आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • 20,000 Crore Loan Scheme For MSMEs With NPAs; The Plan Was Announced In May, The Guidelines Issued

दिलासा:एनपीए झालेल्या एमएसएमईसाठी 20 हजार कोटींची कर्ज योजना सुरू; मेमध्ये या योजनेची घोषणा केली होती, मार्गदर्शक तत्त्वे जारी

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कर्ज जास्तीत जास्त 10 वर्षे मिळेल, सुरुवातीच्या 7 वर्षांत व्याज आणि उर्वरित 3 वर्षांत मुद्दल द्यावे लागेल
  • एमएसएमई व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होत असेल तरच कर्ज

केंद्र सरकारने एनपीए आलेल्या सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगां(एमएसएमई)च्या मदतीसाठी २०,००० कोटी रुपयांचे कर्ज साहाय्य उपलब्ध करण्याची योजना लाँच केली आहे. एमएसएमई मंत्रालयाकडून बुधवारी यासंदर्भात दिशानिर्देश जारी केले आहेत. यामुळे सुमारे दोन लाख संकटग्रस्त एमएसएमईंना फायदा मिळण्याची शक्यता आहे.

क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर सबऑर्डिनेट डेट(सीजीएसएसडी) या योजनेची घोषणा मे महिन्यात जाहीर स्वावलंबी भारत अभियान पॅकेजअंतर्गत केली होती. याअंतर्गत एमएसएमईच्या फेररचनेसाठी वाटलेल्या कर्जाच्या क्रेडिट गॅरंटी ट्रस्ट फॉर मीडियम अँड स्मॉल आंत्रप्रेन्योर्स(सीजीटीएमएसई) देईल. यासाठी सरकार सीजीटीएमएसईला ४ हजार कोटी रुपयांची मदत उपलब्ध करेल. वाटलेल्या कर्जावर ट्रस्ट ९०% हमी कव्हर करेल आणि उर्वरित १०% ची हमी प्रवर्तक देईल. ही योजना सीजीएसएसडीअंतर्गत मंजूर केलेल्या सर्व कर्जांवर हमी प्राप्त करण्याची तारीख किंवा ३१ मार्च २०२१ दोन्हीपैकी जे आधी असेल १० वर्षांसाठी लागू आहे.

अॅनालिसिस : एमएसएमई व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होत असेल तरच कर्ज

> या योजनेत किती कर्ज सुविधा मिळेल?

एमएसएमईला प्रवर्तकाच्या हिश्शाच्या १५% किंवा ७५ लाख रु. दोन्हीपैकी जे कमी तेवढी कर्ज सुविधा मिळेल. असे असले तरी कोणत्याही स्थितीत याची रक्कम मूळ कर्जाच्या रकमेपेक्षा जास्त नसेल.

> या योजनेत कर्जासाठी कोण पात्र आहे?

असे एमएसएमई जे एसएमए-२ मध्ये होते आणि ३० एप्रिल २०२० रोजी एनपीए झाले, मात्र त्यांचे खाते ३१ मार्च २०१८ रोजी स्टँडर्ड अकाउंट होते व वित्त वर्ष १८-१९ व १९-२० मध्ये खाते स्टँडर्ड किंवा एनपीएच्या रूपात संचालित होते. यामध्ये अट अशी की, कर्ज देणाऱ्या संस्थांचे एमएसएमई व्यावसायिकदृष्ट्या योग्य असल्याचे समाधान झाले पाहिजे.

> एसएमए-०२ कोणती खाती असतात?

अशी बँक खाती जी ६० दिवसांपेक्षा जास्त परंतु ९० दिवसांपेक्षा कमी अवधीसाठी अनियमित असतात. त्यांना स्पेशल मेन्शन अकाउंट-०१ किंवा एमएमए-०१ अकाउंट संबोधले जाते.

> कोणत्या एमएसएमई यासाठी पात्र नसतील?

अशा एमएसएमई ज्यांनी कोणताही घोटाळा केला आहे किंवा सहेतुक थकबाकीदार श्रेणीत येतात ते या योजनेसाठी पात्र नसतील.

> किती हमी द्यावी लागेल?

एमएसएमईला कर्जासाठी १० टक्के रकमेची हमी द्यावी लागेल. ९०% रकमेची हमी सरकारद्वारे या उद्देशासाठी तयार ट्रस्टद्वारे दिली जाईल.

> योजनेत कर्जाचा प्रकार काय असेल?

या योजनेअंतर्गत कर्ज वैयक्तिक कर्जाच्या रूपात एमएसएमईच्या प्रवर्तकांना दिले जाईल. त्यांना ही रक्कम भांडवल किंवा अर्धभांडवलाच्या रूपात व्यापारात गुंतवावी लागेल.

> किती वर्षांसाठी कर्ज मिळेल?

कर्जाचा अवधी १० वर्षांचा असेल. यामध्ये कर्जदाराला जास्तीत जास्त ७ वर्षांपर्यंत मुद्दलासाठी तात्पुरती हप्ता स्थगितीची सूट घेता येऊ शकेल. म्हणजे, त्यांना ७ वर्षे केवळ व्याज भरावे लागेल. ८ व्या वर्षापासून त्यांना व्याजासह मुद्दलाचेही रिपेमेंट करावे लागेल.

> अर्ज कुठे करावा?

यासाठी जिथे कर्ज सुरू आहे तिथे एमएसएमईला अर्ज करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...