आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ईटीएफ गुंतवणुकीला प्राधान्य:गोल्ड ईटीएफमध्ये 1 वर्षाचा परतावा 14%

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोल्ड आणि सिल्व्हर ईटीएफ गुंतवणुकीचे सर्वात आवडते साधन बनले आहेत. आता लाँग टर्म कॅपिटल गेन (एलटीसीजी) आणि इंडेक्सेशनचा फायदा मिळणार नाही. खरं तर, गेल्या एका वर्षात गोल्ड ईटीएफने सुमारे १४% परतावा दिला आहे. या हिशेबाने हे सर्वात चांगली कामगिरी करणाऱ्या फंड्समध्ये सामील झाले आहे. सिल्व्हर फंड्सचा परतावा फक्त ३.६०% राहिला, मात्र यादरम्यान सेन्सेक्स आणि निफ्टीचा परतावा जवळजवळ शून्य राहिला. आता सिल्व्हर ईटीएफ (एक्स्चेंज ट्रेडेड फंड)मध्ये गुंतवणूक गोल्ड ईटीएफपेक्षाही जास्त फायद्याची ठरू शकते. एक महिन्यापक्षाही कमी काळात फिजिकल गोल्डने ५,३०८ रुपये प्रति १० ग्रॅम, तर चांदीने अडीच पट जास्त १२,७३१ रुपये किलो परतावा दिला.

बुलियनशी जोडले फंड, बाँडमधून स्थिर कमाई गोल्ड ईटीएफ| देशाचा पहिला गोल्ड फंड निप्पॉन इंडिया ईटीएफ गोल्ड बीईईएस मार्च २००७ मध्ये लाँच झाला होता. आता देशात ८९ गोल्ड ईटीएफ योजना सुरू आहेत. एखाद्याने तीन वर्षांपूर्वी गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक केली असेल तर आता त्याचे भांडवल सुमारे १,३०,००० रुपये झाले असेल.

सिल्व्हर ईटीएफ | आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडने जानेवारी २०२२ मध्ये देशाचे पहिले सिल्व्हर ईटीएफ लाँच केले होते. देशात आताही ६ सिल्व्हर ईटीएफ आहेत. यात केलेल्या १ लाख रुपयांच्या गुंतवणुकीची किंमत आता १,०४,००० रुपयांच्या जवळ गेली असेल. मात्र यात आता तेजीचे संकेत दिसत आहेत.

सॉव्हरेन गोल्ड बाँड | सरकारने ‘गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम’ अंतर्गत २०१५ मध्ये लाँच केले. तज्ज्ञांच्या मते, डेट फंड्सवर कर सवलत कमी झाल्यानंतर सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये गंुतवणूक वाढेल. गुंतवणुकीतून सोन्याचे भाव वाढण्याचा फायदा मिळेलच, सोबत २.५% व्याजाचा फायदा मिळेल.