यातीमुळे फायदा होतो, असे प्रतिपादन करीत अमेरिकेचे अर्थ सचिव टिमोथी गायथर यांनी भारताच्या गतिशील आर्थिक विकासामुळे अमेरिकेला कसलाही धोका नाही, उलट त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेतील मंदी दूर होत आहे, असे मत व्यक्त केले. अमेरिकेतील त्वरेने वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये भारत व जगाच्या इतर भागांत निर्यात करणाऱ्या कंपन्यांचे प्रमाण जास्त आहे, असे मत गायथनर यांनी वॉशिंग्टन येथील अमेरिका-भारत आर्थिक व वित्तीय भागीदारी...
  June 29, 03:14 AM
 • शिक्षण प्रसार आणि प्रचारासाठी देण्यात आलेली ही आजवरची सर्वात मोठी देणगी आहे. ही देणगी दिली आहे यूआयडीचे अध्यक्ष आणि इन्फोसिसचे को फाऊंडर नंदन नीलेकणी आणि त्यांची पत्नी रोहिणी यांनी. ही देणगी त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन सेटलमेंट या संस्थेला दिली आहे.नीलेकणी म्हणतात की मला शिक्षण क्षेत्रात अधिक रूची आहे. शिक्षण क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न असेल.इंडियन इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन सेटलमेंट या संस्थेशी काही दिग्गज मंडळी जेडले गेले आहेत. यात प्रामुख्याने जामशेद...
  June 28, 12:32 PM
 • मुंबई - पतधोरणाचा पहिला तिमाही अहवाल २६ जुलै रोजी सादर केला जाईल, अशी माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने दिली आहे. मोठ्या बँकांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा अहवाल जारी केला जाईल, असे आरबीआयने सांगितले आहे. महागाईला आटोक्यात आणण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या महिन्यात झालेल्या मध्य तिमाही आढाव्यात आरबीआयने २५ मूळ अंकांनी महत्त्वाच्या धोरणांचे व्याजदर वाढविले. महागाई नियंत्रणासाठी आरबीआयने १५ महिन्यांच्या काळात १० वेळा व्याज दरवाढ केली आहे.
  June 28, 03:09 AM
 • मुंबई - सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्रने आपल्या भागधारकांसाठी २० टक्के लाभांश देण्याची शिफारस केली आहे. पुणे येथील मध्यवर्ती कार्यालयामध्ये झालेल्या आठव्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. एस. भट्टाचार्य यांनी ही घोषणा केली. २०१०-११ या वर्षातील बँकेच्या आर्थिक कामगिरीचा आढावाही या वेळी घेण्यात आला.
  June 28, 03:07 AM
 • मुंबई - देशभरात सध्या आर्थिक समावेशकतेचे (फायनान्शियल इन्क्ल्युजन) वारे जोरदार वाहत असून, ग्रामीण भागात पोहोचून शाखा व बॅँक खाती उघडण्यामध्ये बॅँकाही यशस्वी झाल्या आहेत. परंतु खाती उघडल्यानंतर ग्राहकांना बॅँक व्यवहाराची गोडी लावणे, बॅँक प्रतिनिधींना त्याप्रमाणे प्रशिक्षण देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानदृष्ट्या अद्ययावत राहण्यात बॅँकांना येत असलेल्या अडचणींमुळे आर्थिक समावेशकतेच्या उद्दिष्टांपर्यंत हे वारे खऱ्या अर्थाने पोहोचतील की नाही असा प्रश्न निर्माण झाला...
  June 28, 03:04 AM
 • मुंबई - रिलायन्स ट्रेंड फॅशनने मार्च २०१२ पर्यंत नवीन १०० स्टोअर्स उघडण्याची योजना आखली आहे. आगामी काळात प्रत्येक महिन्यात ३ ते ५ नवे स्टोअर्स उघडण्याचा कंपनीचा विचार आहे. तसेच काही आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डबरोबर करार करून वाजवी किमतीत ते ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे. रिलायन्स ट्रेंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सरदेशमुख यांनी सांगितले की, आगामी काळात अपैरल व लाइफस्टाइल रिटेल क्षेत्रात देशात अग्रणी बनण्याची तयारी आम्ही करीत आहेत. त्यामुळे विस्तार योजनेकडे अधिक...
  June 28, 02:57 AM
 • नवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या सरकारच्या निर्णयामुळे महागाई निर्देशांक १० टक्क्यांवर जाण्याची शक्यता असल्याचे जागतिक स्तरावरील बँक नोमुराने म्हटले आहे. नोमुराने जारी केलेल्या संशोधन पत्रात म्हटले आहे की, या दरवाढीमुळे जून महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांक ९.५ टक्के तर जुलै महिन्यात १० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतींवर आधारित असणारा घाऊक निर्देशांक मेमध्ये ९.०६ टक्के होता, तर एप्रिलमध्ये तो ८.६६ टक्के होता. नोमुरा म्हणते, डिझेल महागल्याने वाहतुकीच्या...
  June 28, 02:52 AM
 • नवी दिल्ली - केजी-डी ६ तेलपट्ट्यातील उत्पादन वाटप कंत्राटावरील हायड्रोकार्बन उत्पादनाच्या कामगिरी लेखापरीक्षण अहवालाला अंतिम रूप देण्यापूर्वी कॅगने रिलायन्सशी बोलणी केली होती, असे स्पष्टीकरण आज कॅगने दिले आहे. आम्ही दिलेल्या शेऱ्यांवर कोणत्याही ऑपरेटरला म्हणणे मांडायचे असल्यास कोणत्याही स्तरावर हे कार्यालय (कॅग) त्यासाठी नकार देत नाही, असे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) म्हटले आहे. रिलायन्सला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधी देण्यात आली नाही, या म्हणण्यावर कॅगने आपली...
  June 28, 02:46 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात