आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोविड महामारीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेच्या आव्हानात्मक परिस्थितीत गृहनिर्माण क्षेत्र खूप भक्कम झाले. गेल्या वर्षी देशातील ७ प्रमुख शहरांमध्ये २.७८ लाख घरे बांधून पूर्ण झाली. त्याच वेळी, २०२२ मध्ये विक्रमी ३.८५ लाख घरांचे काम पूर्ण होण्याचा अंदाज आहे. त्या तुलनेत २०२० मध्ये २.१४ घरे बांधण्यात आली हाेती.
अॅनाराॅक या रिअल इस्टेट सल्लागार कंपनीच्या अहवालानुसार २०२०च्या तुलनेत २०२१ मध्ये ३० टक्क्यांपेक्षा जास्त घरे उभारण्यात आली. या वर्षी २०२१ च्या तुलनेत ३८.५ टक्के नवीन घरे बांधून पूर्ण हाेण्याची आशा आहे. २०२०च्या आकडेवारीशी तुलना करता या वर्षी याबाबतीत जवळपास ८० टक्के वृद्धी हाेण्याची शक्यता आहे. रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते गृह निर्माण प्रकल्पांचे काम पूर्ण हाेणे म्हणजे या उद्याेगातील भांडवलाची अडचण दूर हाेत असल्याचे संकेत आहेत. गेल्या वर्षी पूर्ण झालेल्या घरांमध्ये सर्वात जास्त ८६,५९० घरे राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीआर) आहेत.
बहुतेक घरे वेळेवर तयार होतील
या वर्षी बहुतांश बांधकाम सुरू असलेली घरे वेळेत पूर्ण होतील. त्याचे कारण असे की, सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांचे काम नव्याने सुरू होण्यापूर्वी पूर्ण करण्याचा विकासकांचा प्रयत्न आहे. - अनुज पुरी, अध्यक्ष, अॅनारॉक ग्रुप
या वर्षी बहुतांश घरांची कामे पूर्ण होतील, चेन्नई आघाडीवर असेल
देशातील बहुतांश प्रमुख शहरांमध्ये तयार घरांची संख्या वर्षानुवर्षे वाढण्याचा अंदाज आहे. मुंबईत निर्माणाधीन घरांची सर्वाधिक संख्या आहे, परंतु चेन्नईमध्ये सर्वाधिक ३६% काम पूर्ण होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.