आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्यमराठी एक्स्प्लेनर:बजेटशी संबंधित 20 शब्दांचा अर्थ, जे माहिती करून घेतल्यानंतर बजेट समजून घेण्यास होईल मदत

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सरकार वर्षभरात कुठून किती कमावणार आणि कुठे किती खर्च करणार, याचाच हिशोब म्हणजे बजेट. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प सादर करत आहेत. बजेटचा सर्वांसाठी आवश्यक आहे. यामुळे हे समजून घेणेही तेवढेच आवश्यक आहे. परंतु बजेटमध्ये असे काही शब्द असतात ज्याचे अर्थ सामान्य व्यक्तीला माहिती नसतात. येथे आम्ही अशाच 20 शब्दांचा अर्थ सांगत आहोत.

फायनान्स बिल म्हणजे वित्त विधेयक
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सरकार लोकसभेत वित्त विधेयक सादर करते. करांचे दर व सवलती या विधेयकात नमूद केलेल्या असतात.

एप्रोप्रिएशन बिल म्हणजे विनियोग विधेयक
फायनान्स बिलसोबतच एप्रोप्रिएशन बिलसुद्धा सादर केले जाते. यामध्ये सरकारी खर्चाचे विवरण केलेले असते.

बजेट एस्टीमेट म्हणजे बजेट अंदाज
येणाऱ्या आर्थिक वर्षात म्हणजे फायनेन्शियल इअरमध्ये सरकार होणाऱ्या उत्पन्न आणि खर्चाचा अंदाज सांगते, त्याला बजेट एस्टीमेट म्हणतात.

रिवाईज्ड इस्टिमेट म्हणजे सुधारित अंदाज
मागील वर्षात सरकारने उत्पन्न आणि खर्चाचा जो अंदाज लावला होता, तो पुन्हा सुधारित करून सादर केले जाते. यालाच रिवाईज्ड इस्टिमेट म्हणतात.

एक्चुअल म्हणजे वास्तविक
दोन वर्षांपूर्वी सरकारने वास्तविक जेवढे कमावले आणि खर्च केले याला एक्चुअल म्हणतात.

फिस्कल डेफिसिट म्हणजे वित्तीय तूट
सरकारचे उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असेल तर सरकार तोट्यात आहे, यालाच फिस्कल डेफिसिट म्हणतात.

फिस्कल सरप्लस म्हणजे वित्तीय नफा
सरकारचे उत्पन्न जास्त आणि खर्च कमी असल्यास सरकार फायद्यात आहे. यालाच फिस्कल सरप्लस म्हणतात.

रेव्हिन्यू डेफिसिट म्हणजे महसूल तोटा
सरकारने कमाईचे जे टार्गेट सेट केले होते, परंतु तेवढी कमाई झाली नसेल तर त्याला रेव्हिन्यू डेफिसिट म्हणतात.

डायरेक्ट टॅक्स म्हणजे कर
असा कर जो सरकार सामान्य व्यक्तीकडून थेट घेते. उदा. इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स इ.

इन्डायरेक्ट टॅक्स
असा कर जो सरकार लोकांकडून अप्रत्यक्षरीत्या घेते. उदा. एक्साइझ ड्युटी, कस्टम टॅक्स, सर्व्हिस टॅक्स इ.

इन्कम टॅक्स म्हणजे आयकर
हा टॅक्स तुमच्या उत्पन्नावर लावला जातो. याव्यतिरिक्त तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल आणि त्यावर व्याज मिळत असल्यास त्यावरही आयकर द्यावा लागतो.

कॉर्पोरेट टॅक्स
व्यावसायिक कंपन्यांच्या नफ्यावर किंवा भांडवलवृद्धीवर लावण्यात येणारा हा कर आहे.

एक्साईज ड्युटी म्हणजे उत्पादन शुल्क
देशामध्येच तयार होणाऱ्या वस्तूंवर जो टॅक्स लागतो त्याला एक्साईज ड्युटी म्हणतात. हा आता GST समाविष्ट करण्यात आला आहे. परंतु पेट्रोल, डिझेल आणि मद्यावर अजूनही एक्साईज ड्युटी लागते.

कस्टम ड्युटी म्हणजे सीमा शुल्क
जे सामान बाहेरील देशांमधून येत आहे आणि दुसऱ्या देशांमध्ये जात आहे म्हणजेच इम्पोर्ट-एक्स्पोर्टवर हा कर लावला जातो.

कॉन्सोलिडेटेड फंड म्हणजे संचित निधी
सरकार जे काही कमावते त्याला कॉन्सोलिडेटेड फंड म्हणतात. यातून पैसे काढण्यासाठी संसदेची मंजुरी आवश्यक असते.

कंटिन्जेन्सी फंड म्हणजे आकस्मिकता निधी
अचानक गरज पडल्यास सरकार ज्या फंडातून पैसे काढते त्याला कंटिन्जेन्सी फंड म्हणतात. यातून पैसे काढण्यासाठी संसदेची मंजुरी लागत नाही.

रेव्हिन्यू एक्सपेंडिचर म्हणजे महसूल खर्च
देश चालवण्यासाठी सरकारला ज्या खर्चाची आवश्यकता असते त्याला रेव्हिन्यू एक्सपेंडिचर म्हणतात. हा खर्च सबसिडी देणे, सॅलरी देणे, कर्ज देणे, राज्य सरकारला ग्रांट देण्यात होतो.

कॅपिटल एक्सपेंडिचर म्हणजे भांडवली खर्च
ज्या खर्चातून भांडवली मालमत्ता उभी राहाते, तिला भांडवली खर्च म्हणतात. या खर्चात जमीन, इमारत, मशिनरी याचा खर्च अंतर्भूत होतोच; शिवाय केंद्र सरकारने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, सार्वजनिक उद्योग आदींना दिलेली कर्जेही येतात.

शॉर्ट टर्म गेन म्हणजे अल्पमुदतीचा फायदा
जेव्हा कोणी शेअर मार्केटमध्ये एक वर्षापेक्षा कमी काळासाठी पैसे लावून त्यावर फायदा कमावतो त्याला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन म्हणतात.

लॉन्ग टर्म गेन म्हणॆ दीर्घमुदतीचा फायदा
जेव्हा कोणी शेअर मार्केटमध्ये एक वर्षापेक्षा जास्त काळासाठी पैसे लावून त्यावर फायदा कमावतो त्याला लॉन्ग टर्म कॅपिटल गेन म्हणतात.

डिसइनवेस्टमेंट म्हणजे निर्गुंतवणूक
जेव्हा सरकार सरकारी कंपन्यातील काही भागीदारी विकून पैसे कमावते त्याला डिसइनवेस्टमेंट म्हणतात.

बातम्या आणखी आहेत...