आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवी दिल्ली:एप्रिलमध्ये कार विक्रीत 20 % घट

औरंगाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सेमीकंडक्टर चिप्सचा तुटवडा आणि स्टील-तांब्यासारख्या महागड्या वस्तूंमुळे उत्पादनात झालेली घट यामुळे किमतीत वाढ झाल्याचा परिणाम वाहन उद्योगाच्या विक्रीवर दिसून येत आहे. गेल्या महिन्यात देशांतर्गत बाजारपेठेतील प्रवासी वाहनांच्या एकूण विक्रीत ३.८ टक्क्यांनी घट झाली. गेल्या वर्षीच्या एप्रिलच्या तुलनेत कारची विक्री २०% कमी होती, परंतु युटिलिटी वाहनांच्या विक्रीत १६.८४% वाढ झाली. बुधवारी प्रसिद्ध झालेल्या वाहन कंपन्यांची संघटना असलेल्या सियामच्या अहवालातून ही माहिती समोर आली आहे.

मारुती सुझुकीने एप्रिलमध्ये देशांतर्गत बाजारात १,२१,९९५ गाड्यांची विक्री केली. एका वर्षापूर्वी १,३५,८७९ गाड्या विकल्या गेल्या होत्या. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स (सियाम) च्या अधिकाऱ्यांच्या मते, विक्रीचे हे आकडे सामान्यपेक्षा खूपच कमी आहेत. रशिया-युक्रेन युद्ध आणि इतर भूराजकीय संकटांमुळे ऑटोमोबाइल उद्योगासमाेरील पुरवठा आव्हाने ही या मागे मुख्य कारणे आहेत.

बातम्या आणखी आहेत...