जाहिरात
जाहिरात
Home >> Business >> Industries

Industries News

 • पुणे- बँक ऑफ महाराष्ट्राला डिसेंबर २०१८ अखेर संपलेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत ४३१.८५ कोटी रुपयांचा कार्यगत नफा (ऑपरेटिंग प्रॉफिट) झाला आहे. बँकेचा एकूण व्यवसाय दोन लाख २५ हजार ५९६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दरम्यान, बँकेने या तिमाहीत अनुत्पादक कर्जांसाठी ४ हजार ४२२ कोटी रुपयांची तरतूद केल्याने बँकेला या तिमाहीअखेर ३ हजार ७६४ कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला आहे. बँकेची कामगिरी वेगाने सुधारत असून पुढील तिमाहीत बँक निव्वळ नफा मिळवेल, असा दावा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य...
  January 24, 09:25 AM
 • नवी दिल्ली- ७० वा प्रजासत्ताक दिन साजरा करताना एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडियाने त्यांची प्रमुख मोहीम # करसलाम (#KarSalaam) चा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. देशाच्या रक्षणासाठी सीमेवर संरक्षण करणाऱ्या भारतीय सैन्याला शुभेच्छा देण्यासाठी या पुढाकारातून संपूर्ण देशाला आमंत्रण देते. एलजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे लोक शुभेच्छा देऊ शकतात तसेच https://www.lg.com/in/karsalaam येथे शुभेच्छा पोस्ट करू शकतात. हा उत्सव साजरा करण्यासाठी ग्राहकांसाठी एलजीच्या निवडलेल्या उत्पादनांवर विविध ऑफर देण्यात आल्या आहेत. या ऑफर...
  January 23, 10:42 AM
 • नवी दिल्ली- तुम्ही व्हॉट्स अॅप (WhatsApp) वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. व्हॉट्स अॅप लवकरच जगभरात एकावेळी फक्त 5 जणांनाच मेसेज फॉरवर्ड करण्याचा नियम लागू करणार आहे. व्हॉट्स अॅपवर पसरणाऱ्या अफवा, खोटी माहिती थांबवण्यासाठी व्हॉट्स अॅपने मागील वर्षी जुलैमध्ये भारतात हा नियम लागू केला होता. युझर्सच्या फिडबॅकनंतर घेण्यात आला निर्णय कंपनीने सांगितले की, मागील सहा महिन्यांच्या कालावधीत व्हॉट्स अॅपने युझर्सच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यानंतर कंपनीने याची चाचणी घेतली....
  January 22, 12:27 AM
 • बिझनेस-रेडी-टू-कुक ब्रँड आयडी फ्रेशची सुरुवात २५ हजारांच्या गुंतवणुकीने झाली होती. आज त्याची उलथापालथ शेकडो कोटी रुपयांची आहे. हे स्टार्टअप २००५ च्या डिसेंबर महिन्यात पीसी मुस्तफा यांनी आपल्या काही भावांसमवेत सुरू केले होते. इडली आणि दोसा बनवण्याने हे काम सुरू झाले. स्वयंपाकघर होते केवळ ५० स्क्वेअर फूट जागेत. हेतू होता व्यग्र महिलांना चांगल्या गुणवत्तेचा इडली- तयार दोसा पीठ उपलब्ध करून देणे. मुस्तफा यांनी त्या काळी तयार पीठ पुरवठ्याचा निर्णय घेतला. तेव्हा लोक ते स्वीकारत नसत. आज ते...
  January 20, 08:43 AM
 • गांधीनगर- आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज आता भारतात अमेझॉन व फ्लिपकार्टसारख्या दिग्गज ई- कॉमर्स कंपन्यांना टक्कर देणार आहे. रिलायन्स कंपनी ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म लवकरच सुरू करणार आहे. सुरुवातीला गुजरातमधील १२ लाख छोटे व्यापारी व दुकानदार या माध्यमातून खरेदी करू शकतील. व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये सहभागी रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी शुक्रवारी ही माहिती दिली. जिऑकडे २८ कोटी ग्राहक आहेत, तर देशातील ६,५०० छोट्या- मोठ्या शहरांत...
  January 19, 09:21 AM
 • नवी दिल्ली- जर्मन ऑटोमोबाइल कंपनी फोक्सवॅगनला २४ तासांत १०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने (एनजीटी) दिला आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही रक्कम जमा करावी लागणार आहे. लवादाने यासंदर्भात १६ नोव्हेंबर रोजी निर्णय दिला होता. एनजीटीचे प्रमुख कुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पीठाने फोक्सवॅगन कंपनीला म्हटले की, आमच्या आदेशाला कोणतीही स्थगिती नव्हती. यामुळे आतापर्यंत रक्कम जमा का केली नाही? आता शुक्रवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्कम जमा करा. लवादाने फोक्सवॅगनला...
  January 18, 10:07 AM
 • नवी दिल्ली- रिलायन्स इंडस्ट्रीज १० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त तिमाही नफा कमावणारी कंपनी झाली. कंपनीने गुरुवारी तिमाही निकाल जाहीर केले. त्यात कंपनीचा महसूल ५५.९ टक्क्यांनी वाढून १ लाख ७१ हजार ३३६ कोटी राहिला. कंपनीचा नफा ८.८ टक्क्यांनी वाढून १० हजार २५१ कोटी रुपये झाला. महसूल आणि नफा हा एक विक्रमच आहे. कंपनीचा नफा सलग १६ व्या तिमाहीत वाढला आहे. डिसेंबर २०१७ मध्ये तिमाहीतील महसूल १ लाख ९ हजार ९०५ कोटी व नफा ९ हजार ४२० कोटी राहिला. महसुलात वाढ ही पेट्रोलियम उत्पादनांचे दर वाढल्यामुळे झाली....
  January 18, 09:51 AM
 • नवी दिल्ली- इलेक्ट्रिक व्हेईकल तयार करणाऱ्या कंपनी आणि या गाड्यांना खरेदी करणाऱ्या ग्राहकांना लवकरच सरकारकडून मोठी भेट मिळणार आहे. सरकारच्या एका पॅनलने देशभरात ई-मोबिलिटीला चालना देण्यासाठी अनेकप्रकारचे प्रस्ताव सादर केले आहे. त्यातच इलेक्ट्रिक वाहनांवर कस्टम ड्युटी आणि जीएसटी रद्द करण्याचा समावेश आहे. त्यामुळे निती आयोगाकडून ई-व्हेईलकल्स मॅन्युफॅक्चरर्सला इंसेंटिव्ह देण्यासाठी नोडेल एजेंसीने काम सुरू केले आहे. पॅनलद्वारा सादर केलेल्या या इंसेंटिव्हमध्ये इ-व्हेईकल्स खरेदीवर...
  January 12, 12:09 AM
 • नवी दिल्ली- मारुती सुझुकीने त्यांच्या काही मॉडेलच्या कारच्या किमतीत १० हजार रुपयांपर्यंत वाढ केली आहे. कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया स्वस्त झाल्याने कंपनीने हा निर्णय घेतला आहे. किमतीमधील ही वाढ तत्काळ लागू करण्यात आली आहे. अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या आर्टिगाच्या नव्या मॉडेलच्या किमतीत वाढ करण्यात आलेली नाही. मारुतीने जानेवारीत गाड्यांच्या किमती वाढवणार असल्याचे डिसेंबरमध्येच सांगितले होते. मात्र, दरात किती वाढ होईल याची माहिती दिली नव्हती....
  January 11, 10:17 AM
 • लंडन- ब्रिटनमधील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) त्यांच्या ४,५०० कर्मचाऱ्यांना काढण्याची शक्यता आहे. चीनमधील मागणी कमी झाल्याने, ब्रेक्झिट आणि युरोपात डिझेल गाड्यांच्या विक्रीत घट झाल्याने कंपनी अडचणीत आली आहे. मीडियामध्ये आलेल्या वृत्तानुसार कंपनी खर्चात २२,५०० कोटी रुपयांची कपात करण्याचा विचार करत असून त्याअंतर्गतच ही कर्मचारी कपात होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
  January 11, 09:13 AM
 • नवी दिल्ली- आर्थिक विवंचनेत अडकलेली हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाचे ओझे आपल्या खांद्यावर खूप दिवस वागवावे, अशी सरकारची इच्छा दिसत नाही. परिणाम सरकार या कंपनीस पुढील आर्थिक वर्षापर्यंत विकण्याची योजना आखत आहे. या व्यवहारातून सरकारच्या तिजोरीत १ अब्ज डॉलर म्हणजे ७००० कोटी रुपये येऊ शकतात. एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, सरकार आर्थिक वर्ष २०१९-२०२० च्या दुसऱ्या सहामाहीत विक्रीची प्रक्रिया सुरू करू शकते. याआधी सरकार याच्या काही सहयोगी कंपन्या व मालमत्तांची विक्री करण्याचा प्रयत्न...
  January 10, 10:57 AM
 • नवी दिल्ली- अॅग्री क्षेत्राशी संबंधित नाफेड (NAFED)ने कुजलेल्या पदार्थांपासून बायो सीएनजी (BIO CNG)तयार करण्यासाठी देशभरात 100 प्लँट बसवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी नाफेड प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये 5,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन तुम्हीही सीएनजी प्लँट उभारून व्यवसाय सुरू करु शकता. बायो सीएनजी गाय-म्हशींसह इतर जनावरांच्या मल-मुत्रापासून, खराब झालेल्या भाजीपाला-फळांपासून तयार करतात. परंतू हा गॅस तयार करण्यासाठी वेगवेगळ्या मशिनरी वापरल्या जातात....
  January 7, 03:18 PM
 • नवी दिल्ली- लोकसभा निवडणूका सुरू होण्याआधी सरकारने खासगी नोकरदार वर्गाला आकर्षित करण्यासाठी महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. खासगी कर्मचाऱ्यांसाठी सरकारने कामगार कायद्यात महत्वाचे बदल केले आहे. त्यानुसार आता खासगी कंपन्यांना कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्याआधी सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. कामगार कायद्याच्या नविन नियमांनुसार, ज्या खासगी कंपनीत 100 पेक्षा जास्त कर्मचारी असतील त्या कंपनीला सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढण्याआधी कंपन्यांना...
  January 5, 02:51 PM
 • नवी दिल्ली- गतवर्षी रिलायन्स जिओ कंपनीने देशातील बहूतांश ग्राहकांना आपल्याकडे वळवून टेलीकॉम क्षेत्रात आघाडी मिळवली होती. यावर्षीही रिलायन्स जिओने पुन्हा एकदा ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एकाहून एक धमाकेदार ऑफर सादर केल्या आहे. त्यामध्ये कंपनीने 399 च्या रिचार्जवर 100 रुपयांचा कॅशबॅक दिला आहे. आता नववर्षाच्या निमित्ताने जिओने पुन्हा एकदा आपल्या ग्राकांना मोठी भेट दिली आहे. जिओने फक्त 1095 रुपयांत न्यु इयर ऑफर सादर केली आहे. या ऑफरअंतर्गत जिओ आपल्या ग्राहकांना डेटा आणि...
  January 3, 02:58 PM
 • बिझनेस- २०१९ मध्ये बाजाराच्या स्थितीबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. मात्र, पहिली सहामाही अस्थिर राहणार असल्याचे जवळपास सर्वच तज्ज्ञांचे मत आहे. सार्वत्रिक निवडणुकीनंतर दुसऱ्या सहामाहीत तेजी येण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत कोणत्या क्षेत्रात गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल याची माहिती घेणेही महत्त्वाचे आहे. वित्त पुरवठादार कंपन्या आणि मोजक्या खासगी बँकांत संधी : माझ्या मते वित्त सेवा क्षेत्रात अल्प मुदतीमध्ये चांगली सुधारणा होण्याची शक्यता आहे. डिसेंबर आणि मार्च...
  January 3, 09:19 AM
 • नवी दिल्ली- अनेक ऑफर्स दिल्यानंतरही २०१८ मधील अखेरचा महिना वाहन कंपन्यांसाठी मंदीचा ठरला. प्रवासी वाहन बनवणाऱ्या कोणत्याही कंपनीच्या विक्रीत देशांतर्गत बाजारात पाच टक्केही वाढ झालेली नाही. ह्युंदाईने सर्वाधिक ४.६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. देशातील सर्वात मोठी प्रवासी वाहन बनवणारी कंपनी मारुती सुझुकीने डिसेंबरमध्ये १.२१ लाख वाहनांची विक्री केली. डिसेंबर २०१७ च्या तुलनेत ही विक्री केवळ १.८ टक्के जास्त आहे. महिंद्रा अँड महिंद्रा च्या विक्रीत तर घट नोंदवण्यात आली आहे. वाहन...
  January 2, 09:11 AM
 • नवी दिल्ली- गेल्या अनेक वर्षांपासून इलेक्ट्रॉनिक वस्तू AC,टिव्ही, फ्रिज, वॉशिंग मशिनसारख्या अनेक ड्युरेबल प्रोडक्टची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुमच्यासाठी ही मोठी संधी आहे. हा व्यवसाय करुन तुम्ही महिन्याला लाखो रुपयांची कमाई करु शकता. असा सुरू करा बिझनेस कन्झ्युमर ड्युरेबल बिझनेस सुरू करण्यासाठी फक्त एका दुकानाची आवश्यकता असते. किंवा तुम्ही भाड्याने दुकान घेऊनसुद्धा काम सुरू करु शकता. जर तुम्ही दुकानाची जागा रहदारीच्या ठिकाणी...
  January 1, 12:11 AM
 • नवी दिल्ली- प्राइज वॉरचा फटका बसलेली टेलिकॉम कंपनी एअरटेलने आता पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एअरटेलला मोठे नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एका अहवालानुसार, कंपनी आपली लाइफटाइम फ्री इनकमिंगचा प्लॅनची सेवा बंद करणार असल्यामुळे येत्या काही महिन्यांत 5 ते 7 कोटी युझर्स एअरटेल नेटर्वक सोडण्याचा अंदाज आहे. आता एअरटेलच्या नव्या नियमांनुसार, ग्राहकाला आपल्या सिममध्ये 35 रुपयांचा मिनिमम बॅलेन्स ठेवणे बंधनकारक आहे. एअरटेलच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, हा प्लॅन...
  December 28, 12:26 PM
 • मुंबई- केवळ एक दिवस मागे गेल्यानंतर टाटा समूह गुरुवारी पुन्हा देशातील सर्वात मोठा कॉर्पोरेट समूह बनला आहे. गुरुवारी बंद बाजारभावाच्या दृष्टीने टाटा समूहाचे बाजार मूल्य १०.४५ लाख कोटी रुपये, तर एचडीएफसी समूहाचे १०.४४ लाख कोटी रुपयांवर होते. बुधवारी एचडीएफसी समूहाने टाटाला मागे टाकले होते. कंपनी मूल्य १०.४० लाख कोटी, तर टाटा समूहाचे १०.३८ लाख कोटी रुपये होते. एचडीएफसी समूहामध्ये पाच, तर टाटा समूहामध्ये २५ नोंदणीकृत कंपन्या आहेत. यावर्षी सप्टेंबर महिन्यात टाटा समूहाचे बाजार मूल्य...
  December 28, 08:46 AM
 • न्यूयॉर्क- लिंकन कार कंपनी काँटिनेंटल कारमध्ये पुन्हा सुसाइड डोअर घेऊन आली आहे. या कारमध्ये मागील दार मागच्याऐवजी समोरच्या बाजूने उघडतेे. १९६० च्या दशकात अशा काँटिनेंटल कारला मोठी मागणी होती. सुरुवातीला खर्च कमी करण्यासाठी पुढील व मागील दोन्ही दरवाजांचे हँडल एकाच जागी ठेवण्यात आले होते. रोल्स रॉयस कारमध्येही असेच दरवाजे आहेत. काँटिनेंटल कारची विक्री झाल्यानंतर २००२ मध्ये उत्पादन बंद करण्यात आले होते. २०१६ मध्ये त्याना पुन्हा लाँच करण्यात आले. लिंकन फोर्डची उपकंपनी आहे. फोर्डचे...
  December 28, 08:45 AM
 
जाहिरात

RECOMMENDED

  जाहिरात
   जाहिरात