आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अडचण:1400 उड्डाणांना परवानगी, राज्यांच्या नियमामुळे 750 विमानांची भरारी, महानगरात 45 आणि अन्य शहरांत 33% उड्डाणांना केंद्राची परवानगी

नवी दिल्ली ( शरद पांडेय )10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लखनऊ-चेन्नई मार्गावर प्रवासी संख्येत जास्त वाढ

केंद्र सरकारने विमान कंपन्यांना महानगरात ४५ टक्के आणि अन्य शहरांत ३३ % उड्डाणांना परवानगी दिलेली असली तरी राज्यांतील वेगवेगळ्या नियमांमुळे जवळपास अर्ध्याहून अधिक उड्डाणे अद्याप सुरू झालेली नाहीत. सध्या राेज १,४०० पेक्षा जास्त विमानांचे संचालन करण्याची परवानगी आहे. परंतु सध्या फक्त ७५० विमानेच उड्डाण करत असल्याचे नागरी हवाई उद्याेग मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले.

दिल्ली-मुंबई या जगातील सर्वात व्यग्र मार्गावर सध्या २० ते २५ उड्डाणे सुरू आहेत. अन्य दिवसात राेज २५० ते ३०० विमाने सुरू असतात. महाराष्ट्र सरकारने मुंबईत जास्तीत जास्त १०० विमानांनाच परवानगी दिली आहे हे यामागील एक मुख्य कारण आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाच्या माहितीनुसार बहुतांश विमान कंपन्यांनी जुन्या मार्गावर विमानसेवा सुरू केली आहे. परंतु विमानाेड्डाणातील अंतर खूप कमी केले आहे. काही बिगर महानगरांमध्ये आठवड्यातून दाेन ते तीन विमाने सुरू आहेत. काही मार्गांवर अजूनही विमाने सुरू झालेली नाहीत. यात आरसीएस आणि उडान याेजनेचे मार्ग आहेत.

लाॅकडाऊनसह सरकारने देशांतर्गत विमाने २५ मार्चपासून पूर्णत: बंद केली हाेती. दाेन महिन्यांनंतर २५ मे राेजी देशांतर्गत विमाने सुरू झाली. सरकारने निश्चित केलेल्या मार्गावर ३३ टक्के विमानसेवा सुरू करण्याची परवानगी विमान कंपन्यांना दिली हाेती. राेज ३,६०० पेक्षा जास्त विमान सेवांपैकी १,२०० विमाने सुरू करण्याची तयार केली हाेती. परंतु राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे पहिल्या दिवशी ४९५ विमानेच सुरू करता आली. सध्या अंदाजे ७५० विमानांचे संचालन हाेत आहेे. राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे विमान कंपन्यांना ठरलेल्या संख्येप्रमाणे विमाने सुरू करता आलेली नाहीत. 

काेराेनाच्या अगाेदर केवळ १२ टक्के आसने रिकामी राहायची; पण आता ४० % आसने राहतात रिकामी राज्यांच्या नियमांबराेबरच विमान कंपन्यांना रिकाम्या आसनांचा सामना करावा लागत आहे. सध्याच्या विमानांत ४०% आसने रिकामी राहत आहेत. काेराेनाच्या आधी सरासरी केवळ १२% आसने रिकामी राहत हाेती.  काेराेनाच्या अगाेदरच्या वर्षाशी तुलना करता स्थानिक विमानांचे बुकिंग ८२ % कमी झाले आहे. परंतु गेल्या महिन्यात सुरू झालेल्या विमानसेवेशी तुलना करता प्रवाशांंच्या संख्येत आता दुपटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे.

राज्यांबराेबर चर्चा सुरू

राज्यांशी चर्चा सुरू आहे. जास्त उड्डाणांसाठी ते राजी हाेण्याची अपेक्षा आहे. काही ठिकाणी मार्गदर्शकतत्वांच्या संख्येमुळे कमी विमाने सुरू आहेत. आधी काही राज्यांची एकाही विमानाची तयारी नव्हती. चर्चा सुरू आहे, विमानांची संख्या वाढेल अशी आशा आहे. - अरुण कुमार, डीजीसीए

लखनऊ-चेन्नई मार्गावर प्रवासी संख्येत जास्त वाढ

नवी दिल्ली ते पाटणा, नवी दिल्ली ते बागडाेग्रा, दिल्ली ते श्रीनगर, बंगळुरू ते पाटणा, मुंबई ते पाटणा, मुंबई ते वाराणसी, नवी दिल्ली ते काेलकाता, मुंबई ते पाटणा, दिल्ली ते रांची, मुंबई ते लखनऊ या विमान मार्गावर सर्वात जास्त बुकिंग प्रवाशांनी केले आहे.

परवानगी मिळताच सुरूवात

इंडिगोची ५० ते ६० % विमाने चालवण्याची तयारी आहे. राज्यांच्या  नियमांमुळे ठरलेल्या संख्येनुसार उड्डाणे हाेऊ शकत नाही. हा प्रश्न डीजीसीए, राज्यांचा आहे. डीजीसीएने परवानगी दिली की लगेच सेवा सुरू करू - प्रतीक्षा, जनसंपर्क अधिकारी, इंडिगो

राज्यातील वेगवेगळ्या नियमांची मार्गदशक तत्त्वे ठरत आहेत

- मुंबईत १०० उड्डाणांची परवानगी दिली आहे. आधी ५०० पेक्षा जास्त उड्डाणे हाेती.

- पश्चिम बंगालमध्ये जाणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस क्वारंटाइन हाेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

- आंध्र प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशांना राज्य सरकारच्या संकेतस्थळावर नाेंदणी करणे बंधनकारक.

- गुजरात,महाराष्ट्र, दिल्ली, राजस्थान, तामिळनाडू, मध्य प्रदेशातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस क्वाॅरंटाइन केंद्रात राहावे लागेल.

बातम्या आणखी आहेत...