आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई प्रवासात वाढ:1.14 कोटी लोकांनी देशांतर्गत मार्गांवर केला हवाई प्रवास, गेल्या वर्षीच्या तुलनेत 27% जास्त

नवी दिल्ली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाविषयीचे निर्बंध निघाल्यानंतर देशात सलग हवाई प्रवाशांची संख्या वाढली आहे. गेल्या महिन्यात देशांतर्गत मार्गोंवर हवाई प्रवाशांची संख्या २६.९५% वाढुन १.१४ कोटी झाली. ऑक्टोबर २०२१मध्ये ८९.८५ लाख प्रवशांनी देशांतर्गत मार्गांवर विमानाने प्रवास केला होता. सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरमध्ये देशांतर्गत मार्गावरील हवाई प्रवाशांच्या संख्येत १०.६७% वाढ झाली. सप्टेंबरमध्ये ही संख्या १.०३ कोटी होती. तथापि, देशांतर्गत मार्गावरील प्रवाशांची संख्या कोविडपूर्व पातळीपेक्षा अजूनही कमी आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये देशांतर्गत मार्गांवर १.२३ कोटी लोकांनी हवाई प्रवास केला. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने मंगळवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, यावर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत देशांतर्गत मार्गांवर ९.८८ कोटी प्रवाशांनी हवाई प्रवास केला.

एअर इंडियाची कामगिरी सर्वोत्तम अॉक्टोबरमध्ये एअर इंडियाचे टाइम परफॉर्मेंस चांगले होते. दिल्ली, बंगळुरु, हैदराबाद आणि मुंबई एअरपोर्टवर कंपनीची ९०.८०% विमान वेळेवर पाेहोचले. विस्तारा आणि एअरएशिया अनुक्रमे: दुसरा आणि तिसरा क्रमांक. इंडिगो तिसऱ्या क्रमांकावर राहिली. ज्याचा बाजारातील सर्वाधिक हिस्सा ५६.७% आहे.

बातम्या आणखी आहेत...