आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करार्थिक वर्ष २०२६ पर्यंत, अभियांत्रिकी, दूरसंचार आणि आरोग्यसेवा क्षेत्रात १२ दशलक्ष नोकऱ्या असतील. टीमलीज डिजिटलने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालात ही आकडेवारी समोर आली. पुढील पाच वर्षांत ही तिन्ही क्षेत्रे जीडीपीमध्ये भरीव योगदान देतील. सध्या या क्षेत्रात ४.५६ मिलियन नोकऱ्या आहेत. २०२६ पर्यंत सुमारे ९ मिलियनची वाढ हाते १२ मिलियनपेक्षा जास्त नोकऱ्या या तिन्ही क्षेत्रात उपलब्ध असतील. यासोबतच विशेष व्यावसायिकांची मागणीही दुपटीने वाढणार असल्याचेही अहवालात सांगण्यात आले. सध्या कुशल आणि विशेष व्यावसायिकांची मागणी ४५ लाखांहून अधिक आहे, जी २०२६ मध्ये ९० लाखांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे..
सिस्टिम मॅनेजर व डेटा अॅनालिस्ट पदांची संधी
दूरसंचार क्षेत्रातील करिअरसाठी दूरसंचार क्षेत्रात बीटेक किंवा बीई करता येते. टेलिकॉम क्षेत्रात सिस्टिम मॅनेजर, टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर आणि मॅनेजर, डेटा अॅनालिस्ट इत्यादी पदांसाठी संधी आहेत. दुसरीकडे, आरोग्यसेवेचा विचार करता डॉक्टरांव्यतिरिक्त नर्सिंग, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन इत्यादी व्यावसायिकांची मागणी आगामी काळात वाढेल.
स्पेशलायझेशनसाठी पर्याय
कॉम्प्युटर सायन्स शाखेत एमटेक करून डेटा सायन्स आणि एआयमध्ये स्पेशलायझेशन मिळू शकते. aटेलिकॉम पॉलिसी, वायरलेस कम्युनिकेशन सिस्टिम, सॅटेलाइट कम्युनिकेशन इत्यादी विषयांत टेलिकॉममधील स्पेशलायझेशन मिळवता येते. मेडिकलमध्ये एमबीबीएस आणि एमडी अभ्यासक्रमांव्यतिरिक्त रेडिओलॉजी, बीपीटी विथ अॅनेस्थेशिया, बीएनवायएस आदी पॅरामेडिकल अभ्यासक्रमांच्या संधी उपलब्ध आहेत.
या शाखांमध्ये मागणी अधिक असेल
संगणक विज्ञान, डेटा सायन्स आणि एआय शाखांना सर्वाधिक मागणी आहे. सिव्हिल, मेकॅनिकल, पर्यावरण अभियांत्रिकी यासारख्या पारंपरिक शाखांची मागणी कमी होणार नाही, असा विश्वास आयआयटी दिल्लीचे माजी संचालक व्ही. रामगोपाल राव यांनी व्यक्त केला. या सर्व अभ्यासक्रमांसाठी, जेईई-मेन आणि अॅडव्हान्सद्वारे आयआयटी आणि एनआयटीमध्ये प्रवेश घेता येतो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.