आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्होडाफोन आयडिया कर्ज घेणार:5 जीसाठी 16 हजार कोटींचे कर्ज घेणार

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीर्घकाळापासून आर्थिक टंचाईचा सामना करणारी टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडिया देशात ५जी सर्व्हिसेस लाँच करण्याची तयारी करत आहे. त्यासाठी उपकरण खरेदीसाठी कंपनी एसबीआयकडून १५--१६ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेऊ इच्छिते. यासाठी कंपनी आणि बँक अधिकाऱ्यांमध्ये एक महिन्यापासून चर्चा सुरू आहे. सध्या एसबीआय कंपनीत शासनाच्या शेअरहोल्डिंग बाबत स्थिती स्पष्ट होण्याच्या प्रतीक्षेत आहे.

जून– सप्टेंबर तिमाही आतापर्यंतच्या स्थितीनुसार, व्होडाफोन– आयडियावर एकूण २.२ लाख कोटी रुपयांचे कर्ज बाकी आहे. सप्टेंबरमध्येच कंपनीने एसबीआयला २७०० कोटी रुपयांच्या लघु मुदतीच्या कर्जाची मुदतपूर्व फेड केली आहे. तसेच कंपनीला एप्रिल– जून तिमाहीत बँका आणि इतर वित्तीय संस्थांचे २३४०० कोटी रुपये द्यायचे होते. जुलै– सप्टेंबर तिमाहीत ही रक्कम घटून १५०८० कोटी झाली.

बातम्या आणखी आहेत...