आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँड बाजा बारात:महिनाभरात 25 लाख विवाह; बाजारात येणार 3 लाख कोटी, सणांनंतरही व्यवसायांतील चमक कायम राहणार

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिवाळीने देशभरात पसरलेला कोरोनाचा अंधकार दूर केला. बाजारांना नवी झळाळी आली. व्यवसायांचा हा उल्हास सणांनंतरही कायम राहील. पुढील महिनाभरातच देशभरात २५ लाख लहानमोठे लग्नसोहळे होण्याचा अंदाज आहे. यामुळे बाजारात ३ लाख कोटी रुपये येण्याची आशा आहे. दिवाळीनंतर येणाऱ्या या शुभशकुनाला व्यापारी मोठा बोनस म्हणून पाहत आहेत.

१५ नोव्हेंबरच्या तुळशी विवाहारंभापासून १३ डिसेंबरपर्यंत लग्नसराईचा हंगाम असेल. या काळात १२ दिवस विवाहांचे मुहूर्त आहेत. यानंतर पुढील वर्षी जानेवारी-फेब्रुवारीतही अनेक मुहूर्त आहेत. कॉन्फेडरेशन ऑफ आॅल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतिया म्हणाले, ‘यंदा दिवाळीला जोरदार व्यवसायाने उत्साहित व्यापारी लग्नसराईतील विक्रीच्या तयारीला लागले आहेत. एकट्या दिल्लीतच १.५ लाख लग्ने होतील. यातून ५० हजार कोटींची उलाढाल होईल.’ इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता म्हणाले, लग्नसराईत २ वर्षांपासून थंडावलेली मागणी जोर धरेल. पीकपाणीही चांगले आहे. यामुळे गावांकडेही जोरदार लग्नसोहळे होतील.

सोन्याहून पिवळे, ६५% रिटेल खरेदी लग्नांत होते, ४०% खरेदी २ महिन्यांत
ऑल इंडिया जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काैन्सिलचे चेअरमन आशिष पेठे यांच्यानुसार, यंदा कोरोना आटाेक्यात राहिल्याने सणासुदीचा उत्साह जोरदार राहिला. यंदा ऑक्टोबर-नाेव्हेंबरमध्ये वर्षातील ४०% खरेदी होण्याची शक्यता आहे. वर्ल्ड गोल्ड काैन्सिलनुसार, सोन्याच्या रिटेल खरेदीत लग्नांचा वाटा ६० ते ६५% पर्यंत असतो. अर्थव्यवस्था रुळावर परतल्याने भारतात जुलै-सप्टेंबर तिमाहीत सोन्याची मागणी ४७% वाढून १३९.१ टन राहिली. २०२० मध्ये ती ९४.६ टन होती. लग्नसराईमुळे ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत या मागणीत वाढ होण्याची आशा आहे.

विवाह व्यवसायात २५ टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची आशा
आॅल इंडिया टेंट डेकोरेटर वेल्फेअर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष रवी जिंदल म्हणाले, कोरोनामुळे यंदा उन्हाळ्यातील लग्ने लांबणीवर पडली होती. यामुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये देशभरात मोठ्या प्रमाणात विवाह होतील. यातून सुमारे १५ कोटी लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रोजगार मिळेल. पुढील चार महिन्यांत वेडिंग व्यवसाय ४.५ लाख कोटी रुपयांच्या पार जाण्याची शक्यता आहे. तो कोरोनाकाळाआधीच्या २५% जास्त असेल. राजस्थानात डिसेंबरपर्यंत सर्व १३,००० गार्डन बुक झाले आहेत. फेब्रुवारीपर्यंत १०,००० हॉटेल्स व रिसॉर्ट‌्समध्ये ९०% बुकिंग झाली आहे. त्याचा वेडिंगशी संंबंधित २० पेक्षा जास्त क्षेत्रांना थेट फायदा होणार आहे.

डेस्टिनेशन वेडिंग : परदेश नव्हे तर स्वदेशाला पसंती
कोरोना निर्बंध हटल्याने डेस्टिनेशन वेडिंग २०% ते ३०% वाढू शकते. तथापि, लोक देशातच लग्नास प्राधान्य देत आहे. दुसरीकडे, हॉटेलमध्ये लग्नाचा खर्च प्री-कोविडच्या तुलनेत ३०% वाढला आहे. एम्पायर इव्हेंट्सचे विक्रम मेहता म्हणाले, ‘कोरोनापूर्वीच्या तुलनेत विवाह सोहळे २५% पर्यंत महागले आहेत.

बातम्या आणखी आहेत...