आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Sensex Fell 1119 Points To Open At 53184, Nifty Fell 324 Points; The Biggest Decline In Banking Stocks

शेअर बाजार:सेन्सेक्स 1456 अंकांनी घसरून 52,847 वर बंद; निफ्टीही 15,774 पातळीवर, बँकिंग शेअरमध्ये सर्वाधिक घसरण

मुंबई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजारात आज मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स -1456.74 अंक म्हणजेच -2.68% घसरणीसह 52,846.70 या पातळीवर बंद झाला. व्यवहाराच्या सुरुवातीला सकाळी सेन्सेक्स 1,119 अंकांनी घसरून 53,184 वर उघडला होता.

दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टीही 324 अंकांच्या घसरणीसह 15,877.55 वर उघडला होता. दिवसभराच्या व्यवहाराच्या अखेरीस निफ्टी -427.40 अंक म्हणजेच -2.64% घसरणीसह 15,774.40 या पातळीवर बंद झाला.

सर्वात जास्त घसरण बँकिंग समभागांमध्ये दिसून आली. मेटल आणि आयटी समभागातही 2% पेक्षा जास्त घट झाली आहे. शुक्रवारी अमेरिकन बाजारात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून आला आहे.

डाऊ जोन्स 880 अंकांनी घसरून 31,392 वर बंद झाला. S&P 500 मध्ये देखील 3% आणि Nasdaq मध्ये 3.5% ची घट झाली आहे. याशिवाय, युरोपियन बाजार 2-3% घसरले तर आशियाई बाजारातही मोठी घसरण नोंदवण्यात येत आहे. SGX निफ्टी 300 अंकांनी घसरला आहे. जपान, हाँगकाँग आणि तैवानमधील बाजारातही सुमारे 2.5% घसरण झाली आहे. चीनी बाजरात देखील घसरण झाली.

बाजारात घसरणीचे कारण

महागाईत होणारी वाढ हे अमेरिकन बाजारातील घसरण होण्यामागील प्रमुख कारण आहे. येथील महागाईने 40 वर्षांचा उच्चांक गाठला आहे. अमेरिकेतील महागाई 1981 पासून मे महिन्यात 8.6% वर पोहोचली आहे. त्यामुळे फेडरल रिझव्‍‌र्हवर व्याजदर वाढवण्याचा दबाव असून, त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. याशिवाय कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. ते सध्या प्रति बॅरल 120 डॉलरच्या आसपास व्यापार करत आहेत.

रेलिगेअर ब्रोकिंगचे उपाध्यक्ष संशोधक अजित मिश्रा म्हणाले की, या आठवड्यात बाजारात अधिक अस्थिरता असेल. यूएस चलनवाढीच्या दराबरोबरच, शुक्रवारी जाहीर झालेल्या फॅक्टरी आउटपुटच्या डाटामुळे बाजारावर परिणाम झाला आहे. याशिवाय किरकोळ महागाईची आकडेवारी जाहिर होईल. त्याच वेळी, यूएस फेडच्या बैठकीचा निकाल 15 जून रोजी येईल. या सर्वांमुळे बाजारात अनिश्चिततेचे वातावरण आहे.

बातम्यांमुळेही झाला परिणाम

एचडीएफसी बँक, कोल इंडिया, वेदांता, स्ट्राइड्स फार्मा, सीई इन्फोसिस्टम्स, बर्जर पेंट, आयआयएफएल फायनान्स, लेमन ट्री हॉटेल्स, जे अँड के बँक, फ्युचर रिटेल, अंसल हाउसिंग, डेक्कन हेल्थ केअर यांचा समावेश असलेल्या शेअर आज चर्चेत आहे. या कंपन्यांशी संबंधित कोणत्या ना कोणत्या बातम्यांमुळे आज बाजाराचे लक्ष्य या सर्व शेअर्सकडे लागले आहे.

शुक्रवारी सेन्सेक्स 1.84% घसरला होता

10 जून रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद झाले होते. सेन्सेक्स 1016.84 अंक किंवा 1.84% घसरून 54,303.44 वर आणि निफ्टी 276.30 अंक किंवा 1.68% घसरून 16,201.80 वर होता. सेन्सेक्समध्ये इन्फोसिस, बजाज फायनान्स, विप्रो, कोटक बँक आणि एचडीएफसी 2 ते 4% च्या दरम्यान घसरले.

बातम्या आणखी आहेत...