आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंपन्यांनी गुंतवणूक वाढवली:नऊ महिन्यांत 15 लाख कोटींची कॉर्पोरेट गुंतवणूक, 6 महिन्यांत 87 लाख नोकऱ्या

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात मागणी वाढल्याचे अनेक सकारात्मक परिणाम दिसत आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ९ महिन्यांत कंपन्यांनी ३६ टक्क्यांनी गुंतवणूक वाढवली आहे. यामुळे पहिल्या तिमाही दरम्यान देशात ८७ लाखांपेक्षा जास्त नव्या नोकऱ्या निर्माण झाल्या. सीएमआयई नुसार, आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या पहिल्या ९ महिन्यात म्हणजे एप्रिल ते डिसेंबरदरम्यान कंपन्यांनी सुमारे १५ लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची घोषणा केली. या तुलनेत आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या ९ महिन्यांत कंपन्यांनी जवळपास ११ लाख कोटीच्या नव्या गुंतवणुकीची घोषणा केली होती.

डिसेंबर तिमाहीपासून गुंतवणूक वाढू लागली
बँक ऑफ बडोदा रिसर्चच्या नुसार, मार्च २०२२ मध्ये सर्वाधिक ८.६ लाख कोटी रुपयांची कार्पोरेट गुंतवणूक झाली. त्यानंतर सतत दोन तिमाही गुंतवणुकीत घट झाली. मात्र ऑक्टोबर- डिसेंबर तिमाहीत ती वाढून ६.१ लाख कोटी झाली. याच्या तुलनेत ऑक्टोबर-डिसेंबर २०२१ मध्ये ४.२ लाख कोटीच्या गुंतवणुकीची घोषणा झाली होती.

2020 च्या तुलनेत गुंतवणूक साडेतीन पटीने वाढली आहे

तिमाहीत गुंतवणूक ऑक्टोबर-डिसेंबर 20 1.7 जानेवरी-मार्च 21 2.8 एप्रिल-जून 21 3.1 जुलै-सप्टेंबर 21 3.7 ऑक्टोबर-डिसेंबर21 4.2 जानेवरी-मार्च 22 8.6 एप्रिल-जून22 5.2 जुलै-सप्टेंबर 22 3.7 ऑक्टोबर-डिसेंबर 22 6.1 (स्रोत: सीएमआयई)

गुंतवणुकीपैकी दोन तृतीयांश गुंतवणूक उत्पादन क्षेत्रात होते सेक्टर गुंतवणुकीत भागीदारी मॅन्युफॅक्चरिंग 64.9% वीज 27.4% सर्व्हिसेस 6.1% मायनिंग 0.9% कंस्ट्रक्शन, रिअल्टी 0.7% चालू आर्थिक वर्षाची पहिली सहामाही म्हणजे एप्रिल-सप्टेंबर २०२२ मध्ये ८७.१ लाख नव्या कायम नोकऱ्या निर्माण झाल्या.

बातम्या आणखी आहेत...