आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑटोमोबाइल:संशोधन, क्षमता विस्तारासाठी कंपन्यांची १.२० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 50 लाखांची विक्री होऊ शकते, मागणी पूर्ण करण्याच्या तयारीत

देशाच्या अर्थव्यवस्थेला गती मिळत असून वाहनांची मागणी विक्रमी पातळीवर पोहोचली आहे. हे पाहता वाहन कंपन्या येत्या काही वर्षांत १.२० लाख कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करतील. क्रेडिट रेटिंग एजन्सी इक्राच्या मते, यापैकी, पुढील दोन वर्षांत सुमारे ६५ हजार कोटी रुपये खर्च केले जातील. हे भांडवल उत्पादन विकास, क्षमता विस्तार आणि ईव्हीसाठी व्यासपीठ तयार करण्यासाठी वापरले जाईल.मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या क्रिसिलच्या अहवालानुसार, ऑटोमोबाइल कंपन्यांचे ऑर्डर बुक उत्कृष्ट आहे. विशेषत: एसयूव्हीला जोरदार मागणी दिसून येत आहे. दरम्यान, सेमीकंडक्टरची उपलब्धतादेखील सामान्य झाली आणि स्पर्धा वाढत आहे. २० हजार कोटींची गुंतवणूक

मारुती सुझुकी इंडिया, टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या कंपन्या पेट्रोल-डिझेल कारच्या क्षमता विस्तारासाठी स्वतंत्रपणे २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करतील.

तीन कारणांसाठी मोठी गुंतवणूक करणाऱ्या कंपन्या
1. कारची विक्री ४० लाखांच्या जवळपास पोहोचली. पुढील काही वर्षांसाठीही विक्री १०-१५% दराने वाढण्याची अपेक्षा
2. इक्राने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये कार विक्री ९-१०% वाढून विक्रमी ५ दशलक्षपर्यंत पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला.
3. एकूणच, या वर्षी कार विक्री ४०.५ लाख प्री-कोविड पातळीपासून सुमारे २०% वाढण्याची अपेक्षा आहे.
ईव्हीची बॅटरी क्षमता वाढवण्यावर भर इक्रा लिमिटेडचे उपाध्यक्ष आणि सेक्टर हेड (कॉर्पोरेट रेटिंग) रोहन कंवर गुप्ता म्हणाले, “काही कंपन्या इलेक्ट्रिक वाहने (ईव्ही ) विकसित करण्यासाठी गुंतवणूक वाढवत आहेत. आतापर्यंत बाजारात दाखल झालेल्या बहुतांश ईव्ही कार सध्याच्या प्लॅटफॉर्मवर विकसित करण्यात आल्या आहेत. आता कंपन्या ईव्हीसाठी पूर्णपणे नवीन प्लॅटफॉर्म तयार करत आहेत. बॅटरीची क्षमता वाढवणे आणि वजन कमी करणे हा त्याचा उद्देश आहे.

भांडवल कुठून येणार?
प्रस्तावित गुंतवणुकीचा मोठा भाग कंपन्यांकडे पडलेल्या रोख रकमेतून येईल. याशिवाय, नुकत्याच स्थापन झालेल्या ईव्ही उपकंपनीद्वारे जमा केलेला निधीदेखील वापरला जाईल.