जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Industries

Industries News

 • मुंबई - देशभरात सध्या आर्थिक समावेशकतेचे (फायनान्शियल इन्क्ल्युजन) वारे जोरदार वाहत असून, ग्रामीण भागात पोहोचून शाखा व बॅँक खाती उघडण्यामध्ये बॅँकाही यशस्वी झाल्या आहेत. परंतु खाती उघडल्यानंतर ग्राहकांना बॅँक व्यवहाराची गोडी लावणे, बॅँक प्रतिनिधींना त्याप्रमाणे प्रशिक्षण देणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञानदृष्ट्या अद्ययावत राहण्यात बॅँकांना येत असलेल्या अडचणींमुळे आर्थिक समावेशकतेच्या उद्दिष्टांपर्यंत हे वारे खऱ्या अर्थाने पोहोचतील की नाही असा प्रश्न निर्माण झाला...
  June 28, 03:04 AM
 • मुंबई - रिलायन्स ट्रेंड फॅशनने मार्च २०१२ पर्यंत नवीन १०० स्टोअर्स उघडण्याची योजना आखली आहे. आगामी काळात प्रत्येक महिन्यात ३ ते ५ नवे स्टोअर्स उघडण्याचा कंपनीचा विचार आहे. तसेच काही आंतरराष्ट्रीय ब्रॅण्डबरोबर करार करून वाजवी किमतीत ते ग्राहकांना उपलब्ध करून देण्याची कंपनीची योजना आहे. रिलायन्स ट्रेंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सरदेशमुख यांनी सांगितले की, आगामी काळात अपैरल व लाइफस्टाइल रिटेल क्षेत्रात देशात अग्रणी बनण्याची तयारी आम्ही करीत आहेत. त्यामुळे विस्तार योजनेकडे अधिक...
  June 28, 02:57 AM
 • नवी दिल्ली - इंधन दरवाढीच्या सरकारच्या निर्णयामुळे महागाई निर्देशांक १० टक्क्यांवर जाण्याची शक्यता असल्याचे जागतिक स्तरावरील बँक नोमुराने म्हटले आहे. नोमुराने जारी केलेल्या संशोधन पत्रात म्हटले आहे की, या दरवाढीमुळे जून महिन्यातील घाऊक किंमत निर्देशांक ९.५ टक्के तर जुलै महिन्यात १० टक्क्यांवर जाण्याची शक्यता आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या किमतींवर आधारित असणारा घाऊक निर्देशांक मेमध्ये ९.०६ टक्के होता, तर एप्रिलमध्ये तो ८.६६ टक्के होता. नोमुरा म्हणते, डिझेल महागल्याने वाहतुकीच्या...
  June 28, 02:52 AM
 • नवी दिल्ली - केजी-डी ६ तेलपट्ट्यातील उत्पादन वाटप कंत्राटावरील हायड्रोकार्बन उत्पादनाच्या कामगिरी लेखापरीक्षण अहवालाला अंतिम रूप देण्यापूर्वी कॅगने रिलायन्सशी बोलणी केली होती, असे स्पष्टीकरण आज कॅगने दिले आहे. आम्ही दिलेल्या शेऱ्यांवर कोणत्याही ऑपरेटरला म्हणणे मांडायचे असल्यास कोणत्याही स्तरावर हे कार्यालय (कॅग) त्यासाठी नकार देत नाही, असे नियंत्रक आणि महालेखापरीक्षकांनी (कॅग) म्हटले आहे. रिलायन्सला त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी संधी देण्यात आली नाही, या म्हणण्यावर कॅगने आपली...
  June 28, 02:46 AM
 • नवी दिल्ली. मौल्यवान धातू असलेल्या सोन्या-चांदीच्या भावात आज मोठीच घट झाली. आंतरराष्ट्रीय संकेतांमुळे स्टाकिस्टांनी सोन्या चांदीची मोठ्या प्रमाणात विक्री केली. राजधानी दिल्लीत सोन्याच्या किमती 135 रुपये प्रति 10 ग्रॅम कोसळल्या आणि सोन्याचे भाव 22 हजार 235 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिर राहिले. चांदीचे भाव प्रति किलो मागे 950 रुपयांनी कमी झाले. त्यामुळे चांदीचा भाव प्रति किलो 51 हजार 600 रुपयांवर जाऊन थांबला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव 0.3 टक्क्याने कोसळल्याचे वृत्त आहे.
  June 27, 06:09 PM
 • डिझेल, केरोसिन आणि स्वयंपाकाचा गॅस महागल्याने मेटाकुटीस आलेल्या जनतेसाठी एक खुषखबर आहे. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कोसळत आहेत. त्यामुळे पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.भारतातील प्रमुख ऑईल मार्केटिंग कंपनी इंडियन ऑईल कार्पोरेशन अर्थात आयओसीचे अध्यक्ष आर. एस. बुटोला यांनी म्हटले आहे की जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती अशाच गतीने कमी होत राहिल्या तर येत्या काळात आयओसीसुद्धा पेट्रोलचा भाव कमी करू शकेल. परंतु पेट्रोल...
  June 27, 05:50 PM
 • विमानांसाठी अतिशय उच्च दर्जाचे पेट्रोल वापरले जाते. हे पेट्रोल अतिशय महागडे असते. परंतु आता या पेट्रोलला पर्याय मिळाला आहे. हा पर्याय अतिशय स्वस्तही आहे. हॉलंड या देशाची एअरलाईन्स केएलएम ने आपल्या 200 विमानांसाठी खाद्यतेलाचा वापर करण्याची योजना आखली आहे. या तेलाला बायोकेरोसिन असे नाव दिले गेले आहे. हे तेल सूर्यफूलसारख्या धान्यांचे असणार आहे. इतर युरापीय एअरलाईन्सही या दिशेने संशोधन करीत आहेत. गेल्या बुधवारी यासाठी एक करार करण्यात आला. या करारानुसार 20 लाख टन जैविक इंधन बनविण्यात येणार...
  June 27, 01:11 PM
 • नवी दिल्ली - सरकारने जारी केलेल्या माहितीनुसार चालू वर्षात तांदूळ, तेलबिया, कापूस तसेच डाळवर्गीय खरीप पिकांचे लागवड क्षेत्र घटले आहे; परंतु ऊस आणि ज्यूटच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. खरिपातील महत्त्वाचे पीक तांदळाचे लागवड क्षेत्र ८ टक्क्यांनी कमी होऊन १९.०९ लाख हेक्टर्सवर आले. मागील हंगामात हेच क्षेत्र २०.७२ लाख होते. यावर्षी पंजाब, उत्तर प्रदेश आणि ओरिसातील तांदळाच्या लागवड क्षेत्रात मुख्यत: घट झाली. खरिपातील महत्त्वाचे पीक असलेल्या उसाचे लागवड क्षेत्र ५ टक्क्यांनी वाढून ५०.९४...
  June 26, 04:12 AM
 • नवी दिल्ली - जागतिक अन्नधान्य उत्पादन वाढीसाठी पुढाकार घेणे व महत्त्वाच्या पिकांबाबत माहितीबाबत नियमित चर्चा करण्यास सर्वात प्रभावी २० देशांच्या कृषिमंत्र्यांनी सहमती दिली आहे. पॅरिस येथे जी-२० राष्ट्राच्या बैठकीदरम्यान भारताचे कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह जी-२० मधील सर्व कृषिमंत्र्यांनी महत्त्वाच्या मुद्द्यांसंदर्भात कृती कार्यक्रमास सहमती दिली. खाद्यान्न किमतीची तरलता आणि कृषी या कृती कार्यक्रमात खाद्यान्न किमतीतील तरलतेचा सामना करण्यासाठी व वाढती मागणी पूर्ण...
  June 26, 04:08 AM
 • नवी दिल्ली: अखेर गॅस, डिझेल आणि केरोसीनची दरवाढ शुक्रवारी जाहीर करण्यात आली. गॅस 50 रुपयांनी, तर डिझेल 3 आणि केरोसिन 2 रुपयांनी महाग झाले आहे. महाग सिलिंडरच्या रूपात आता थेट स्वयंपाकघरात घुसली असून, घरोघरीचे बजेट कोलमडणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रीगटाची शुक्रवारी सायंकाळी बैठक झाली. तीत इंधन दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. नवी दरवाढ मध्यरात्रीपासून अमलातही आली आहे. सध्या तेल कंपन्यांना एक लिटर डिझेलमागे 15 रुपये, एक लिटर केरोसीनमागे 27 रुपये आणि...
  June 25, 06:30 AM
 • नवी दिल्ली- गोदावरी-कृष्णा खोयातील तेल उत्खननात तेल मंत्रालय, हायड्रोकार्बनचे संचालक व रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्यावर नियंत्रक व महालेखापरीक्षकांनी (कॅग) आपल्या अहवालात अनेक आरोप ठेवल्याच्या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीजचे (आरआयएल) सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप कळू शकला नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजनेही यावर काही भाष्य करण्यास नकार दिला. दरम्यान, कॅगच्या अहवालाची एक पत्र मिळावी...
  June 25, 05:04 AM
 • नवी दिल्ली- सरकारकडून आज जारी करण्यात आलेल्या सर्वेक्षणातील माहितीनुसार भारतातील एकूण कार्यबळापैकी अर्ध्यापेक्षा जास्त लोक स्वत:चा व्यवसाय करतात, यामध्ये पुरुषांसारखेच काम करणाया महिलांना मात्र त्यांच्यापेक्षा कमी पैसे मिळतात. भारतातील एकूण कार्यबळापैकी ५१ टक्के लोकांचे स्वत:चे व्यवसाय आहेत, तर १५.६ टक्के लोकांना नियमित पगारी नोकया आहेत. ३३.५ टक्के लोक मात्र तात्कालिक कामगार म्हणून काम करतात. ग्रामीण भागातील कामगारांपैकी ५४.२ टक्के लोक स्वयंरोजगार कमावतात, तर शहरी भागातील फक्त...
  June 25, 04:57 AM
 • नवी दिल्ली- रिलायन्स उद्योग समूहाचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी आज पंतप्रधान मनमोहन सिंह यांची भेट घेतली. कॅगने काल दिलेल्या अहवालाच्या धर्तीवर या दोघांची झालेली भेट ही अत्यंत महत्वाची मानली जाते. बैठकीत कोणती चर्चा झाली याची माहिती समजू शकलेली नाही. रिलायन्स आॅईल इंडस्ट्रीजने पेट्रोलियम मंत्रालयाला कॅगचा अहवाल मिळावा म्हणून पत्र लिहिले होते असे सूत्रांनी सांगितले. मागच्या आठवडयात कॅगचा अहवाल फुटला होता. अहवाल पूर्णपणे चूकीचा व गैरसमज पसरवणारा होता आणि या अहवालामुळे रिलायन्सच्या...
  June 24, 07:56 PM
 • नवी दिल्ली - भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन संघाला (नाफेड) १२०० कोटी रुपयांचा निधी देण्याबाबतचा प्रस्ताव तयार असून लवकरच तो मंजुरीसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात येणार आहे. यात बँकांकडून देण्यात येणाया कर्जाच्या व्याजावर सरकारची मदत ठरावीक मर्यादेत मिळण्याची तसेच व्यवस्थापकीय संचालकांना दैनंदिन कामकाजाचे पूर्ण अधिकार देण्याची शिफारस करण्यात आली आहे. कृषी मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकायाने सांगितले की, नाफेडमध्ये ५१ टक्के भागीदारी सरकारची राहील. नाफे डच्या विद्यमान...
  June 24, 04:21 AM
 • नवी दिल्ली -फळे, दूध, कांदे व प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमती वाढल्याने ११ जून रोजी संपलेल्या आठवड्यात खाद्यान्न महागाई निर्देशांक ९.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या अडीच महिन्यांतील हा उच्चांक आहे. घाऊक किंमत निर्देशांक म्हणून मोजण्यात येणारा हा निर्देशांक त्या आधीच्या आठवड्यात ८.९६ टक्के होता, तर जून २०१० च्या दुसया आठवड्यात तो २३ टक्क्यांवर होता. एक आठवड्याच्या मुदतीनंतर या महागाई निर्देशांकाने पुन्हा ९ टक्क्यांची पातळी ओलांडली आहे.सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या...
  June 24, 04:00 AM
 • नवी दिल्ली -फळे, दूध, कांदे व प्रथिनयुक्त पदार्थांच्या किमती वाढल्याने ११ जून रोजी संपलेल्या आठवड्यात खाद्यान्न महागाई निर्देशांक ९.१३ टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्या अडीच महिन्यांतील हा उच्चांक आहे. घाऊक किंमत निर्देशांक म्हणून मोजण्यात येणारा हा निर्देशांक त्या आधीच्या आठवड्यात ८.९६ टक्के होता, तर जून २०१० च्या दुसया आठवड्यात तो २३ टक्क्यांवर होता. एक आठवड्याच्या मुदतीनंतर या महागाई निर्देशांकाने पुन्हा ९ टक्क्यांची पातळी ओलांडली आहे.सरकारने गुरुवारी जाहीर केलेल्या...
  June 24, 03:59 AM
 • मुंबई - स्थावर मालमत्ता बाजारातील किंमत स्थिरता आणि व्यवसायाच्या वाढत्या संधी लक्षात घेऊन बड्या रिअल इस्टेट विकासकांनी आता लहान शहरांकडे आपले लक्ष वळवले असल्याचे क्रिसिल रिसर्चने केलेल्या एका पाहणीत दिसून आले आहे. भोपाळ, भुवनेश्वर, कोईम्बतूर, इंदूर, जयपूर, लखनौ, नागपूर, सुरत, बडोदा आणि विशाखापट्टणम यांच्यासह १० प्रमुख शहरांमधील ६५ स्थावर मालमत्ता बाजारपेठेत नवीन निवासी सदनिकांची विक्री पुढील वर्षात १८ हजार कोटी रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज क्रिसिलने व्यक्त केला आहे. या दहा...
  June 23, 04:04 AM
 • नवी दिल्ली- जागतिक बाजारात साखरेच्या किमती चढ्या आहेत, भारतासाठी ही एक चांगली संधी आहे, त्यामुळे सरकारने अधिक साखरेच्या निर्यातीला परवानगी द्यावी, असे कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. एप्रिल महिन्यात खुल्या परवान्याअंतर्गत (ओजीएल) ५ लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली होती. मात्र, देशअंतर्गत साखरेचे उत्पादन चांगले झाल्याने अतिरिक्त १.५ दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीस परवानगी मिळावी, अशी मागणी उद्योजकांनी केली होती....
  June 22, 07:09 AM
 • नवी दिल्ली- शेतकऱयांना खतासाठी थेट अनुदान देण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकार खतनिर्मात्यांऐवजी प्राथमिक स्तरावर सुमारे २.३ लाख किरकोळ खतविक्रेत्यांना रोखीने अनुदान पुरविण्यासंदर्भात विचार करीत आहे. खते, खाद्यान्न आणि इंधनाकरिता प्रस्तावित थेट रोख अनुदान यंत्रणेचे मॉडेल तयार करण्यासाठी नंदन नीलेकणी यांच्या अध्यक्षतेखाली एक लक्ष्य गट काम करीत असून मार्च २०१२ पासून हे थेट रोख अनुदान यंत्रणा अमलात येणे अपेक्षित आहे. रोखीने खत अनुदान हस्तांतरित करण्यासाठी या लक्ष्य गटाने...
  June 22, 06:45 AM
 • नवी दिल्ली- जागतिक बाजारात साखरेच्या किमती चढ्या आहेत, भारतासाठी ही एक चांगली संधी आहे, त्यामुळे सरकारने अधिक साखरेच्या निर्यातीला परवानगी द्यावी, असे कृषिमंत्री शरद पवार यांनी पंतप्रधान मनमोहनसिंग यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. एप्रिल महिन्यात खुल्या परवान्याअंतर्गत (ओजीएल) ५ लाख टन साखरेच्या निर्यातीला परवानगी दिली होती. मात्र, देशअंतर्गत साखरेचे उत्पादन चांगले झाल्याने अतिरिक्त १.५ दशलक्ष टन साखरेच्या निर्यातीस परवानगी मिळावी, अशी मागणी उद्योजकांनी केली होती....
  June 22, 06:36 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात