आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून मंदीचा सामना करत असलेल्या वस्त्रनगरी भिलवाडा येथील सुमारे ४०० कारखाने सध्या पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. कराेनाची तिसरी लाट संपल्यानंतर शाळा-महाविद्यालये सुरू होणे आणि लग्नाचा हंगाम सुरू होणे हे कारण आहे.
कापड मिलर्सच्या म्हणण्यानुसार, ६५ हून अधिक देशांमध्ये निर्यात करणारा भिलवाडा येथील कापड उद्योग शिखरावर आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीत सुमारे १०० कोटी रुपयांच्या नवीन ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. विशेषतः शालेय गणवेशाची मागणी वाढल्याचे बजाज शूटिंगचे संचालक गजानंद बजाज यांनी सांगितले. पीव्ही आणि पॉलिस्टर फॅब्रिकच्या किमती १५-२५ रुपयांनी आणि कापसाच्या किमती ५०-७० रुपये प्रतिमीटरने वाढल्या आहेत. आदर्श सिंथेटिकचे संचालक गोपाल झंवर म्हणाले की, दरमहा ८-१० कोटी मीटर कापड तयार करणाऱ्या वस्त्रनगरीमध्ये गणवेशाच्या ऑर्डर पूर्ण करणे कठीण जात आहे.
सहा हजार कोटींहून अधिक निर्यात
मेवाड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीचे सरचिटणीस आरके जैन म्हणाले की, २०२० मध्ये भिलवाडा येथून ५,१८८ कोटी रुपयांच्या कपड्यांची निर्यात झाली. काेराेनामुळे २०२१ मध्ये निर्यात ४,९४४ कोटींवर आली हाेती. या वेळी निर्यात २०-२५% वाढून ६,००० कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची अपेक्षा आहे.
फॅब्रिक, डेनिमचा भक्कम व्यवसाय
फॅब्रिक आणि डेनिम बाजार तेजीत आहे. कापसाच्या दरात वाढ झाल्याने त्याचा मागणीवर परिणाम झाला आहे. पण, गणवेशाला चांगली मागणी आहे. आॅर्डरही मिळू लागल्या आहेत. - डॉ. एसएन मेदिनी, एमडी संगम ग्रुप आणि चेअरमन राजस्थान टेक्स्टाइल मिल्स असोसिएशन
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.