आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • 2021 Budget Expectation (tax) : The Tax Burden On The Big Rich Is Possible, Expect The Tax Relief Limit To Increase

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बजेट अपेक्षा (कर):मोठ्या श्रीमंतांवर कराचे ओझे शक्य, कर सवलत मर्यादा वाढण्याची अपेक्षा

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गृह कर्जाच्या व्याजाची जास्तीत जास्त मर्यादा 2 लाख रुपयांवर वाढली पाहिजे

वित्त वर्ष २०२१-२२ चा अर्थसंकल्प मोठ्या श्रीमंत(♦सुपर रिच) वर्गावर कराचे ओझे वाढवू शकतो. कर संकलन प्रकरणात २०२० अडचणीचे वर्ष सिद्ध झाले आहे. त्यामुळे सरकारवर महसूल वाढवण्याचा दबाव राहील. टॅक्स कन्सल्टन्सी फर्म क्लियरटॅक्सचे संस्थापक व सीईओ अर्चित गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, वित्त मंत्री निर्मला सीतारामण यांचे लक्ष कर संकलन वाढवण्यावर राहील. सरकारने आधीच जीएसटीवर प्रोव्हिजनल आयटीसी क्लेममध्ये सूट मर्यादा घटवली आहे. यामध्ये पुरवठादाराने संबंधित चालान अपलोड केले नाही तर करदाता आयटीसी क्लेम करू शकतो. याला १० ♥% वरून ३ टक्के केले आहे. याशिवाय जीएसटीच्या फसवणुकीवर आळा घालण्यासाठी सरकारने दंड लावण्याारखे पावले उचलली आहेत. प्राप्तिकर प्रकरणातही सरकार असे पाऊल उचलू शकते. सीए कीर्ती जोशी म्हणाले, प्राप्तिकर विवरण दाखल करण्यात एक दिवस विलंब झाल्यामुळे ५ हजार व १० हजार रु. विलंब शुल्क घटवून १०० किंवा ५० रु. रोज व जास्तीत जास्त ५ हजार वा १० हजार कर द्यावा लागेल.

अर्थसंकल्पातून अपेक्षा..

> भागीदारी फर्मवर कंपनीपेक्षा जास्त कर दर आहे. यावरही कर दर कमी असला पाहिजे.

> गृह कर्जाच्या व्याजाची जास्तीत जास्त मर्यादा २ लाख रु.वर वाढली पाहिजे.

> कलम ८० सीअंतर्गत कपातीची मर्यादा १.५ लाखावरून वाढून ३ लाख रु. केली पाहिजे.

सुपर रिच कर शक्य

सध्या कर विवरण दाखल करण्याच्या हंगामात प्रत्यक्ष कर संकलन आणि अग्रिम कर संकलन लक्ष्यापेक्षा कमी राहिल्यास सरकार सुपर रिच श्रेणीवर कर वाढवण्याचे पाऊल उचलू शकते. - अर्चित गुप्ता, संस्थापक व सीईओ, क्लिअरटॅक्स

करसवलत वाढली जावी

प्राप्तिकराची मूळ सवलत मर्यादा २.५ लाखावरून वाढून ५ लाख रुपये केली पाहिजे आणि ५ ते १० लाखाचा उत्पन्न स्लॅब १० टक्के केला पाहिजे. याशिवाय नोकरदार कर्मचाऱ्यांना नाेकरी बदलल्यावर नोटीस पे द्यावे लागते. त्या नोटीस पेची प्राप्तिकरात कर्मचाऱ्यांना कपात दिली पाहिजे. - कीर्ती जोशी, सीए

बातम्या आणखी आहेत...