आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहागाई नियंत्रणात आणण्यासाठी सरकारच्या वतीने प्रयत्न केले जात असल्याचा आव आणला जातो. परंतू महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. तर जानेवारी 2022 पासून आत्तापर्यंत खाद्यतेल, पीठ ते दुधापर्यंतच्या सर्वच वस्तू महागड्या झाल्या आहेत. एवढेच नाही तर एलपीजी सिलिंडरही महागडे झाले आहे. डिपार्टमेंट ऑफ कंझुमर अफेअर्सच्या वतीने सांगण्यात आले की, गेल्या काही वर्षात पिठाच्या किमतीत आत्तापर्यंत 11 टक्केपेक्षा जास्त वाढ झाली आहे.
यंदा पीठ 11 टक्के, सोया तेल 6 टक्के महागले
जानेवारी 2022 ला सुरुवात झाल्यानंतर देशात गव्हाच्या पिठाची सरासरी किंमत 30.98 रूपये प्रति किलो होती. जी 2 ऑगस्ट रोजी वाढून 34.69 रुपये झाली आहे. तसेच सोयाबीन तेलाचा दर आता 158.06 रुपये प्रतिलिटरवर पोहोचला आहे. 1 वर्षापूर्वी तो 148.59 रुपये प्रति लिटरवर होता. म्हणजेच, त्याची किंमत 6 टक्क्यांनी वाढली आहे. यंदा दाळीचे दर मात्र जैसे थे च आहेत.
गॅस सिलिंडर 103.50 रूपयांनी महाग
1 जानेवारी 2022 रोजी दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 949.50 रुपये होती. जी आता 1,053 रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच या वर्षी आतापर्यंतच्या 7 महिन्यांत घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत 103.50 रुपयांनी वाढ झाली आहे. एवढेच नव्हे तर मिळणारे अनुदानही रद्द करण्यात आले आहे.
18 जुलैपासून पीठ, तांदुळावर 5 टक्के जीएसटी
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या GST परिषदेच्या बैठकीत, अनब्रँडेड प्री-पॅकेज्ड आणि प्री-लेबल केलेले पीठ आणि तांदूळावर 5 टक्के GST लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 18 जुलैपासून पीठ आणि तांदळावर 5 टक्के जीएसटी लागू करण्यात आला आहे. मात्र, पीठ खुले विकल्यास त्यावर कोणताही कर आकारला जाणार नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.