आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोविडनंतरचा दुसरा टप्पा:सुपा एमआयडीसीत ‘जपानी इंडस्ट्रीज पार्क’ मध्ये तब्बल 1,880 कोटींची गुंतवणूक

बंडू पवार| नगर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे, अहमदनगर आणि औरंगाबादच्या मध्यभागी असलेल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमधील (एमआयडीसी) “जपानी इंडस्ट्रीज पार्क’ पुणे, औरंगाबाद व अहमदनगर या जिल्ह्यांसाठी “सुवर्णमध्य’ ठरणार आहे. या एमआयडीसीत कोविडनंतर दुसऱ्या टप्प्यात १ हजार ८८० कोटींची गुंतवणूक झाली. दुसऱ्या टप्प्यात आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय स्तरावरील १३ नवे उद्योग दाखल होणार आहेत. यातून ३ हजार ५९० जणांना रोजगार उपलब्ध होईल.

सुपा एमआयडीसी नगर-पुणे शहरांच्या मध्यभागी आहे. दहा वर्षांपूर्वी तेथे माळरान होते. आता तेथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय उद्योग दाखल होत आहेत. भाजप-शिवसेना युतीच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ५ नोव्हेंबर २०१८ ला चीनच्या ‘कॅरिअर मायडिया’ या आंतरराष्ट्रीय उद्योगाचे भूमिपूजन झाले होते. हा येथील पहिला प्रकल्प. या उद्योगाने तब्बल ८०० कोटींची गुंतवणूक केली होती. येथे कॅरिअर मायडिया, मिंडा, तोशिबा व जीएमसीसी हे चार प्रकल्प असून, त्यातून मोठा रोजगार उपलब्ध झाला आहे. दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे नव्याने येणाऱ्या उद्योगांना ब्रेक लागला होता. मात्र, गेल्या वर्षभरात दुसऱ्या टप्प्यात येथे १३ नवे उद्योग दाखल होण्याच्या तयारीत आहेत. या उद्योगांनी एकूण १ हजार ८८० कोटींची गुंतवणूक केली. पुण्याजवळील रांजणगाव औद्योगिक वसाहत व नगरच्या नागापूर औद्योगिक वसाहतीतही नव्या उद्योगांसाठी भूखंड शिल्लक नाहीत. अशात अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय उद्योजक सुप्याला पसंती देत आहेत.

महाराष्ट्राच्या विकासात अहमदनगरचे एक पाऊल पुढे सेवा सुविधेसाठी एमआयडीसी प्रयत्नशील ^सुपा औद्योगिक वसाहतीमध्ये गुंतवणुकीस मोठा वाव आहे. या औद्योगिक वसाहतीत राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरून येणाऱ्या उद्योगांना सर्व सेवा सुविधा मिळाव्यात यासाठी महामंडळ प्रयत्नशील आहे. - नितीन गवळी, उपप्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी,

जपानच्या २ उद्योगांतून ६१९ जणांना रोजगार ^सुपात जपानमधील मित्सू बॉश, इनक्यू हे २ मोठे उद्योग आले. त्यांचे काम ६० टक्के पूर्ण झाले. जानेवारीअखेरपर्यंत हे काम संपेल. त्यानंतर प्रकल्पांतून उत्पादनाला सुरु होईल. या दोन्ही प्रकल्पांतून ६१९ जणांना प्रत्यक्षात रोजगार मिळेल. - बाहुबली, युनिट हेड, मित्सू बॉश.

२० उद्योगांची ४ हजार ४६७ कोटींची गुंतवणूक सुपात आतापर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय २० उद्योग आले असून काही येणार आहेत. या २० उद्योगांनी तब्बल ४ हजार ४६७ कोटींची गुंतवणूक केली. या उद्योगांमधून तब्बल ७ हजार ४६७ जणांना रोजगार निर्माण होणार आहे. २० उद्योगांपैकी ९ उद्योगांमध्ये उत्पादनाला सुरू झाले. यातून साडेतीन हजार जणांना प्रत्यक्षात रोजगारदेखील मिळाला आहे.

एकूण राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील उद्योग व गुंतवणूक उद्योग गुंतवणूक रोजगार केएसपीजी ५२ कोटी २२० कॅरिअर मायडिया ३४१ कोटी ३०० बॉक्सव्हील्स २५० कोटी ३०० मिंडा ५०० कोटी १५०० इप्टान १०० कोटी ५०० बीएमआर ३०० कोटी २७० ईएमएम २० कोटी ४८ अंबर ४० कोटी २२० वरुण ८२१ कोटी १९५० इंडिगो २२ कोटी १०० आरव्ही ६५ कोटी ७० आयडियल ११७ कोटी ८८ लून्समार्च ७३ कोटी १०० मित्सू बॉश ३५२ कोटी ६०९ चाल्सरुड १५५ कोटी ४३० जेन्सर १२५ कोटी १३० इनक्यू २३ कोटी ०९

गुंतवणूक पहिला टप्पा { उद्योग - ७ { गुंतवणूक - २,३४३ कोटी { रोजगार - ३,५९०

दुसरा टप्पा { उद्योग - १३ { गुंतवणूक - १,८८० कोटी { रोजगार - ३,८७७

बातम्या आणखी आहेत...