आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

डिफॉल्टर:264 थकबाकीदारांवर बँकांचे 1.08 लाख कोटींचे कर्ज थकीत, आरबीआयने आरटीआयच्या उत्तरात दिली माहिती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२६४ मोठ्या सहेतुक थकबाकीदरांवर (विलफुल डिफॉल्टर) बँकांचे तब्बल १.०८ लाख काेटी रुपये थकीत आहेत. ही माहिती भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) माहिती अधिकार कायद्याच्या उत्तरात दिली. पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते िववेक वेलणकर यांनी ही माहिती मागितली होती. १९१३ विलफुल डिफॉल्टरवर जून २०२० पर्यंत बँकांचे १.४६ लाख कोटी रुपये थकीत आहेत.

वेलणकर म्हणाले, “२६४ विलफुल डिफॉल्टर्सवर १०० कोटी वा त्यापेक्षा जास्त कर्जाची थकबाकी आहे. २३ जणांचे प्रत्येकी १००० कोटींपेक्षा कर्ज थकले आहे. त्याची रक्कम ४३,३२४ कोटी आहे. ३४ जणांनी ५०० ते १००० कोटींपर्यंतचे कर्ज बुडवलेले आहे. १०० ते ५०० कोटींपर्यंतची थकबाकी असलेल्या २०७ डिफॉल्टर्सचा एकूण आकडा ४३,०९५ कोटी आहे. २६४ कर्जबुडव्यांवर एकूण १ लाख ८५२७ कोटींची थकबाकी आहे. बँकांनी वसुलीसाठी खटलेही दाखल केले आहेत.

मेहुल चोकसी नंबर वन
यादीत हिरे व्यावसायिक मेहुल चाेकसीची कंपनी गीतांजली जेम्स लि. पहिल्या स्थानी तिच्यावर बँकांची ५,७४७.०५ कोटींची थकबाकी आहे. १५ व्या क्रमांकावरील विजय मल्ल्याच्या किंगफिशर एअरलाइन्सवर १,३३५.२६ कोटी थकीत आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser