आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंुतवणूक:ऑटो, एफएमसीजीसह 4 क्षेत्रांमध्ये 11 महिन्यांत आले 22 हजार कोटी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चीन आणि अमेरिकेनंतर जगातील तिसरा सर्वात मोठा ग्राहक मार्केट भारत, सलग परकीय गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहे. फास्ट फूडपासून ते ऑटो, मोबाइल फोनपर्यंत भारतीय ग्राहकांच्या खर्चांत सलग वाढ होत आहे. कॅलेंडर वर्ष २०२२च्या डिसेंबर तिमाहीत ग्राहक खर्च २४.७७ लाख कोटी रुपयांवर पाेहोचले. याआधी सप्टेंबर तिमाहीत २३.०९ लाख कोटी रुपयाच्या तुलनेत ७.२८% जास्त आहे. त्यामुळे गेल्या आर्थिक वर्षे २०२२-२३ च्या सुरुवताीला ११ महिन्यात ४ प्रमुख उद्योग क्षेत्र- ऑटो, कन्झ्युमर ड्युरेबल, कन्झ्युमर सेवा आणि एफएमसीजीमध्ये २२ हजार कोटी रुपयापेक्षा जास्तीची परकीय गंुतवणूक आली.

परकीय गंुतवणूक भारताकडे आकर्षित होण्याची ४ प्रमुख कारणे वेगाने वाढणारा मध्यमवर्ग भारतात मध्यमवर्ग वेगाने वाढत आहे. पुढच्या आठ वर्षांत २०३० पर्यंत ते वार्षिक ८.५% च्या दराने वाढून ८० कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

भारतात मध्यमवर्ग वेगाने वाढत आहे. पुढच्या आठ वर्षांत २०३० पर्यंत ते वार्षिक ८.५% च्या दराने वाढून ८० कोटींपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.

एनएसओच्या मते, २०१४-१५ मध्ये देशाचे दरमाणशी उत्पन्न ८६,६४७ रुपये वार्षिक होते. ते २०२१-२२ पर्यंत दुप्पट होऊन १.७२ लाख रुपये वार्षिक झाले.

कौटुंबिक खर्चात होतेय वाढ बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपच्या अहवालानुसार, गेल्या दशकात घरगुती खर्च १०% वार्षिक दराने वाढला. उच्च वर्गाचा खर्च दरवर्षी २०% दराने वाढतो.

ग्राहकोपयोगी वस्तूंच्या विक्रीत वाढ रेटिंग एजन्सी क्रिसिलच्या मते, टीव्ही, फ्रिज, एसी सारख्या ग्राहकोपयोगी वस्तूंची विक्री चालू आर्थिक वर्षात सुमारे १८% वाढीसह १ लाख कोटींवर पोहोचू शकते.