आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या संपूर्ण जगभरात नोकरीच्या स्थितीत अमूलाग्र बदल होताना दिसत आहेत. पारंपरिक नोकऱ्या संपुष्टात येत आहेत, तर नव्या नोकऱ्यांचे प्रमाण वाढत आहे.
यासंदर्भात वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्यूचर ऑफ जॉब्स रिपोर्टनुसार येत्या 5 वर्षांत जगभरातील 8 कोटी 30 लाख नोकऱ्या संपुष्टात येतील, तर 6 कोटी 90 लाख नव्या नोकऱ्या निर्माण होतील. म्हणजेच आजच्या तुलनेत 2027 पर्यंत 1 कोटी 40 लाख नोकऱ्या संपुष्टात येतील.
डिजिटल कॉमर्स, शिक्षण आणि कृषी क्षेत्रात संधी वाढणार
येत्या 5 वर्षांत डिजिटल कॉमर्स, शिक्षण आणि कृषी क्षेत्रातील रोजगाराच्या संधी वेगाने वाढतील. ज्या कामासाठी शारीरिक मेहनतीची गरज असते ती कामे एआय किंवा रोबोटकडून केली जातील. जगभरात 23 टक्के आणि भारतात 22 टक्के नोकऱ्यांत बदल होतील. रिपोर्टनुसार पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अपारंपरिक ऊर्जेवर आधारित रोजगार वाढतील. तर सप्लाय चेनचे लोकलायझेशन होईल.
वाढत्या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जातील
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने जगभरातील 803 कंपन्यांच्या सर्व्हेक्षणानंतर हा अहवाल तयार केला आहे. यात म्हटले आहे की, जसे समजले जात आहे की वाढत्या तंत्रज्ञानामुळे नोकऱ्या जातील. हे अर्धसत्य आहे. नोकऱ्यांचे प्रमाण कमी होण्याची अनेक कारणे आहेत. यातील एक मोठे कारण आहे कौशल्याची कमतरता. नव्या नोकऱ्यांसाठी नव्या स्किल्सची गजर आहे. यासाठी तयारी नाही.
44 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम राहण्यासाठी कौशल्य वाढवावे लागेल
कर्मचाऱ्यांना नोकरीच्या गरजेनुसार तयार होण्यास वेळ लागेल. याच कारणामुळे बेरोजगारी आणि कामगारांची कमी सोबतच दिसत आहे. येत्या 5 वर्षांतही हीच स्थिती राहील. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की 44 टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीत राहण्यासाठी कौशल्य वाढवावे लागेल.
डिजिटल कॉमर्समध्ये सुमारे 20 लाख आणखी नोकऱ्या वाढतील
येत्या 5 वर्षांत डिजिटल कॉमर्समध्ये सुमारे 20 लाख नोकऱ्या वाढतील. तथापि सर्वाधिक गरज एआय आणि मशीन लर्निंग तज्ज्ञांची भासेल. माहिती सुरक्षा तज्ज्ञ, बिझनेस अॅनालिस्टच्या नोकऱ्या वाढतील. मात्र 2027 पर्यंत 10 पैकी 6 कर्मचाऱ्यांना खास ट्रेनिंगची गरज भासेल.
नव्या बदलांत भारतीय कंपन्या चांगली कामगिरी करतील
भारतात महागाई, मंद आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीतील अडचणींमुळे नोकऱ्यांच्या बाजारात मोठ्या अडचणी निर्माण होतील. यानंतर अॅडव्हान्सड टेक्नोलॉजी आणि डिजिटलीकरणाच्या वाढ्या वापरामुळे नोकऱ्या घटतील.
तथापि, यामुळे नोकऱ्या वाढतील. सरकार आणि व्यावसायिक दोघांनी मिळून नोकऱ्यांतील बदलांसाठी कर्मचाऱ्यांना नव्या प्रकारचे शिक्षण, प्रशिक्षण आणि सोशल सपोर्ट स्ट्रक्चर द्यावे लागेल असे डब्ल्यूईएफच्या व्यवस्थापकीय संचालक सादिया जाहिदी म्हणाल्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.