Home >> Business >> Industries

Industries News

 • एअर इंडियाला सतत तोटा होत असतानाच इंडिगो कमी भाडे आणि वेळेवर उड्डाण सोडल्याने सलग नऊ वर्षांपासून फायद्यात आहे. देशांतर्गत उड्डाणात देशातील दुसरी सर्वात मोठी भागीदारी असलेली जेट एअरवेज दुसऱ्या वर्षीही फायद्यात राहिली. अर्थात यादरम्यान एअर इंडियाने १० वर्षांत दुसऱ्यांदा ऑपरेटिंग प्रॉफिट कमावला आहे.२०१५-१६ मध्ये १०५ कोटी आणि १६-१७ मध्ये ३०० कोटी नफा राहिला. एअर इंडियाचे एकूण कर्ज ५२ हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. देशाच्या ८६ टक्के उड्डयन क्षेत्रावर खासगी कंपन्यांचा कब्जा आहे....
  July 30, 06:49 AM
 • नवी दिल्ली- दूरसंचार कंपन्यांवर रिलायन्स जिओचा परिणाम वाढत आहे. आदित्य बिर्ला समूहाची कंपनी आयडिया सेल्युलरला एप्रिल-जून तिमाहीमध्ये ८१६ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. देशातील तिसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी असलेल्या आयडियाला सलग तिसऱ्या तिमाहीत तोटा सहन करावा लागला आहे. सप्टेंबर २०१६ जिओ आल्यापासून आयडिया तोट्यात आहे. एप्रिल- जून २०१६ मध्ये कंपनीला २१७ कोटी रुपयांचा नफा झाला होता. या वर्षी जानेवारी-मार्च तिमाहीमध्ये कंपनीला ३२५.६ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. दोन दिवसांपूर्वीच...
  July 28, 03:39 AM
 • नवी दिल्ली - आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी सध्या पॅरोलवर तुरुंगाबाहेर असलेले सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना सर्वोच्च न्यायालयाने ७ सप्टेंबरपूर्वी १५०० कोटी रुपये जमा करण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम जमा न केल्यास सहाराचा बहुप्रतिष्ठित अॅम्बी व्हॅली या प्रकल्पाच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली जाईल, असा इशारा न्यायालयाच्या तीनसदस्यीय पीठाने दिला आहे. १५०० कोटींची रक्कम जमा करण्याच्या अटीवर न्यायालयाने सुब्रतो रॉय यांचा पॅरोल १० ऑक्टोबरपर्यंत वाढवून दिला आहे. या...
  July 26, 01:35 AM
 • नवी दिल्ली - अर्थ मंत्रालय रिलायन्स जिओच्या फ्री 4G हँडसेट ऑफरचा अभ्यास करत आहे. मंत्रालयाच्या दोन अधिकाऱ्यांनी सांगितले की, जीएसटीच्या परिघात ही ऑफर येते अथवा नाही, यावर विचार करण्यात येत आहे. मोबाइल फोनवर आहे 12% जीएसटी - वृत्तसंस्था कोजेंसिजनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे प्रकरण आमच्या निदर्शनास आणण्यात आले आहे. आम्ही सध्या याबाबत माहिती घेत आहोत. जीएसटी अंतर्गत मोबाइल फोनवर 12% टॅक्स आहे. तथापि, फोनचा गुड्समध्ये अंतर्भाव होतो तसेच यात सर्व्हिसही आहे. म्हणून या दोन्ही बाबी...
  July 25, 05:39 PM
 • न्यूयॉर्क - टाटासमूह तोट्यात चालणाऱ्या कंपन्या विकण्याची शक्यता टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी एका मुलाखतीत बोलून दाखवली. एखाद्या कंपनीतून याेग्य परतावा मिळत नसेल आणि भविष्यातही तशी शक्यता असेल तरच हा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. चंद्रशेखरन यांनी फॉर्च्युनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, टाटा ६.४३ लाख कोटींचा उद्योगसमूह आहे. त्यावर अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.छोट्या कंपन्यांच्या बाबतीत ते शक्य नाही.
  July 24, 05:52 AM
 • आयटी क्षेत्रात यंदा अन्य वर्षांच्या तुलनेत नोकरीच्या कमी संधी असल्याचे म्हटले जाते. पण आयटीशी संबंधित असलेल्या क्लाऊड कम्प्युटिंगच्या क्षेत्रात सातत्याने अनेक कंपन्यांची गरज बनत असून याच्याशी निगडित व्यावसायिकांची मागणीही वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार, क्लाऊड कम्प्युटिंग हा आता पर्याय नसून गरज बनली असल्याचे ७० टक्के कंपन्यांचे मत आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी याचा आधार घ्यावाच लागतो. त्याचप्रमाणे अन्य एका सर्व्हेनुसार देशातील सुमारे ७९ टक्के कंपन्या सध्या क्लाऊड सर्व्हिस...
  July 24, 03:00 AM
 • नवी दिल्ली - फॉर्च्युन मॅगझिनने 2017 साठी टॉप-500 ग्लोबल कंपन्यांची यादी सादर केली आहे. यात मागच्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही इंडियन ऑइल, RIL आणि टाटा मोटार्ससहित भारताच्या 7 कंपन्यांनी स्थान पटकावले आहे. यादीतील तब्बल 40% कंपन्या आशियातील आहेत. देशानुसार पाहिल्यास अमेरिकेचा दबदबा कायम आहे. 132 अमेरिकी कंपन्यांनी यादीत जागा मिळवली आहे. 7 पैकी 4 कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातील - फॉर्च्युनच्या यादीत जागा पटकावणाऱ्या कंपन्यांत सरकारी पेट्रोलियम कंपनी इंडियन ऑइल भारताची टॉप कंपनी आहे. या एकमेव...
  July 22, 04:22 PM
 • नवी दिल्ली - रामनाथ कोविंद देशाचे 14 वे राष्ट्रपती असतील. राष्ट्रपतिपदासाठी एनडीएचे उमेदवार कोविंद आणि यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांच्यात लढत होती. तथापि, मतांच्या संख्येनुसार कोविंद यांचीच राष्ट्रपतिपदासाठी वर्णी लागली. कोविंद यांना निवडणुकीत 65.65 टक्के मते मिळाली. देशाच्या संवैधानिक प्रमुखांना दर महिन्याला 1.5 लाख रुपये वेतन तसेच अनेक सुविधा मिळतात. वेजइंडिकेटर फाउंडेशनच्या रिपोर्टनुसार भारताच्या राष्ट्रपतींची सॅलरी चीन आणि पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांहून जास्त आहे. सोर्स:-...
  July 21, 06:52 PM
 • मुंबई - रिलायंस इंडस्ट्रीज लिमिटेडच्या मार्केट कॅपिटलने सोमवारी 5 लाख कोटींचा आकडा पार केला आहे. आरआयएलच्या स्थापनेपासून 51 वर्षांच्या इतिहासात असे पहिल्यांदाच घडले आहे. दिवसाच्या शेवटी कंपनीचे शेयर 1.33 टक्के वाढीसह 1551 च्या स्तरावर बंद झाले. यापूर्वी 5 लाख कोटींच्या मार्केट कॅपचा रेकॉर्ड टीसीएसच्या नावे होता. टीसीएसने 23 जुलै रोजी हा विक्रम केला होता. ऐतिहासिक क्षण... - शेयर बाजारात सोमवारी रिलायंसच्या शेयरने 1559 चा स्तर गाठला. या वर्षीचा रिलायंसचा हा सर्वात मोठा स्तर आहे. क्लोझिंगसह...
  July 17, 09:24 PM
 • नवी दिल्ली - भारतातील अब्जाधीशांच्या वाइव्हज नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. मीडियात नेहमीच त्यांच्या लाइफस्टाइल आणि ग्लॅमरस लूकबाबत चर्चा होत असते. याशिवाय पतीच्या बिझनेसमध्ये त्यांच्या भूमिकाही बातम्यांचे विषय ठरतात. परंतु त्यांच्या एज्युकेशनबाबत फारच कमी चर्चा होते. म्हणूनच लोकांना त्याबाबत काहीही माहिती नसते. सोशल वर्कमध्येही अॅक्टिव्ह अब्जाधीशांच्या पत्नी सामाजिक कार्यातही खूप सक्रिय असतात. खास बाब अशी की त्यांचा फोकस शिक्षण क्षेत्रावर जास्त असतो....
  July 17, 12:02 AM
 • नवी दिल्ली - व्यापारी आणि ट्रेडर्स 24 जुलैपासून जीएसटीएनच्या पोर्टलवर आपल्या विक्री आणि खरेदीचे इनव्हॉइस अपलोड करू शकतील. पोर्टलवर 1 जुलैनंतर जनरेट झालेले इनव्हॉइस अपलोड करता येतील. जीएसटीच्या आयटी नेटवर्कचे काम पाहणाऱ्या जीएसटीएन नेटवर्कने रविवारी याची माहिती दिली. रोज अपलोड करू शकता इनव्हॉइस जीएसटी नेटवर्कचे चेअरमन नवीन कुमार म्हणाले, आम्ही 24 जुलैपासून या पोर्टलवर इनव्हाइस अपलोड करण्याची सुविधा सुरू करणार आहोत. यामुळे व्यापारी आपल्या पातळीवर दररोज किंवा आठवड्यातून केव्हाही...
  July 16, 06:04 PM
 • नवी दिल्ली - देशात जीएसटी लागू झाला आहे. सरकार सातत्याने याची समीक्षा करत आहे तसेच वेळोवेळी आवश्यक बदलही करत आहे. यामुळे विविध शंका स्पष्ट होऊ लागल्या आहेत. टॅक्स रेट लागू झाल्यानंतर समोर आलेल्या काही व्यावहारिक अडचणींना पाहून सरकारने काही वस्तूंना जीएसटीमधून हटवले आहे. उदा. जुने दागिने विक्रीवर सरकारने 3 टक्के जीएसटी निश्चित केली होती. पण आता सरकारने हा कर हटवला आहे. अशाच प्रकारे सरकारने काही आणखी बदल केले आहेत. पुढच्या स्लाइड्सवर वाचा, कोणकोणत्या वस्तूंवर सूट देण्यात आली आहे...
  July 15, 03:35 AM
 • नवी दिल्ली - एफएमसीजी बिझनेसमध्ये दबदबा निर्माण केल्यानंतर रामदेव बाबा आता प्रायव्हेट सिक्युरिटी बिझनेसमध्ये उतरले आहेत. गुरुवारी त्यांनी हरिद्वार येथील पतंजली योगपीठात पराक्रम सुरक्षा प्रायव्हेट लिमिटेड या नावाने सिक्युरिटी कंपनीची सुरुवात केली. पराक्रम सिक्युरिटी सैन्यदल आणि पोलिसांतून निवृत्त सैनिक आणि अधिकाऱ्यांना नोकरीसाठी हायर करेल. उद्योगात वार्षिक तब्बल 100 टक्क्यांची वाढ... -रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेदची एफएमसीजी सेक्टरमध्ये दरवर्षी तब्बल 100 टक्के दराने वाढ...
  July 13, 09:02 PM
 • नवी दिल्ली - जर तुम्ही नोटबंदीदरम्यान म्हणजेच 9 नोव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016 दरम्यान बँक खात्यांमध्ये रोख जमा केली असेल, तर यावरही तुम्हाला टॅक्स द्यावा लागेल. या जमा केलेल्या रकमेचे स्रोत तुम्हाला पुराव्यानिशी द्यावे लागतील, अन्यथा प्राप्तिकर परताव्यात या रकमेलाही समाविष्ट करावे लागणार आहे. असे न केल्यास प्राप्तिकर विभाग तुमच्याविरुद्ध कारवाई करू शकतो. या वेळी कॅश डिपॉझिटची डिटेलही मागितली... - इन्कम टॅक्स (आयटी) डिपार्टमेंटने या वेळी इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये नोटबंदीदरम्यान केलेल्या...
  July 13, 06:15 PM
 • नवी दिल्ली - डोकलाम परिसरात 22 दिवसांपासून भारत आणि चिनी सैन्य आमनेसामने आहे. भारतीय लष्कराने या परिसरात तंबू गाडले आहेत. यावरून भारताने चीनच्या धमकी भीक न घातल्याचे सिद्ध होते. चीनने म्हटले होते की, भारताने त्वरित आपल्या सैन्याला परत बोलवावे, नाहीतर परिस्थिती चिघळू शकते. पण भारतीय लष्कराने चीनच्या नाकावर टिच्चून तंबू गाडले. चीन सातत्याने वाईट परिणामांची धमकी देत आला आहे. म्हणूनच सामान्य नागरिकांच्या मनात हा प्रश्न येणे स्वाभाविक आहे की, चीन खरोखर आपले मोठे नुकसान करू शकतो का? पुढच्या...
  July 11, 08:19 PM
 • वॉशिंग्टन - अमेरिकेच्या बोस्टनमधील कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग कंपनीने भारतात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना 11.8 लाख डॉलर (तब्बल 7.5 कोटी रुपये) ची लाच देऊन कंत्राट देण्याचा आरोप लावला आहे. ही लाच 2011 ते 2015 दरम्यान देण्यात आली होती. याची माहिती अमेरिकेच्या न्याय विभागाने दिली आणि आता भारत सरकारने या आरोपांच्या तपासाचे आदेश दिले आहेत. कंपनीची सबसिडियरी भारतात.. - वृत्तसंस्थेनुसार, अमेरिकी न्याय विभागाच्या गुन्हेविषयक शाखेने 21 जून रोजी पाठवलेल्या पत्रात म्हटले की, सीडीएम...
  July 11, 05:39 PM
 • नवी दिल्ली - ऑनलाइन शॉपिंग पोर्टल अॅमेझॉनने आजपासून (सोमवार) सर्वात मोठा ऑनलाइन सेल सुरू केला आहे. संध्याकाळी 6 वाजता सुरू झालेल्या या सेलमध्ये खूप मोठ्या ऑफर्स, डिस्काउंट आणि कॅशबॅक देण्यात येत आहे. भारतासह इतर 13 देशांत हा आजावरचा सर्वात मोठा सेल सुरू झाला आहे. -या सेलमध्ये अॅमेझॉन एका टीव्हीवर एक टीव्ही फ्री देत असून रेडमी 4 स्मार्टफोनसहित इतर अनेक प्रॉडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंटची ऑफर देत आहे. प्राइम डे सेलदरम्यान ग्राहकांना स्मार्टफोन्ससह इतर अनेक प्रॉडक्ट्सवर भरभक्कम सूट देण्यात...
  July 10, 06:15 PM
 • नवी दिल्ली - देशभरात लाखो लोक दररोज पेट्रोल वा डिझेलची खरेदी करतात. परंतु खूप कमी लोकांना पेट्रोल पंपावर मिळणाऱ्या हक्कांबाबत माहिती आहे. यात मोफत हवा ते पाण्यापर्यंतची सुविधा समाविष्ट आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अधिकारांबाबत सांगत आहोत, ज्यांचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. हक्क बजावता नआल्यास तक्रार करू शकता - जर तुम्हाला तुमचे हक्क पेट्रोल पंपावर मिळाले नाहीत, तर तुम्ही केंद्रीय लोक तक्रार आणि निगरणी प्रणालीकडे तक्रार करू शकता. तुम्ही वेबसाइट http://pgportal.gov.in/ वर जाऊनही तक्रार...
  July 10, 05:18 PM
 • नवी दिल्ली - एअर इंडिया एअरलाइन्स आपल्या फ्लाइट्सच्या इकॉनॉमी क्लासमध्ये मांसाहारी पदार्थ वाढणार नाही. एकूण खर्चात कपात करण्यासाठी एअर इंडियाने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. ही सर्व्हिस डोमेस्टिक फ्लाइट्ससाठी बंद करण्यात आली आहे. सूत्रांनुसार, हा निर्णय मागच्याच महिन्यात घेण्यात आला होता. एअर इंडियावर 50 हजार कोटींचे कर्ज आहे. यामुळे सरकारने याची विक्री करण्याची तयारी चालवली आहे. बिझनेस क्लासमध्ये नाहीये बंदी - एअर इंडियाच्या इंटरनॅशनल तसेच डोमेस्टिक मार्गांवरील बिझनेस आणि...
  July 10, 04:19 PM
 • नवी दिल्ली - अरुण जेटली यांनी रविवारी म्हटले की, काही लोकांनी सल्ला दिला होता की सर्व वस्तूंवर एकसमान दराने जीएसटी लावला पाहिजे. असा सल्ला देणाऱ्या लोकांना आर्थिक असमानता नेमकी कळलेली नाही. जर असे झाले असते, तर गरिबांचे जेवण आणि बीएमडब्ल्यू कार, दोन्हींवर 15 ते 16 टक्के जीएसटी लागला असता. रायपूरमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अरुण जेटली यांनी हे विधान केले. मोदींनी एक कर दिला... - अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रायपूरमध्ये असेही म्हटले की, पूर्ण विश्वात अप्रत्यक्ष कराला अविकसितपणाचे लक्षण मानले...
  July 9, 09:40 PM
 
जाहिरात

RECOMMENDED