आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्यापार:१० वर्षांपूर्वी १ किलाे चांदी १० ग्रॅम साेन्याच्या दुप्पट किमतीत होती

रतलाम ( जितेंद्र श्रीवास्तव)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अनेक वर्षे एक किलाे चांदीची किंमत १० ग्रॅम साेन्याच्या किमतीच्या तुलनेत दुप्पट असायची. परंतु अलीकडेच साेन्याच्या किमतीमध्ये अालेल्या तेजीने हा कल बदलला अाहे. अाता १० ग्रॅम साेन्याचा भाव एक किलाे चांदीच्या तुलनेत जास्त झाला अाहे.

सराफा बाजारात १० ग्रॅम साेन्याचा भाव ४७,४५० रुपये अाहे, तर चांदीची प्रतिकिलाे ४६ हजार रुपयांनी विक्री हाेत अाहे. १० वर्षांपूर्वी म्हणजे २०१० मध्ये १० ग्रॅम साेने १६,३५० रुपये अाणि चांदी ३२,८०० रुपये किलाे या भावाने विकली जात हाेती. २०१२ मध्ये १० ग्रॅम साेन्याचा भाव २८ हजार रुपये अाणि चांदी प्रतिकिलाे ४६ हजार रुपयांवर गेली. २ महिन्यांत साेन्याच्या भावात अालेल्या तेजीने हा कल बदलला अाहे. अाता १० ग्रॅम साेने ४७,४५० रुपयांत विकले जाते. ही किंमत चांदीच्या प्रतिकिलाे ४६ हजार रुपयांच्या विक्रीच्या तुलनेत जास्त अाहे.रतलाम सराफा व्यापारी असाेसिएशनचे सदस्य कीर्ती बडजात्या म्हणाले की, साेने व चांदीच्या किमतीत फरक झाला अाहे. येणाऱ्या काळात पूर्वीसारखी किंमत पातळी येणे कठीण अाहे.

या तीन कारणांमुळे झाला बदल
अांतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्चिततेचे वातावरण असल्याने गुंतवणूकदार साेन्यात गुंतवणूक करत अाहेत
९० % चांदीचा वापर उद्याेगात हाेताे. १० % उपयाेग दागिन्यांत हाेताे. चांदीची अाैद्याेगिक मागणी कमी झाली अाहे.
अमेरिकन डाॅलर अाणि साेन्याच्या किमतीत उलट संबंध असताे. जागतिक पातळीवर डॉलरचे मूल्य घसरत अाहे. त्यामुळेही साेने महाग हाेत अाहे.
— अनुज गुप्ता,उपाध्यक्ष, रिसर्च, एंजेल ब्राेकिंग

बातम्या आणखी आहेत...