आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएका रात्रीत अब्जाधीश होण्याचे एखादे उदाहरण कधीतरी समोर येते, मात्र एका रात्रीतून अब्जाधीश कंगाल होण्याचे प्रकरण कमीच दिसून येते. न्यूयॉर्कच्या वॉल स्ट्रीट मार्केटचे ट्रेडर बिल हवांग यांचे प्रकरण असेच आहे. २० अब्ज डॉलर (सुमारे १.५ लाख कोटी रु.) संपत्तीचे मालक हवांग यांनी दोन दिवसांत आपली सर्व संपत्ती गमावली आहे. वास्तवात हा चुकीच्या पद्धतीने गुंतवणूक करण्याचा परिणाम आहे. संपूर्ण जगात बहुतांश अब्जाधीशांचा पैसा उद्योग, रिअल इस्टेट, इक्विटी बाजार, स्पोर्ट्स टीम आणि आर्टवर्क यासारख्या बाबीत गुंतला आहे. मात्र, बिल हवांग यांचा सर्व पैसा शेअर बाजारात होता. त्यामुळे शेअर्सचे भाव पडल्यावर त्यांची सर्व संपत्ती बुडाली. हवांग यांची कंपनी आर्चेगोस कॅपिटल मॅनेजमेंट मार्चमध्ये अचानक भुईसपाट होणे आधुनिक वित्तीय इतिहासातील सर्वात मोठ्या अपयशात समाविष्ट होऊ शकते. कोणत्याही व्यक्तीने एवढ्या लवकर एवढी मोठी रक्कम गमावली नाही. आपल्या सर्वोच्च स्थितीत हवांग यांची संपत्ती ३० अब्ज डॉलर (२.२ लाख कोटी रु.) होती. हवांग गुंतवणूकदारांना खोट्या नावाने गुंतवणुकीची सुविधा देत होते. कंपनीच्या नावावर हवांग यांनी अनेक बँकांचे अब्जावधी डॉलर्सचे कर्ज घेतले होते. हवांग व त्यांची कंपनी कर्जाचा शेअर्समध्ये गुंतवत होती. त्यांच्या कंपनीने लोकांचा पैसा वायकॉम सीबीएस, जीएसएक्स टेेकेडू व शोपीफायसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये लावला होता. कंपनी कोसळताच अनेक बँका, वित्तीय संस्थांची स्थिती खराब झाली आहे. बँकांनी आपल्याकडे तारण ठेवलेले हवांगचे शेअर्स विकायला सुरुवात केली.
२००८ मध्ये इनसायडर ट्रेडिंगचे झाले आरोप
याआधी हवांग यांनी २००८ मध्ये टायगर एशिया नावाचा हेज फंड सुरू केला होता. याच्या माध्यमातून ते कर्जाच्या पैशातून आशियाई शेअर्समध्ये गुंतवत होते. मात्र, इनसायडर ट्रेडिंगच्या आरोपानंतर त्यांना गुंतवणूकदारांचे पैसे परत करावे लागले होते. हवांगवर कमीत कमी ५ वर्षांसाठी सार्वजनिक वित्त व्यवस्थापन करण्यास मनाई केली होती. टायगर एशिया बंद झाल्यानंतर २०१३ मध्ये हवांगमध्ये आर्चेगोस सुरू झाले होते,त्याचे भाग्य आज समोर आले.
कर्ज देणाऱ्यांचेही ५० हजार कोटींचे नुकसान
हवांग यांना कर्ज देणाऱ्या क्रेडिट सुइस ग्रुप एजीला ३५ हजार कोटी रुपयांचे आणि नोमुरा होल्डिंग्जला १५ हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले. या संस्थांतील अनेक टॉप एक्झिक्युटिव्हजच्या नोकऱ्या गेल्या. हवांग प्रकरणाने वॉल स्ट्रीटसारख्या संस्थांतील त्रुटी उघड झाल्या आहेत. प्राप्त माहितीनुसार, सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज कमिशनने हवांग यांची कंपनी आर्चेगोसविरुद्ध चौकशी सुरू केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.