आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
निर्यातबंदी लादल्याच्या दुसऱ्या दिवशी कांद्याच्या भावात २०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत घसरण आली. उत्तर भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ दिल्लीच्या आझादपूर मंडीत मंगळवारी कांद्याचा भाव २०० रु. प्रतिक्विंटलपर्यंत राहिला. बाजारात कांदा १५०० ते २८०० रु. प्रतिक्विंटलपर्यंत विकला. हा एक दिवस आधी सोमवारी १७०० ते ३००० रुपये होता. व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार, आगामी काळात कांदा आणखी स्वस्त होऊ शकतो. एक-दोन आठवड्यांत याचा भाव प्रतिक्विंटल ५०० ते १००० रुपयांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयांतर्गत कार्यरत विदेशी उद्योग महासंचालनालयाने सोमवारी कांद्याच्या सर्व प्रकारच्या निर्यातीवर तत्काळ बंदी घातली होती.
जाणकारांनुसार, कोरोना काळात एप्रिलपासून जुलैदरम्यान कांद्याची निर्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त राहिली होती. यामुळे देशात कांद्याच्या पुरवठ्यात यापुढे घट येण्याची शक्यता निर्माण झाली, शिवाय याचा भावही वाढू लागला होता. या वर्षी जास्तीचा पाऊस, पुरामुळे कांदा पिकाचे बरेच नुकसान झाले. यामुळे उत्पादनावरही परिणाम होऊ शकतो. आझादपूर बाजार बटाटा, कांदा व्यापारी संघटनेचे सरचिटणीस राजेंद्र शर्मा म्हणाले, निर्यातबंदी चांगला निर्णय आहे. यामुळे कांद्याच्या भाववाढीला पूर्णविराम लागेल. द. भारतात कांद्याच्या पिकाची नासाडी झाल्याने पुरवठ्याचे संकट तयार झाले आहे. त्यामुळे सरकारला निर्यातीवर बंदीसोबत आयात करण्याचाही विचार केला पाहिजे.
पुरवठ्यात घट येण्याची शक्यता, त्यामुळे सरकारने घातली बंदी
- नवे पीक नोव्हेंबरपर्यंत येईल. अशात सणासुदीत मागणी वाढण्यात घट येऊ शकते.
- महागाई दर आरबीआयच्या ६%च्या उद्दिष्टावर आहे. कांदा महाग झाल्याने आणखी वाढण्याची शक्यता होती.
- कर्नाटकमध्ये पावसामुळे पीक नष्ट झाले. मध्य प्रदेश, गुजरात, महाराष्ट्रात साठवणुकीच्या कांद्याचेही नुकसान.
- गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कांदा १०० रुपये प्रतिकिलोपर्यंत विकला. सरकारला पुन्हा अशी स्थिती नको.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.